मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदास स्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीचा मी पाईक असल्याने रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते.असो. तर आजचा विषय आहे नॉन व्हेज .आपल्या सर्वांचा आवडीचा विषय.उत्क्रांतीवादानुसार माणुस हा मिश्र आहारी आहे .तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मांसाहाराचा भोक्ता आहे.आम्ही भावंड लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या घरी मटण किंवा चिकन शिजायचे.लहाणपणी तिखट सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट वजा.पण नळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे वडीलांना हायपरटेंशनचा त्रास सुरु झाल्याने नॉनव्हेज कमी झाले व ति सवय सुटली. पुढे कॉलेजसाठी मी कोकणात चिपळुणला गेल्यावर मासे खायला सुरवात केली.बांगडा,सुरमई,पापलेट ,कोळंबी,सोडे,मांदेली खेकडे काय काय खाल्ले त्या तीन वर्षात याची मोजदाद ठेवायला गेलो तर डोक्याचं दही होईल.माझ्या मावसंभावाकडे एअरगन असल्याने आम्ही कवडा,ससे इत्यादी मारुन आणायचो व त्यावर ताव मारायचो.कॉलेज संपल्यावर मी सातार्यात परत आलो व शेतीत लक्ष घातले.तिथे माझा एक ग्रुप जमला ,आठवड्यातून एकदा ग्रामिण भागातील एखाद्या धाब्यावर गावरान चिकन,चुलीवरचं मटण खायला आम्ही जायचो.प्रसंगी दारुही प्यायचो. तर बघता बघता या गोष्टीला आता दहा वर्ष झाली आहेत व मि पुर्णपणे मांसाहाराच्या आहरी गेलो आहे. मला आता मांसहाराची चटक लागली आहे.आताशा मी ३१ वर्षाचा आहे व वजन आणि तब्येत वाढत चालली आहे.माझे दोन चुलतभाऊ हार्ट पेशंट झाले आहेत.मी ज्या रस्त्याने जात आहे त्याच रस्त्यावर ते गेल्याने एकाला हायपरटेंशन व एकाची ॲँजिओप्लास्टी झाली आहे. मला मांसाहाराशिवाय अलिकडे रोजच्या शाकाहारी पदार्थात इंटरेस्ट राहीलेला नाही.घरी आमटी,भेंडीची भाजी,तोंडलं असल्या भाज्या असतील तर माझे डोके उठते.त्या रोजच्या पोळीभाजीची चव वाटेनाशी झाली आहे.सतत बिर्याणी,चुलीवरचं मटण ,बांगड्याचं कालवण असे काहीतरी डोळ्यापुढे नाचत रहाते.याचा परिणाम असा झाला आहे की मी सतत बाहेर मांसाहार करायला जातो.याचा अर्थात खिश्यावरही ताण पडायला लागला आहे.मांसाहार कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले ,पण लौकीक अर्थाने हे व्यसन समजले जात नसल्याने मी फारसे मनावर घेतले नाही.नेहमीप्रमाणे माझे काही प्रश्न आहेत. १. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का? २. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले? ३. मला असलेली मांसाहाराची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल? ४. रोजच्या पोळीभाजी आहारात परत इंटरॅक्शन कसे वाढवावे? ५. सध्या नॉर वगैरेचे मसाले मिळत आहेत ,त्याने रोजच्या जेवणाची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? हे रेडीमेड मसाले सेफ आहेत का? धन्यवाद.

वाचन 13599 प्रतिक्रिया 64