मिपा शासन
आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग
ठाणे उपविभाग ठाणे
बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे
दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता
वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535
प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी जाहीर झालेल्या परंतु पार न पडू शकलेल्या "पुणे" येथील बैठकीची पुनरावृत्ती होऊ नये याची पुरेपूर काळजी स्थानिक आयोजकांनी घेतली होती व त्या दृष्टीने खबरदारीचे उपाय घेण्यात आले होते . कोणतीही बैठक यशस्वी होण्यासाठी तेथील व्यवस्थेचा सतत आढावा घेणे गरजेचे असल्यामुळे योग्य त्या सूचना सर्व सभासदांस देण्यात आल्या होत्या.
सद्यस्थितीत मिपा शासनाच्या बैठका अतिशय कमी होत असल्यामुळे सदरची बैठक यशस्वीरीत्या पार पाडणे गरजेचे होते. त्यानुसार श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या सूचनेनुसार बैठकीचे ठिकाण ठरवण्यात आले होते. बरेच सभासद आणि इतर मंत्रिमंडळ ऐनवेळी ठरलेल्या ह्या दौऱ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही मिपाचे आरोग्यमंत्री श्री. सुबोध खरे, पणनमंत्री श्री मुक्त विहारी, वनमंत्री श्री सर्वसाक्षी, उच्चशिक्षणमंत्री श्री शॅम्पेन आणि मनोरंजन मंत्री श्री टकेश, अवजड उद्योगमंत्री श्री विनोदराव तसेच खाली सही करणार यांनी जातीने उपस्थिती लावली होती. काही नवीन सभासद जसे की श्री धर्मराज मुटके, वरून मोहिते, श्री हेमंत वाघे,श्रीमान योगी आणि टुकुल देखील या बैठकीस उपस्थित होते. गांधी जयंतीनिमित्त दुष्काळी दिवस असल्यामुळे काही नाराजीचे सूर उमटत होते परंतु शासनाच्या धोरणानुसार गांधीजींचा योग्य तो आदर राखला पाहिजे ह्यावर सदस्यांचे एकमत झाले.
ऐनवेळी जगाचे मध्यवर्ती ठिकाण "० मैल डोंबोली" येथून बैठकीच्या ठिकाणी पोचण्यासाठी लाल दिव्याच्या गाडीची व्यवस्था न झाल्यामुळे आणि भारतीय रेल्वेमधून सामान्य जनतेबरोबर प्रवास केल्यामुळे स्वतःच लालेलाल झालेले पणन मंत्री तसेच अवजड उद्योग मंत्री ठाणे स्थानक येथे उशिरा पोचल्याने त्यांना घेऊन तसेच मध्ये उच्च शिक्षण मंत्र्यांना घेणे ठरल्यामुळे स्वतः संयोजकांना सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाला. तरीही श्री प्रभाकरराव पेठकर यांनी श्रीमान योगी यांच्या साथीने बैठकीचे ठिकाण गाठले आणि धोरणात्मक चर्चा करण्यास सुरूवात केली. दरम्यानच्या काळात इतर सभासद आपापल्या वाहनातून ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचले. साधारण एक दीड तास उलटूनही संयोजक तसेच उर्वरित सभासद न पोचल्यामुळे सभा आणि चर्चा तशीच पुढे चालू राहिली. अखेरीस ८. ३० च्या सुमारास संपूर्ण कोरम पूर्ण झाल्यामुळे मुख्य सभेला सुरुवात झाली.
सुरुवातीला सभेचा ताबा आरोग्यमंत्री श्री सुबोध खरे यांचेकडे होता आणि त्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी सध्याच्या आरोग्यविषयक सोयीसुविधांचा साधक बाधक आढावा घेतला. खानपान सेवा लगेच सुरु झाल्यामुळे थम्स अप आणि स्वीट लाईम सोडा यांचा आग्रह होत होता. एक व्हेज आणि एक नॉन व्हेज प्लॅटर यांचीही मागणी नोंदवली गेली. जसजसे पदार्थ येत होते तसे बैठकीलाही रंग चढत होता. पणन मंत्र्यांनी शेतीविषयक आणि जमीनविषयक माहिती, तदनुषंगाने बोकाळलेला भ्रष्टाचार याविषयी सविस्तर माहिती दिली. नवीन सभासदांना सभेची कार्यपद्धती समजावून देण्याच्या उद्देशाने एकमेकांची ओळख करून देण्यात आली व गप्पांना रंग चढला. बैठकीचे टेबल आयताकृती असल्यामुळे काही काळ सभासदांचे थोडे गट पडले आणि तिहेरी चर्चाही सुरु होत्या. दरम्यानचे काळात पनीर लाहोरी , चिकन रारा मसाला, नान आणि ग्रीन सलाड यांची फर्माईश पेश झाली. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता घेता स्वयंचित चारचाकी वाहने आणि त्या अनुषंगाने विविध मॉडेल्सची चर्चा झाली. सभेच्या उत्तररंगात श्री धर्मराज मुटके यांनी प्रत्येकासाठी पहिलीच भेट म्हणून आणलेले पेढे सर्व मंत्रिमंडळाला आश्चर्याचा धक्का देऊन गेले. घड्याळाचे काटे पाहून सभा आवरती घेणे भाग पडले. टी टी एम एम तत्वानुसार आपापले बिल सर्व सभासदांनी मनोरंजन मंत्री श्री टकेश यांचेकडे जमा केले . त्यानंतर सगळ्या मिपा मंत्रिमंडळाचे समूह छायाचित्र घेण्यात आले आणि एकमेकांचा सुमारे अर्धा तास निरोप घेऊन सगळे मंत्री आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.
मिपा शासन निर्णय :
१) सदरच्या बैठका ह्या नियमित तत्वावर आणि जास्तीत जास्त सभासदांबरोबर पार पाडल्या जाव्यात असा निर्णय एकमताने घेण्यात आला.
२) बैठकीसाठी अहोरात्र काम करणाऱया स्थानिक कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारार्थ एक विशेष बैठक ठेवली जावी असा प्रस्ताव मांडला गेला आणि मंजूर झाला.
३) उपरोक्त लेखावशर्षाखाली मंजूर करण्यात आलेली बैठक लवकरात लवकर आयोजित करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ शासनास सादर करावा.
४) सदर बैठकीची जळजळयुक्त छायाचित्रे मनोरंजन मंत्री यांनी प्रकाशित करावीत.
५) हे ज्ञापन मिपा ठाणे विभागाचा अनौपचारिक संदर्भ तसेच त्यामधील तरतुदी अन्वये कायदा विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
5. सदर शासन निर्णय मिपा शासनाच्या www.misalpav.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा क्रमांक ठरवण्यात आलेला आहे.
हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
- मिपाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.
माम्लेदारचा पंखा
उप सचिव , कायदा विभाग
प्रति,
१) महामिपामालक, मिपाराज्य .
२) नियमित बैठक कट्टा समन्वय समिती , पुणे (१२ प्रती)
३) मा. कार्यासन अधिकारी
४) आहार व उद्योग मंत्री कार्यालय
५) निवडक "नस्ती उठाठेव मंडळ"
वाचने
33597
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
खी खी खी. जबराट वृत्तांत.
मापं आपण महान आहात!
लोल! काय जबरदस्त वृत्तांत आहे
=))
खी खी खी, लय भारी, बाकी
ठीकाय...
In reply to खी खी खी, लय भारी, बाकी by टवाळ कार्टा
नाही तर काय,
In reply to ठीकाय... by माम्लेदारचा पन्खा
टेरर आहे टेरर!!! तू असताना
In reply to नाही तर काय, by नीलमोहर
हो ना,
In reply to टेरर आहे टेरर!!! तू असताना by पिलीयन रायडर
तुम्ही असे घाबरवता, मग
In reply to नाही तर काय, by नीलमोहर
नाय तर काय
In reply to तुम्ही असे घाबरवता, मग by खटपट्या
खमंग!
लय भारी =))
जबरदस्त स्टाइल व्रुतांताची!
फायलीवरचा शेरा- जावक क्रमांक
=)
भारी !
ह्या ह्या ह्या! =))
मस्तं वृत्तांत.
लै भारी व्रुतांत
बराय, टक्याने निमंत्रण देऊनही
वृत्तांत आवडल्या गेला आहे.
वृतान्त एका जुनाट ठागदावर
हाताने टाइप करून
"गांधी जयंतीनिमित्त दुष्काळी
पाचवी प्रत
कल्पना आवडलेली आहे.
*स्वयंघोषित लिहायचे राहिले :-
In reply to कल्पना आवडलेली आहे. by औरंगजेब
पालकमंत्री म्हटले कि पिलावळ
In reply to *स्वयंघोषित लिहायचे राहिले :- by औरंगजेब
तुम्हाप्रत कल्याण असो !
In reply to पालकमंत्री म्हटले कि पिलावळ by टवाळ कार्टा
ह्याला म्हंतेत सर्कारी
In reply to तुम्हाप्रत कल्याण असो ! by माम्लेदारचा पन्खा
मनोरंजन मंत्र्यांचं वर्तन लक्षात घेता त्याची नैतिक जबाबदारी घेऊन
In reply to ह्याला म्हंतेत सर्कारी by खटपट्या
त्याचे फोटो चांगले आले नसतील
In reply to तुम्हाप्रत कल्याण असो ! by माम्लेदारचा पन्खा
जबरदस्त वृत्तांत पण फोटो
हेच म्हणतो.
In reply to जबरदस्त वृत्तांत पण फोटो by अजया
एकदम जबरदस्त दस्तावेज !
मस्त!
हा हा ..
तूफान
(१२ प्रती)
हो
In reply to (१२ प्रती) by सूड
लै बेस्ट.
तसेच मध्ये उच्च शिक्षण
+१११११
In reply to तसेच मध्ये उच्च शिक्षण by माझीही शॅम्पेन
जबरदस्त वृत्तांत
एक वंबर वृत्तांत. फोटो ?
जबरदस्त वॄत्तांत
हा कट्टा झाला असल्याचे पुरावे
कट्ट्याचा पुरवणी वृत्तांत
जबरा वृत्तांत...!!
In reply to कट्ट्याचा पुरवणी वृत्तांत by धर्मराजमुटके
झकास वृत्तांत!
बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप
बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही
In reply to बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप by सुबोध खरे
एक कटींगवाला दुसर्या
In reply to बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही by धर्मराजमुटके
बरोबर आहे....पण ते एकटं असताना.....
In reply to एक कटींगवाला दुसर्या by अभ्या..
मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले
श्री मुटके यांचा खास
जियो
हा हा.. मिपा सोडुन
In reply to जियो by मी-सौरभ
सौरभने
In reply to जियो by मी-सौरभ
अरे पण अजुन्पर्यंत एकही फोटो
कट्टा झाला नसावा
In reply to अरे पण अजुन्पर्यंत एकही फोटो by प्रीत-मोहर
मागील रविवार झालेल्या कट्याची
अर्र साइझ चुकली
In reply to मागील रविवार झालेल्या कट्याची by माझीही शॅम्पेन
(No subject)
In reply to अर्र साइझ चुकली by माझीही शॅम्पेन
उच्चशिक्षण मंत्र्यांनी लाज राखली......
In reply to परेड by माझीही शॅम्पेन
न की ण?
In reply to (No subject) by माझीही शॅम्पेन
मस्तं फोटो आणि ओळख परेड.
+१
In reply to मस्तं फोटो आणि ओळख परेड. by पद्मावति
+१
In reply to +१ by नाखु
हो कारण हे पुणे नाही ना ;)
In reply to +१ by अजया
मस्त
नोंद घेतली गेली आहे.....
In reply to मस्त by नंदन
दणकट्टा!!
रंजक कट्टा.
हाहाहा !!!