साहित्य
३५ ते ४० हिरव्या मिरच्या
२० ते २५ लसणीच्या पाकळ्या
१ चमचा जिरं
एक मोठी मूठ कोथिंबीर
१ मोठा चमचा तेल
एक चिमूट साखर
मीठ, चवीनुसार
कुंडीत लावलेल्या मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येतात, मग त्याचा असा अधून मधून खर्डा करून ठेवतो. हा खर्डा साधारण एक ते दिड आठवडा टिकतो (खराब होत नाही, त्या आधीच संपवला जातो)
कृती
मिरच्या स्वच्छ धुवून, कोरड्या करून घ्याव्या. त्याचे बारीक तुकडे करावेत. एक पॅन गॅस वर ठेऊन, मिरच्या आधी ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर कोरड्या भाजून घ्याव्या. मिरच्यांना थोडा चटका लागला, कि थोड्या बाजूला करून, १ चमचा तेल पॅन मध्ये घालावा. तेल थोडं तापलं, कि मिरच्या तेलात एकदा परतून घ्या. आता पॅन मध्ये लसणीच्या पाकळ्या टाकून, हे मिश्रण अजून थोडा वेळ परतून घ्यावे (साधारण २ ते ५ मिनिटे).
मिरच्या आणि लसूण बाजूला सरकवून, पॅन मध्ये जिरं टाकावा. तेलात जिरं तडतडलं, कि मग ते मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्यात मिसळून घ्या. चवीनुसार मीठ, एक चिमूट साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड करायला ठेवा.
हे मिश्रण आता आपल्याला खलबत्यात कुटून घायचंय. खलबत्ता नसेल, तर मग मिक्सर मधून ह्याची जाडसर भरड काढून घ्या, पण खर्ड्याची अस्सली मज्जा हि कुटूनच आहे.
अर्थातच, भाकरी बरोबर खायला घ्या, किंवा मग ह्याच मस्त खर्डा चिकन करा!
ठेचा आवडातोच. पॅन मध्ये मिरच्या, तेल, लसूण, जीरं ह्या क्रमाने पदार्थ टाकण्याचे कांही खास प्रयोजन आहे का?
सर्वसाधारणपणे, आख्या मिरच्या निखार्यावर किंवा थेट ज्वाळेवर भाजून घेतात आणि तेलावर जिरे परतून (ते तडतडल्यावर) त्यात लसूण मिसळून परतून भाजलेल्या मिरचीचे तुकडे करून परतून घेतले जातात आणि सर्वात शेवटी कोथिंबिर मिसळली जाऊन खलबत्यात खर्डा कुटला जातो. पण आपल्या क्रमवारीने पदार्थ पॅन मध्ये मिसळल्याने कांही खास फरक पडणार असेल तर त्याप्रमाण बनवायला नक्कीच आवडेल.
तुम्ही म्हणताय ती पद्धत सुद्धा योग्य आहे, पण एकाच पॅन मध्ये सगळं उरकून घायचे म्हणून मी अश्या पद्धतीने करतो. मिरच्या वेगळ्या नं भाजता पॅन मध्येच आधी भाजून, मग तेलात जिरं घालून करून घेतो.
अर्थातच निखार्यावर भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसणीच्या खरड्याची चव केव्हाही भारीच!
झाड,खरडा,फोटो सर्वच छान.
आता कस आपली आवडती रेसिपी
झणझणीत मस्त!
फोटो मस्त देखणे आलेत!
ग्रेट दिसतोय खर्डा.
आंग्गाशी.......
झक्कास, यात आलं घालत नाहीस का
झक्कास, यात आलं घालत नाहीस का
In reply to झक्कास, यात आलं घालत नाहीस का by मोदक
नाही, खरड्यात आलं घालत नाही.
In reply to नाही, खरड्यात आलं घालत नाही. by केडी
एकदा करून पहा.
झक्कास.
झब्बू क्र. १
In reply to झब्बू क्र. १ by आनंदी गोपाळ
सलाम तुम्हाला, आणि सी-सॉल्ट
In reply to झब्बू क्र. १ by आनंदी गोपाळ
लय भारी दिसतंय राव!
In reply to लय भारी दिसतंय राव! by आदूबाळ
खडे मीठ.
तोंपासु
अगागा!
वाह!
आमचे जुने शेजारी लसूण मिरच्या
खर्डा आवडला. एक प्रश्न
In reply to खर्डा आवडला. एक प्रश्न by विवेकपटाईत
हो, गेली ३ वर्ष मी माझ्या फूड
पदार्थ क्रम.
In reply to पदार्थ क्रम. by प्रभाकर पेठकर
तुम्ही म्हणताय ती पद्धत
छान
भारी
मस्तच!
In reply to मस्तच! by रुपी
हाहाहा...
फारच कल्पक फोटोग्राफी