साहित्य
२ कांदे उभे चिरून
१ वाटी सुक्क खोबरं, किसून
२ माध्यम टोमॅटो
१ मूठ कोथिंबिरीच्या काड्या
१५ ते २० लसूण पाकळ्या
1 इंच आलं
२ तमालपत्र
१ दालचिनी
१० ते १२ काळेमिरे
१/२ चमचा तीळ
१/२ चमचा बडीशेप
१ बडी इलायची
२ ते ३ छोटी इलायची
१ चक्रीफुल
२ ते ३ लाल सुक्या मिरच्या
२ ते ३ लवंगा
२ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
२ चमचे कांदा लसूण मसाला
१ चमचा हळद पावडर
तेल आवश्यकतेनुसार
मीठ , चवीनुसार
बाकरवडी माणशी ३ ते ४
कोथिंबीर बारीक चिरून
बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा वरून भुरभुरायला
घरात प्रसिद्ध "अमुक" बंधूंचे (हो, उगाच जाहिरात नको) बाकरवडी चे पाकीट येऊन पडलेले. ह्या बाकरवड्या
थोड्याच दिवसात कडक होतात किंवा सादळतात, मग त्या खाण्याची मज्जा कमी होऊ लागली. म्हंटल करावा हा प्रयोग शेव भाजीच्या धर्तीवर. मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो.
शेव भाजीचा रस्सा/कट ह्याच्या असंख्य वेगळ्या पद्धती घराघरात आहेत, त्या वापरून शेवेच्या ऐवजी बाकरवड्या घालून बघा.
कृती
एक चमचा तेलावर खोबरं भाजून घ्या. त्याच पॅन मध्ये सगळे खडे मसाले, लाल मिरची मंद आचेवर भाजून घ्या. त्यात आलं, लसूण कोथिंबीर काड्या टाकून 2 मिनिटे परतून घ्या. पॅन मधून काढून गार करायला ठेवा. पॅन मध्ये परत एक चमचा तेल घालून कांदा खमंग भाजून घ्या.
मिक्सर मधून, टोमॅटो, खडा मसाला आणि कांदा बारीक करून घ्या. (मी आधी टोमॅटो प्युरी करून घेतले, मग इतर जिन्नसा बरोबर ते सगळं बारीक वाटून घेतलं). वाटताना पाणी वापरले तरी चालेल.
कढईत अर्धी वाटी तेल घाला. तेल गरम झालं की कढई गॅस वरून खाली घ्या आणि त्यात मिरची पावडर आणि कांदा लसुण मसाला घाला. (ह्याने अर्थातच तर्री ला मस्त रंग येईल, गॅस वरून काढल्यामुळे जळणार नाही) ह्यात आता वाटलेला मसाला घालून परत गॅस वर ठेवा.
हे आता आपल्याला तेल सुटे पर्येंत परतून घायचय. ह्यात आता ८ ते १० वाट्या पाणी घाला (तर्री किती घट्ट किंवा पातळ हवी त्यावर पाण्याचे प्रमाण ठरेल. मी अगदीच पातळ न करता थोडीशी घट्ट ठेवली). उकळी आली की गॅस कमी करून झाकून हि तर्री साधारण 20 ते 30 मिनिटे उकळत ठेवा, वर तेल सुटे पर्येंत. चव बघून, मीठ, चिमूटभर साखर घाला. शेवटी एका लिंबाचा रस घालून , वरून कोथिंबीर पेरा.

वाढताना, तर्रीला मस्त उकळी काढा, एका वाटीत काढून त्यात बाकरवडी कुस्करून, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो भुरभुरून, पाव, काकडी च्या चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला घ्या!
[मुलं खाणार असल्यामुळे मी हिरवी मिरची नाही वापरली, तसेच लाल मिरचीचे प्रमाण अगदी अल्प ठेवले. मी वापरतो तो कांदा लसुण मसाला बेताचा तिखट असल्यामुळे त्यानुसार वापरलाय.]

प्रतिक्रिया
अगागा.
पाकृचे फोटू चांगले आलेत पण
बादलीभर लाळ गाळल्या गेली आहे.
क्लास्स!!!!!
आहाहाहा.. जीव गेला..
बेश्ट....
कहर
शेवटचा फोटू पाहून दिवंगतलो
हरी ओम!
मी दिलेल्या तर्री ची पाककृती
In reply to हरी ओम! by तुषार काळभोर
ही ग्रेव्ही स्पेशल भाजीय.
मी दिलेल्या तर्री ची पाककृती
बाब्बो!!!!!!
दंडवत हो देवा!!
जबरदस्त फोटो
भारी
वा..
हेच्च हेच्च..
In reply to वा.. by स्वाती दिनेश
मग ह्यात फरसाण घालून मिसळ
In reply to वा.. by स्वाती दिनेश
खर्र खर्र खर्र सान्गा तुम्ही
हाहाहा... लोल
In reply to खर्र खर्र खर्र सान्गा तुम्ही by पियुशा
Ha ha
In reply to खर्र खर्र खर्र सान्गा तुम्ही by पियुशा
जबरदस्त.
आत्ताच करून पाहिली. चविष्ट
वाह, छान, फोटो असेल तर टेपवा
In reply to आत्ताच करून पाहिली. चविष्ट by एस
कॆडी
Wah
वा !
भाजी जबरा
अगागा!
तोंडाला पाणी
छान
शेवटचा फोटो लय कातिल आलाय राव
पहिलाच फोटो पाहून
बाकरवड्या मऊ होईस्तवर शिल्लक
मस्त.
खान्देशात अशाच ग्रेव्हीमध्ये
भारी!
In reply to खान्देशात अशाच ग्रेव्हीमध्ये by त्रिवेणी
एकदम सहीच दिसतेय.
एक नंबर.
झक्कास..!!!
आत्ताच हाती आलेल्या
समज द्यावी की...
In reply to आत्ताच हाती आलेल्या by मोदक
त्या प्रोफेशनल चोर आहेत
In reply to समज द्यावी की... by तुषार काळभोर
ऑ!!!!
In reply to त्या प्रोफेशनल चोर आहेत by पैसा
माझ्या ब्लॉगवरच्या अनेक
In reply to आत्ताच हाती आलेल्या by मोदक
तुम्ही प्लीज एक काम कराल का?
In reply to माझ्या ब्लॉगवरच्या अनेक by पूर्वाविवेक
Handsome aahe kaakoo. LOL
In reply to तुम्ही प्लीज एक काम कराल का? by मोदक
धन्यवाद पूर्वाविवेक नजरेस
In reply to माझ्या ब्लॉगवरच्या अनेक by पूर्वाविवेक
मला कळले नाही
In reply to धन्यवाद पूर्वाविवेक नजरेस by केडी
नुसता राग नका करु ताई,
In reply to मला कळले नाही by अनन्न्या
ज्यांच्या ज्यांच्या म्हणून
In reply to आत्ताच हाती आलेल्या by मोदक
आणि मिपावरच्या रेसिपीज उचलतात
In reply to ज्यांच्या ज्यांच्या म्हणून by सूड
प्रमोद तांबे मिपावरच्या पाकृ
In reply to आणि मिपावरच्या रेसिपीज उचलतात by सूड
केडी साहेब.. तुमच्या कलेला
तुमचे मनापासून आभार.
In reply to केडी साहेब.. तुमच्या कलेला by मराठमोळा
भारीच !!
ह्याच्यात जर त्या छोट्या
बाप्पू
In reply to ह्याच्यात जर त्या छोट्या by कैलासवासी सोन्याबापु
हायला, कसला त्यो भयानक शेरवा
फोटो एकदम कातील आलेत. रेसिपी
बाबौ!!!!
अरे वाह!
ह्यात भाकरवड्या बदली भाजणीची
रेसेपी आवडली
मस्त.. तर्री भारीच आहे.
तर्री भारीच आहे.
In reply to मस्त.. तर्री भारीच आहे. by रुपी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFTअहाहा.....लाजवाब दिसतेय ही
झकास पाक्रू
झन्नाट
@ केडी,
:-)) हाहा...
In reply to @ केडी, by अनिंद्य
झणझणीत