मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कशी येशील कोंदणी??...(व्हॅलेंटाईन डे स्पेशल)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मिपाकरांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देणारी प्राजूची 'कधी येशील कोंदणी??...' ही कविता वाचल्यावर आमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले नसते तरच नवल. कशी येशील कोंदणी??... तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग धनुष्य का भिवईचे, कोरूनसे काढलेले डोळे तांबारले कसे, म्हशीसम रोखलेले रंग त्यांचा भला बुरा, तिरळा का असे जरा? पापण्यांचा गं पिसारा, रंगवुनी मस्कारा कुंतल ते चार काळे, का सोडशी मोकळे? लाव मेंदी ग तू खुळे, आरशाशी घुटमळे मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद जरी तुला मी टाळतो, का स्वप्नांत पाहतो? तुझ्या भीतीने उठतो, घाम पुसत राहतो श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? चतुरंग

वाचने 4983 वाचनखूण प्रतिक्रिया 24

धनंजय Wed, 02/11/2009 - 21:19
"मेघ" (काजळाचा मेघ!) उपमा मूळ कवितेपक्षा सरस वापरली आहे ;-)

In reply to by धनंजय

संदीप चित्रे Wed, 02/11/2009 - 23:29
पहिल्या दोन ओळींतच फुटलो ना रंग्या :) >> श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? या ओळी तर खासच आहेत :)

लिखाळ Wed, 02/11/2009 - 21:21
वाहवा ! फारच जोरदार. काजळाचा मेघ, पिवळी फळी, चोंदलेल्या आठवणी..मस्तंच :) -- लिखाळ.

प्राजु Wed, 02/11/2009 - 21:22
वाटच पहात होते मी.... मस्त मस्त. धनंजय यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by त्रास

+१ ग्रेट. असेच म्हणतो पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मीनल Wed, 02/11/2009 - 22:49
ती हिरकणी कुठे आणि ही कुठे? आपली कुठली आहे ते ज्याच त्यान ठरवाव. :)) आपली अशी असेल तर तशी असावी हे स्वप्न पहाव. मीनल.

भडकमकर मास्तर गुरुवार, 02/12/2009 - 00:27
चालणारा ढीग,पिवळ्याशा फळ्या,, चोंदल्या आठवणी... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 08:20
मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी हाहाहा...सॉलिट्ट्ट... मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

राघव गुरुवार, 02/12/2009 - 08:30
तुम्ही भारी आहात.. खूप वेळ हसत होतो :) मस्त विडंबन. मुमुक्षु

दत्ता काळे गुरुवार, 02/12/2009 - 14:01
तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद हा . . हा . . मस्तंच.

अनिल हटेला गुरुवार, 02/12/2009 - 17:33
तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग पहील्या कडव्यातच फुटलो !!!!! =)) =)) रंगाशेठ ,हॅपी वॅलेंटाईन बरं!! ;-) :D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसोबा खेचर Fri, 02/13/2009 - 02:14
श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? सह्ही रे रंगा! :) तात्या.