मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम....?

Bhagyashri satish vasane · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
भेटत....ती पण नाही, भेटत....मी पण नाही... निभवणे तिला जमत नाही, आशेवर ठेवणे मला पटत नाही. फसवत ती पण नाही, फसवत मी पण नाही... तिला रुसण्याचे दु:ख आहे, मला एकटेपणाची भीती आहे... समजत...ती पण नाही, रागवत... मी पण नाही... कुठल्यातरी वाटेवर भेट होत असते नेहमी बघत... ती पण नाही... थांबत... मी पण नाही... जेंव्हा पण बघतो तिला, ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी... ऐकत... ती पण नाही, सांगत.. मी पण नाही... पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रेम माझे आजही आहे तिच्यावर नाकारत.. ती पण नाही, सांगत.. मी पण नाही...!

वाचने 24278 वाचनखूण प्रतिक्रिया 54

वा वा ..छान. मला हे गाणे आठवले (बघ पुन्हा एकदा तुझी तुलना जावेद अख्तरशी :) ये बता दे मुझे जिंदगी प्यार की राह के हमसफ़र किस तरह बन गए अजनबी ये बता दे मुझे जिंदगी... फूल क्यों सारे मुरझा गए किस लिए बुझ गयी ये चांदनी ये बता दे मुझे जिंदगी.. कल जो बाहों में थी और निगाहों में थी अब वो गर्मी कहा खो गयी न वो अंदाज है न वो आवाज है अब वो नरमी कहा खो गयी ये बता दे मुझे जिंदगी... बेवफा हम नहीं बेवफा तुम नहीं फिर वो जज्बात क्यों सो गए प्यार तुमको भी है प्यार हमको भी है फासले फिर क्यों ये हो गए ये बता दे मुझे जिंदगी...

In reply to by Bhagyashri sat…

एस 07/11/2016 - 19:15
१०१३ मध्ये एफबीवर टाकली होती का? अच्छा. तरीच व्हायरल झाली असावी. बादवे, तेव्हा तुम्ही कितवीला होतात?

In reply to by एस

पैसा 08/11/2016 - 23:34
सरळ पास होत आल्या असतील तर तेव्हा नववीत असणार. नववीत अशी प्रेमकविता लिहिल्यानंतर घरी नक्कीच महाभारत होणार. किंवा मग बारावीत यायला काही जास्त वेळ लागू शकतो.

In reply to by पैसा

म्हणजे मुद्दाम प्रेम केलंच पाहिजे असं नाही पण त्या वयात अनेकदा होतं..निदान आकर्षणाची भावना तरी अगदी पराकोटीची असते.

In reply to by मराठी कथालेखक

पैसा 12/11/2016 - 14:11
मी नववीत असताना काय करत होते आता आठवतेय. शाळेत मुलगे ही दुय्यम जमात समजत असायचो आम्ही. घरी भाऊ आणि त्याचे मित्र, शेजारची मुले सगळे मिळून क्रिकेट, लगोरी, गोट्या, विटीदांडू, पत्ते इ. खेळ खेळत असायचो. तेव्हा प्रेम बिम कशाशी खातात हेच माहीत नव्हते. मी एक भयंकर मोठा जोक केला होता. ड्रॉइंगच्या तासाला सरांनी ट्रे चं चित्र काढायला सांगितलं. बॉर्डरचे डिझाईन काढायचे होते तेव्हा मी पेपरमधे नुकतेच पाहिलेले बदामातून आरपार गेलेल्या बाणाचे चित्र रिपीट करून बॉर्डर काढली होती. त्यावर ड्रॉइंगचे सर खुर्चीतून खाली पडून हसले होते. मात्र मी ते त्याचा अर्थ माहीत नसताना काढले आहे हे सरांना समजले त्यामुळे त्यांनी बरे मार्क्स दिले होते. दुसरा किस्सा याहून वाईट आहे. बारावीत असताना एका मैत्रिणीला तिच्या बॉयफ्रेंडने लिहिलेले शोन्या वगैरे भाषेतले पत्र वहीतून माझ्या हाताला लागले आणि शाळेच्या लायब्ररीतच हे काय आहे हे लक्षात न येता मी त्याचे जाहीर वाचन केले होते. मात्र पत्र वाचून संपेपर्यंत मला त्याचा अर्थ समजला कारण तोपर्यंत मी ३ वर्षानी मोठी झाले होते. ती मैत्रीण फारच गोड आहे त्यामुळे मला माफ करून टाकले. तिचे त्या मुलाशी नंतर लग्नही झाले त्यामुळे नंतर सगळेच किस्सा या सदरात जमा झाले. पण मी जाहीर पत्रवाचन केल्यामुळे जर का तिच्या घरी कुठून कळले असते तर माझी शंभरी भरली असती.

In reply to by पैसा

मारवा 13/11/2016 - 23:10
किती निरागस होती पुर्वीची मुले मुलीँ किती उशीरा प्रेमा बिमात कीवा थेट लग्ना नंतरच प्रेमात पडायची

In reply to by पैसा

मारवा 13/11/2016 - 23:10
किती निरागस होती पुर्वीची मुले मुलीँ किती उशीरा प्रेमा बिमात कीवा थेट लग्ना नंतरच प्रेमात पडायची

In reply to by पैसा

मला सातवीत एक मुलगी आवडायची.. एका मित्राची सहावीत असलेली बहीण. पण ते आकर्षण थोडंच टिकलं. आठवीपासून वर्गातली एक मुलगी आवडायची ..हळू हळू म्हणजे नववी-दहावीपर्यंत तिच्या प्रेमातच पडलो याची खात्री झाली. ..हे एकतर्फी प्रेम बरीच वर्षे टिकलं (पूढे वाटा वेगळ्या होवूनही).. इतर आकर्षणं वाटत राहिलीत पण तरी हे प्रेम मनात अनेक वर्षे होतं

In reply to by पैसा

धन्यवाद:) पण एकतर्फी प्रेमाचा मनाला त्रासच होतो... असे असताना अभ्यासावरचे लक्ष उडू न देणे, परीक्षेत चांगले गुण मिळवणे म्हणजे स्वतःचा कस लागतो. असो... गेले ते दिवस ..राहिल्या त्या आठवणी

In reply to by मराठी कथालेखक

पैसा 15/11/2016 - 16:27
कविता तशी चांगलीच आहे ओ. मी जरा टैमपास करत होते. पण आईशप्पत नववीत असताना मी खरोखरच प्रेमनिरक्षर होते. त्यामुळे हा अभ्यासाकडे दुर्लक्ष वैग्रे प्रॉब्लेम आला नाही कधी! दुसरे म्हणजे नववीतल्याच काय, जे लोक शिकत आहेत त्यानी आपल्या अभ्यासावर काहीही करून लक्ष केंद्रित करावे असं मला आपलं वाटतं. प्रेमात पडून नापास झाला समजा, किंवा मग शिक्षण अर्धं सोडून लग्न्/संसार असले काही केलं तर नुकसान कोणाचं शेवट?

In reply to by पैसा

पण आईशप्पत नववीत असताना मी खरोखरच प्रेमनिरक्षर होते
चांगलंच आहे.
प्रेमात पडून नापास झाला समजा, किंवा मग शिक्षण अर्धं सोडून लग्न्/संसार असले काही केलं तर नुकसान कोणाचं शेवट?
खरी गोष्ट आहे.. आणि अभ्यास करुन परीक्षेत यश मिळवणं कठीण नाहीच.. प्रेमात यशस्वी होण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागतो हे मात्र कधीच कळलं नाही...

In reply to by मराठी कथालेखक

एस 13/11/2016 - 13:33
बाडिस. आमचं बालवाडीपरेम होल मिपाफ्येमस हाय. ;-) णववी तर लय लांब र्हायली! ख्यिक! तवर फकस्त एकं-दोनं शिकवायचे. त्यामुळं कोटीपर्यंत अजून ग्येलो नव्हतू नायतर पराकोटीचं हुतं का नाय त्ये सांगता येनं आवघड हाय!

In reply to by एस

त्यामुळं कोटीपर्यंत अजून ग्येलो नव्हतू नायतर पराकोटीचं हुतं का नाय त्ये सांगता येनं आवघड हाय!
:) मी वाचालेलं नाही... लिंक द्याल काय ?

Bhagyashri satish vasane 07/11/2016 - 19:17
आणि हो सकाळ ह्या दैनिकात सुध्दा मी ही कविता प्रसिद्ध केली होती, म्हणून ही कविता जर गुगल वर असेल तर त्यात काही नवल नाही, आणि तरीही तुम्हाला विश्वास नसेल तर तुमची ईच्छा !

Bhagyashri satish vasane 07/11/2016 - 19:20
हे पहा विश्वास नसेल तर तो तुमच्या जवळ ठेवा, कारण ती कविता मी लिहिलेली आह एवढ मला माहिती आहे, आणि असल्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही

नाखु 08/11/2016 - 15:39
या कवितेमधले नाही हे क्रियापद फार फार आवडले. मी मिपा उघडले नाही. मी कविता वाचली नाही. मी अभ्यास केला नाही. मी प्रतिसाद दिलाच नाही. मी काहीच वाचले नाही. आणि तरिही वाचलोही नाही. रा रा आत्मुदा संपादीत "

नाही (म्हणू) सरसावून बाही

" या आगामी चारोळी संग्रहातून साभार

In reply to by नाखु

मारवा 14/11/2016 - 19:41
थोडे माफ करा शब्दांशी खेळुन बघतो. शेंगा मी खाल्याच नाही. टरफले कुणी टाकली मजला ठाऊकच नाही. उचलण्याचा प्रश्नच नाही मी स्वाभिमानशुन्य नाही. विडंबनाची खाज आहे केवळ दुसरा हेतु नाही. मिसळ खावुन थोडा बहकलो तरी मी तसा माणुस वाईट नाही. गोड मानुन घ्या प्रतिसाद माझा मी असा असलो तरी तसा नाही.

सच६४८६ 08/11/2016 - 16:33
पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रेम माझे आजही आहे तिच्यावर.... वा वा ...खूपच सुंदर... कोणाचीतरी आठवण आली... एका क्षणासाठी तो चेहरा डोळ्यात तरळून गेला आणि आसवासंगे विरूनही गेला...

सस्नेह 08/11/2016 - 18:47
हे उगाचच आठवले, सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी..

सिरुसेरि 08/11/2016 - 19:06
छान कविता . हे तलत मेहमुदचे गाणे आठवले . "हमसे आया ना गया तुमसे बुलाया ना गया फासला प्यारका दोनोंसे मिटाया ना गया "

वाचली आहे कविता अगोदर. आज कवयित्री कोण ते कळलं. खूप सुंदर आहे कविता. खूप आवडली. तुमच्यापर्यंत आवडलेली भावना पोहोचवता आली याचा आनंद आहे