कशी येशील कोंदणी??...(व्हॅलेंटाईन डे स्पेशल)
मिपाकरांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देणारी प्राजूची 'कधी येशील कोंदणी??...' ही कविता वाचल्यावर आमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले नसते तरच नवल.
कशी येशील कोंदणी??...
तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ
मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग
धनुष्य का भिवईचे, कोरूनसे काढलेले
डोळे तांबारले कसे, म्हशीसम रोखलेले
रंग त्यांचा भला बुरा, तिरळा का असे जरा?
पापण्यांचा गं पिसारा, रंगवुनी मस्कारा
कुंतल ते चार काळे, का सोडशी मोकळे?
लाव मेंदी ग तू खुळे, आरशाशी घुटमळे
मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी
बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी
तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद
दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद
जरी तुला मी टाळतो, का स्वप्नांत पाहतो?
तुझ्या भीतीने उठतो, घाम पुसत राहतो
श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी
जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी?
चतुरंग
वाचने
4983
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
मेघ
In reply to मेघ by धनंजय
असेच म्हणतो
वाहवा !
हाहाहा..
खल्लास विडंबन.
ग्रेट
In reply to ग्रेट by त्रास
+१११११२
In reply to +१११११२ by llपुण्याचे पेशवेll
+१११११३
In reply to +१११११३ by बिपिन कार्यकर्ते
+१११११४
In reply to +१११११४ by घाटावरचे भट
+१११११५
In reply to +१११११५ by वल्लरी
+१११११६
+१
काय म्हणाव आता?
हाहाहा
मस्त
उत्तम विडंबन
एक नंबर
मोठी तुझी
तुम्ही
मस्तं विडंबन
हाहाहाहाहा
सही !!!
आमचं विडंबित कोंदण आवडलेल्या
श्वासाश्व