हिरव्या मिरचीचा खर्डा
वाचने
16988
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
झाड,खरडा,फोटो सर्वच छान.
आता कस आपली आवडती रेसिपी.भाकरी कुठय.
भाकरी हवीच सोबत
फोटो मस्त देखणे आलेत!
ग्रेट दिसतोय खर्डा.
येकच नम्बर राव...
झक्कास, यात आलं घालत नाहीस का?
झक्कास, यात आलं घालत नाहीस का?
In reply to झक्कास, यात आलं घालत नाहीस का by मोदक
नाही, खरड्यात आलं घालत नाही. तसंही मिरच्या तिखट असतात, आल्याच्या उग्रपणा अजून तिखटपणा वाढवेल.
In reply to नाही, खरड्यात आलं घालत नाही. by केडी
आल्याचा तिखटपणा घशाजवळ जाणवतो. मिरचीचा जिभेच्या शेंड्याजवळ.
तिखटपणाची डेप्थ जाणवेल आलं प्लस मिरची कॉम्बो वापरून. करून पहा. भारी लागतं ते पण.
झक्कास.
हा झाला खर्डा. सजवलेला फोटो नाही. चिकन तिकडे टाकलंय. सी सॉल्ट आहे. साखर वापरलेली नाही. मिरची मध्यम तिखट होती.In reply to झब्बू क्र. १ by आनंदी गोपाळ
सलाम तुम्हाला, आणि सी-सॉल्ट म्हणजे धमाल आयडिया! जियो, दर्दी आहात, भेटलाच पाहिजे तुम्हाला लवकर!
In reply to झब्बू क्र. १ by आनंदी गोपाळ
लय भारी दिसतंय राव!
सी सॉल्ट म्हणजे नेमकं काय?
In reply to लय भारी दिसतंय राव! by आदूबाळ
खडे मीठ.
.
जबरदस्त प्रकार!
फोटो मस्त आले आहेत.
आवडता प्रकार.
आमचे जुने शेजारी लसूण मिरच्या लोखंडी तव्यात भाजून त्याच तव्यात पितळी तांब्याच्या बुडाने ते मिश्रण फेसत असत. तो खर्डा अप्रतिमच असायचा.
खर्डा आवडला. एक प्रश्न चित्रांत दिलेली वेबसाईट आपलीच आहे का? (नंतर कुणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे).
In reply to खर्डा आवडला. एक प्रश्न by विवेकपटाईत
हो, गेली ३ वर्ष मी माझ्या फूड ब्लॉग वर माझे प्रयोग टाकत आहे
http://www.EatLiveCook.com
ठेचा आवडातोच. पॅन मध्ये मिरच्या, तेल, लसूण, जीरं ह्या क्रमाने पदार्थ टाकण्याचे कांही खास प्रयोजन आहे का?
सर्वसाधारणपणे, आख्या मिरच्या निखार्यावर किंवा थेट ज्वाळेवर भाजून घेतात आणि तेलावर जिरे परतून (ते तडतडल्यावर) त्यात लसूण मिसळून परतून भाजलेल्या मिरचीचे तुकडे करून परतून घेतले जातात आणि सर्वात शेवटी कोथिंबिर मिसळली जाऊन खलबत्यात खर्डा कुटला जातो. पण आपल्या क्रमवारीने पदार्थ पॅन मध्ये मिसळल्याने कांही खास फरक पडणार असेल तर त्याप्रमाण बनवायला नक्कीच आवडेल.
In reply to पदार्थ क्रम. by प्रभाकर पेठकर
तुम्ही म्हणताय ती पद्धत सुद्धा योग्य आहे, पण एकाच पॅन मध्ये सगळं उरकून घायचे म्हणून मी अश्या पद्धतीने करतो. मिरच्या वेगळ्या नं भाजता पॅन मध्येच आधी भाजून, मग तेलात जिरं घालून करून घेतो.
अर्थातच निखार्यावर भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसणीच्या खरड्याची चव केव्हाही भारीच!
छान
झक्कास रेसिपी.
सी-सॉल्ट ची आयडिया तर अजूनच मस्त आहे
मस्तच!
हा प्रतिसाद फोटोतल्या चाकूला घाबरुन दिला नाहीये ;)
पदार्थ नेहमीचा आणि सवयीचा असला तरीही तुम्ही टाकलेले फोटो अतिशय कल्पक आहेत.
झाड,खरडा,फोटो सर्वच छान.