तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदास स्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीचा मी पाईक असल्याने रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते.असो.
तर आजचा विषय आहे नॉन व्हेज .आपल्या सर्वांचा आवडीचा विषय.उत्क्रांतीवादानुसार माणुस हा मिश्र आहारी आहे .तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार?
जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मांसाहाराचा भोक्ता आहे.आम्ही भावंड लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या घरी मटण किंवा चिकन शिजायचे.लहाणपणी तिखट सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट वजा.पण नळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे वडीलांना हायपरटेंशनचा त्रास सुरु झाल्याने नॉनव्हेज कमी झाले व ति सवय सुटली.
पुढे कॉलेजसाठी मी कोकणात चिपळुणला गेल्यावर मासे खायला सुरवात केली.बांगडा,सुरमई,पापलेट ,कोळंबी,सोडे,मांदेली खेकडे काय काय खाल्ले त्या तीन वर्षात याची मोजदाद ठेवायला गेलो तर डोक्याचं दही होईल.माझ्या मावसंभावाकडे एअरगन असल्याने आम्ही कवडा,ससे इत्यादी मारुन आणायचो व त्यावर ताव मारायचो.कॉलेज संपल्यावर मी सातार्यात परत आलो व शेतीत लक्ष घातले.तिथे माझा एक ग्रुप जमला ,आठवड्यातून एकदा ग्रामिण भागातील एखाद्या धाब्यावर गावरान चिकन,चुलीवरचं मटण खायला आम्ही जायचो.प्रसंगी दारुही प्यायचो.
तर बघता बघता या गोष्टीला आता दहा वर्ष झाली आहेत व मि पुर्णपणे मांसाहाराच्या आहरी गेलो आहे.
मला आता मांसहाराची चटक लागली आहे.आताशा मी ३१ वर्षाचा आहे व वजन आणि तब्येत वाढत चालली आहे.माझे दोन चुलतभाऊ हार्ट पेशंट झाले आहेत.मी ज्या रस्त्याने जात आहे त्याच रस्त्यावर ते गेल्याने एकाला हायपरटेंशन व एकाची ॲँजिओप्लास्टी झाली आहे. मला मांसाहाराशिवाय अलिकडे रोजच्या शाकाहारी पदार्थात इंटरेस्ट राहीलेला नाही.घरी आमटी,भेंडीची भाजी,तोंडलं असल्या भाज्या असतील तर माझे डोके उठते.त्या रोजच्या पोळीभाजीची चव वाटेनाशी झाली आहे.सतत बिर्याणी,चुलीवरचं मटण ,बांगड्याचं कालवण असे काहीतरी डोळ्यापुढे नाचत रहाते.याचा परिणाम असा झाला आहे की मी सतत बाहेर मांसाहार करायला जातो.याचा अर्थात खिश्यावरही ताण पडायला लागला आहे.मांसाहार कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले ,पण लौकीक अर्थाने हे व्यसन समजले जात नसल्याने मी फारसे मनावर घेतले नाही.नेहमीप्रमाणे माझे काही प्रश्न आहेत.
१. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का?
२. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले?
३. मला असलेली मांसाहाराची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल?
४. रोजच्या पोळीभाजी आहारात परत इंटरॅक्शन कसे वाढवावे?
५. सध्या नॉर वगैरेचे मसाले मिळत आहेत ,त्याने रोजच्या जेवणाची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? हे रेडीमेड मसाले सेफ आहेत का?
धन्यवाद.
वाचने
13602
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा अवतार संपायची वेळ झाली
हेच म्हणायला आलो होतो, घटिका
In reply to तुमचा अवतार संपायची वेळ झाली by पुंबा
तब्येत वाढते आहे म्हणजे नेमकं
आचरटपणा
In reply to तब्येत वाढते आहे म्हणजे नेमकं by आदूबाळ
अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा.
+१
In reply to अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. by कपिलमुनी
I think misalpav has no
ऑच्चं जॉल्लं तल!!
Never trouble the trouble !
In reply to ऑच्चं जॉल्लं तल!! by सूड
टफीजी,
मी नॉन रिलीजस माणुस आहे
In reply to टफीजी, by पगला गजोधर
ब्रम्हकपटी~टनाटनी व्हा! =))
In reply to मी नॉन रिलीजस माणुस आहे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
??
?
In reply to ?? by चित्रगुप्त
संपादक महोदय
+11
In reply to संपादक महोदय by मारवा
मांसाहार हा हवाच, त्यात चटक
यार, तुम आदमी हो या पाजामा?
पाजाम्याचा अपमान केल्याबद्दल
In reply to यार, तुम आदमी हो या पाजामा? by संदीप डांगे
सल्ला दिला असता पण सद्ध्या
तुम्हाला मांसाहार म्हणजे इथल्या सगळ्यांचं डोकं खाणं म्हणायचं
मला वाटतं, 'जिलब्या पाडण्याची
उत्तरे.
कशाला सोडताय सवय ?
एक करून बघा ....
आमचा शेजारी 'कबाब मे हड्डी'
In reply to एक करून बघा .... by गामा पैलवान
उत्तम माहितीपूर्ण धागा..
खपलो...
In reply to उत्तम माहितीपूर्ण धागा.. by टवाळ कार्टा
सोपे.आहे
सोपे.आहे
मिसळपाव ची वाट लावली BC
मी आज आत्तापासून टफि उर्फ
खिक्क, आचार्य बाबा बर्वे
In reply to मी आज आत्तापासून टफि उर्फ by आनन्दा
मांसाहार हे व्यसन नव्हे..
एक उपाय
=))=))
In reply to एक उपाय by प्रदीप
भीषण उपाय
In reply to एक उपाय by प्रदीप
=) =)
In reply to भीषण उपाय by गामा पैलवान
प्रदीप या सगळ्या काय नाहि पण थोड्या छान आहेत
In reply to एक उपाय by प्रदीप
साप, बेडूक, मगर वगैरे
In reply to प्रदीप या सगळ्या काय नाहि पण थोड्या छान आहेत by सुयशतात्या
चांगल्या सवयी सोडू नये...
सहमत
In reply to चांगल्या सवयी सोडू नये... by कैलासवासी सोन्याबापु
मटण खाणं ही फारच छान सवय आहे.
In reply to चांगल्या सवयी सोडू नये... by कैलासवासी सोन्याबापु
कॉलेज संपल्यावर मी सातार्यात
सातार्यात २००६ साली परत आलो
In reply to कॉलेज संपल्यावर मी सातार्यात by प्रसाद गोडबोले
नीतीराज
In reply to सातार्यात २००६ साली परत आलो by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अर्थात हे सगळे सांगण्याचा
In reply to नीतीराज by प्रसाद गोडबोले
मार्कसजी
In reply to अर्थात हे सगळे सांगण्याचा by प्रसाद गोडबोले
विश्वासार्ह सुत्रांकडुन एकदम
In reply to मार्कसजी by पगला गजोधर
व्वोक्के
In reply to विश्वासार्ह सुत्रांकडुन एकदम by प्रसाद गोडबोले
तो धागा अपडेट करायला झालाय.
In reply to विश्वासार्ह सुत्रांकडुन एकदम by प्रसाद गोडबोले
नळी फोडून समर्थन!!!
In reply to तो धागा अपडेट करायला झालाय. by बोका-ए-आझम
मी उपाय सुचवू का ?
नानासाहेब,
खाटकाच्या दुकानात जाऊन उभे राहून
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
=(( =((
In reply to खाटकाच्या दुकानात जाऊन उभे राहून by प्रसाद गोडबोले
I'm from Satara
टफीची दुनिया - अर्थात टफी साहेबांचे संभाव्य धागे ...
ही समस्या माझीसुद्धा आहे.
माझ्या माहितीनुसार कल्पक आणि
मांसाहाराची चटक
आसं व्हय!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
Farm to Fridge