प्राजूची "प्रवाह..आणि उत्तर" वाचली आणि लगोलग विडंबनाचे प्रवाही उत्तर स्फुरले ते असे..
काव्य अनावृत्त
मात्रा आणि वृत्त
शिष्य हा प्रवृत्त
झाला पहा
कविबुद्धी नाठी
हाणावीच काठी
विडंबना साठी
लगोलग
'धुकट सकाळ'
फुकता 'फुकट'
'चिकट' बिकट'
होत जाई
तोतयांचे बंड
विचारती गुंड
'चतुरंग' पुंड
गेला कोठे?
कविता 'म्हणजे'
वाघाचे हो पंजे
कशाला पाहिजे
वृत्त छंद
विसरा 'खोबार'
'शाळा' झाली फार
प्यावा थंडगार
सोमरस
काव्य 'हलकट'
करी खटपट
नाना पाठोपाठ
अवलिया
आवडती नार
आहे 'बुधवार'
टाकावी चिक्कार
सायंकाळी
कवी किती जण?
कवितांचे तण
उपटण्या मन
आतुरले
'केसूपंथी' खाज
विडंबन साज
मिपावर गाज
होत राही..
'रंगा'च सत्त्वर
देतो हे उत्तर
लोंबले लक्तर
विडंबनी..
चतुरंग
वाचने
3684
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+++++++१
In reply to +१ by अवलिया
मस्तच...
In reply to +++++++१ by पिवळा डांबिस
सह्ही..
प्रवाही
हे घ्या
In reply to प्रवाही by प्राजु
ये क्या हो रहा है?
प्रणाम
नुसते
In reply to प्रणाम by बिपिन कार्यकर्ते
जै तै...
In reply to नुसते by अवलिया
चिकट ते
In reply to जै तै... by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा...
In reply to चिकट ते by लिखाळ
आवडती
वावावा!
सर्किटशेठनी त्यांचे
In reply to वावावा! by बेसनलाडू
पोस्ट ग्रॅज्युएट?
In reply to सर्किटशेठनी त्यांचे by चतुरंग
नाही, तो मान आमच्या गुर्जींचा!
In reply to पोस्ट ग्रॅज्युएट? by बिपिन कार्यकर्ते
.