कावेलोसिम - स्वप्नातले गांव
लांऽऽबलचक सुट्टी हि प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते. जर का ती नेमकी हवी त्या वेळी मिळाली तर होणारा आनंद काय वर्णावा, अर्थात हा आनंद फार कमी वेळा वाट्याला येतो म्हणा. सुट्टी घालवायची कशी हा सांप्रतला फार कठीण प्रश्न बनून राहिलेला आहे. 'सुट्टी घालवण्याची ठिकाणे' या बाबतीत प्रत्येकाच्या मनातील कल्पनांची जर का माहिती गोळा करायची ठरवली तर एक अत्यंत रोचक यादी तयार होईल यांत काही शंका नाही. पण खरा प्रश्न उभा राहतो तो इथेचं.
प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन एखाद्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करणे हा एक अवघड प्रकार असतो. नवरा गोवा म्हणत असेल तर बायको हमखास राजस्थान वगैरे काही तरी म्हणत असते. आपण शिमला म्हणायचा अवकाश लगेचं अर्धांग केरळ म्हणतं.
त्यांत पुन्हा आपल्याला सुट्टी असते तेव्हा हवे ते हॉटेल ,रिसॉर्ट मिळत नसते आणि जेव्हा ते मिळते तेव्हा आपल्याला सुट्टी घेणे शक्य नसते. 'प्लॅनड लिव्ह' टाकणे आणि त्यानुसार सुट्टीचे वेळापत्रक आखून हॉटेल वगैरे बुक करून ठेवणे हा माझ्यासारख्यांसाठी मोठा दिव्य प्रकार आहे. मुळात कुठलीचं गोष्ट प्लॅनिंग करून करणे हे लै डेंजर काम असतंय.
लग्नानंतर पोरं सुद्धा प्लॅनिंग नुसार होऊ देणाऱ्या लोकांचं मला जाम कुतूहल वाटत आलेलं आहे. बोंबलत उंदडायचे प्लॅनिंग कसे करायचे हे अजून तरी मला कळलेले नाही.
रोजच्या रगाड्यातून आणि वेळापत्रकातून सुटका हाचं एकमेव हेतू असलेली सुट्टी परत वेळापत्रक आखुन
घालवण्यात काय मतलब ?
कुठल्या तरी टूर सोबत फिरायला जाणे हा अनुभव एकदाचं घेतला आणि त्या प्रकाराला कायमचा राम राम ठोकला. सकाळी लवकर उठून दिवसभर धावपळ करत प्रेक्षणीय(?) स्थळे पाहणे, टूर वाले सांगतील तिथे व मिळेल ते गपगुमान खाणे आणि रातच्याला हॉटेलवर जाऊन मगचं बूड टेकवणे हा असला प्रकार काय मला झेपत नाही.
माझी सुट्टीची एक आदर्श कल्पना आहे. साधारण एक भाग डोक्यात धरायचा आणि गाडी काढून तिकडे सुटायचं.
एखाद्या शांत निवांत गावाला जाऊन धडकायचं. दोन म्हणता चार वेळा चांगलं चुंगलं खाऊन पिऊन लोळत पडायचं.
गावाला समुद्रकिनारा असणे मस्ट (त्याचं काये आम्हा घाटी लोकांना समुद्राचं फार आकर्षण आहे).
निसर्गरम्य किनारे,आजूबाजूला हिरवीगार जंगले, अत्यंत तुरळक गर्दी आणि भरपेट जेवलेल्या अजगराप्रमाणे सुस्त पडलेले गांव हे कॉम्बिनेशन मला फार आवडते. सगळं कसं एकदम निवांत पाहिजे. आज काल बऱ्याच ठिकाणी हा निवांतपणाच मिळणे दुर्लभ झालेय. महाबळेश्वर वा तत्सम ठिकाणी निवांतपणा हुडकत जाणे म्हणजे वाळवंटात बर्फ पाहायला जाण्यासारखे आहे. कोकणात देखील बऱ्याचं किनाऱ्यांवर हीच बोंब झालेली आहे.
स्वप्नातल्या सगळ्या कल्पनांमध्ये एकदम फिट्ट बसणारा हा गाव मला अचानक अल्लाद्दिन ला जादूचा दिवा सापडावा तसा सापडला. असाचं गोव्यात कोळव्याच्या आजुबाजूला बोंबलत फिरत असताना अवचित 'कावेलोसिम' (गोवन बंधू भगिनींनी उच्चाराबद्दल माफ करावे) गाव हाताला लागले. अगदी 'लव ऍट फर्स्ट साईट' म्हणतात तसे एकदम पाहाताक्षणीचं हे गाव मला अतिप्रचंड आवडून गेले. हिरवळीने नटलेल्या टेकड्या,निसर्गरम्य गुळगुळीत रस्ते, दुतर्फा नारळांची उंचच उंच झाडे असे एकदम सर्वगुणसंपन्न म्हणावे तसे गांव. एकंदरीत गाव सुद्धा अतिशय स्वच्छ आणि टापटीप वाटले. घाटावरची खेडी त्यामानाने बरीचं अस्वच्छ असतात. गावात लोकवस्ती सुद्धा एकदम मोजकीचं. गावाच्या लोकसंख्येपेक्षा आलेले पर्यटक सुद्धा जास्त भरावेत,त्यांतले जवळपास सगळे परदेशी. गावात पोचलो तेव्हा कर्फ्यु लागलाय कि काय अशी शंका मनाला चाटून गेली.
अतिशय सुंदर असा पांढऱ्या वाळूचा स्वच्छ किनारा आणि त्यावर भर डिसेंबर महिन्यात अजिबात नसलेले लोक पाहून तर मला आनंदाने वेडचं लागायचे बाकी राहिले होते. पहिल्यांदा गेलो तेव्हा किनाऱ्यावर मोजून पाच लोक हजर होते, त्यांतले आम्ही दोघं आणि तीन जीवरक्षक. बास्स. .लगेचं ठरवून टाकले कि उरलेल्या दिवसांचा तळ इथेचं टाकायचा.
शांतादुर्गेची मूर्ती पूर्वी याचं गावी होती म्हणे, इन्क्विझिशन च्या काळात हलवली गेली असे म्हणतात. या गावात 'साल' नदी समुद्राला येऊन मिळते.
तळ टाकायचा ठरवून तर टाकले होते पण कुठे ऐन वेळेला कुठे बुकिंग मिळेल का याची धाकधूक होतीचं.
गावात रॅडिसन, हॉलिडे इन, द लीला आणि डोना सिल्विया वगैरे मोजून चार पाचचं रिसॉर्ट आहेत.सगळीकडे जाऊन चौकश्या करायला सुरुवात केली.जवळपास सगळ्याचं ठिकाणी जागा उपलब्ध होती. 'द लीला गोवा' चे दर पाहिले आणि एक मिनिट देखील वाया न घालवता माघारी फिरलो. साला युरोप टूर होईल इतका एका दिवसाचा दर होता. त्यामानाने बाकीचे रिसॉर्ट बरेचं परवडेबल आहेत. गावाजवळ बरेचं सर्व्हिस अपार्टमेंट सुद्धा अतिशय स्वस्तात मिळतात पण त्यांना रिसॉर्ट ची सर नाही. मुख्य कारण म्हणजे सगळे रिसॉर्ट किनाऱ्याला लागून आहेत.
खाण्या पिण्यासाठी सुद्धा एवढ्या छोट्याश्या गावात मुबलक पर्याय उपलब्ध आहेत.
साल नदीच्या मुखापाशी 'फिशरमन्स व्हार्फ' रेस्टॉरंट आहे. जबरदस्त लोकेशन आणि अफलातून चवीचे जेवण हा संगम येथे जुळून येतो. आटोपशीर असा पण नानाविध कॉकटेल्स पुरवणारा लाकडी बार काउंटर आत घुसल्यापासून खुणावत राहतो. तिथले प्रॉन्स चे पदार्थ तर भयानक चविष्ट आहेत. जवळपासचं एक चायनीज रेस्टोरंट आहे ते सुद्धा चवीला उत्तम आणि अत्यंत वाजवी दरांत.
एका रात्री भूक लागल्यामुळे मी इकडे तिकडे भटकत असताना 'माईक्स प्लेस' म्हणून एक हॉटेल रात्री बऱ्यापैकी उशिरापर्यंत चालू असते हा शोध लागला. काही खायला मिळेल का या उद्देशाने आत डोकावलो तर काही परदेशी पर्यटक मंडळी गाणी वगैरे म्हणत वेळ घालवत होती. आत गेलो आणि एक टेबल धरून उगाचं बसून राहिलो. मी बसलेला बघून थोड्या वेळाने हॉटेलचा मालक 'माईक' जवळ आला आणि काय हवे नको विचारपूस करू लागला. रात्री एकच्या आसपास त्यानी अप्रतिम चवीचा पोर्क राईस आणि गोवन फिश करी असा मेनू तयार करून दिला. तेव्हापासून कधीही कावेलोसिम ला गेलो कि 'माईक्स प्लेस' ला भेट देणे होतेचं.गावातल्या मुख्य रस्त्यावर संध्याकाळी एक दोन हातगाड्या लागतात. तळलेले मासे वगैरे खाण्यासाठी झकास स्पॉट आहे हा. प्रसिद्ध असे 'मार्टिन्स कॉर्नर' सुद्धा कावेलोसिम पासून जेमतेम पंधरा किमीवर आहे.
मुळात या भागातले रस्ते इतके नयनसुखद आहेत कि पंधरा वीस किमी जेवण्यासाठी जाऊन यायला काहीचं वाटत नाही. गोव्याला भेट देणाऱ्या बऱ्याचं जणांचे आकर्षण असलेल्या बागा बीचवरचा 'टिटो'ज क्लब' ची या गावात सुद्धा एक शाखा आहे. फरक इतकाचं कि गर्दी अत्यंत कमी असते. आतापर्यंतच्या अनुभवातून मला उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोवा अधिक भावलेला आहे.
मनमुराद आळस उपभोगणे, खाण्या पिण्याची चंगळ करणे आणि सुशेगाद पडून राहणे हे सर्व करता येण्यासारखे 'स्वप्नातले गांव' अखेर मला सापडलेचं.
एकंदरीतच सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी हे 'कावेलोसिम' एकदा अनुभवाचं.
वाचने
20613
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
केळोशीबद्दल लिहिलंय का तुम्ही
In reply to केळोशीबद्दल लिहिलंय का तुम्ही by यशोधरा
यशो अग हल्ली त्याला कावेसोशीच
In reply to यशो अग हल्ली त्याला कावेसोशीच by प्रीत-मोहर
कावेसोशी!!??!! हम्म्म...
In reply to कावेसोशी!!??!! हम्म्म... by यशोधरा
प्रिमोतै आणि यशोतै,स्थानिक
In reply to प्रिमोतै आणि यशोतै,स्थानिक by गणामास्तर
गणामास्तर,
In reply to यशो अग हल्ली त्याला कावेसोशीच by प्रीत-मोहर
कावेलोशी. सॉरी ग टायपो झाला
In reply to कावेलोशी. सॉरी ग टायपो झाला by प्रीत-मोहर
तेच ते गं. :) केळोशी म्हणायचं
In reply to तेच ते गं. :) केळोशी म्हणायचं by यशोधरा
ते पोर्तुगेज स्पेलिंगमुळे
In reply to ते पोर्तुगेज स्पेलिंगमुळे by पैसा
मध्यंतरी मित्रमंडळ गोव्याला
In reply to मध्यंतरी मित्रमंडळ गोव्याला by सूड
हो ना, देवनागरीत लिहीताना
In reply to हो ना, देवनागरीत लिहीताना by प्रीत-मोहर
गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे
In reply to गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे by गॅरी ट्रुमन
Sanguem - सांगे, Curchorem -
In reply to Sanguem - सांगे, Curchorem - by यशोधरा
Salcette - साष्टी का साळशेत??
In reply to Salcette - साष्टी का साळशेत?? by प्रचेतस
साष्टी/ सासष्टी हे मी ऐकले
In reply to Salcette - साष्टी का साळशेत?? by प्रचेतस
साळशेत
In reply to Sanguem - सांगे, Curchorem - by यशोधरा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
ही पहा एक लिंक, इथे गोव्यातील
In reply to ही पहा एक लिंक, इथे गोव्यातील by यशोधरा
वा!
In reply to Sanguem - सांगे, Curchorem - by यशोधरा
कुपे नाही ग केपें
In reply to कुपे नाही ग केपें by प्रीत-मोहर
मागे कधीतरी स्पेलिंग बदल
In reply to गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे by गॅरी ट्रुमन
Curtorim - हे बहुतेक कुठ्ठाळे
In reply to Curtorim - हे बहुतेक कुठ्ठाळे by यशोधरा
नाही
In reply to नाही by पैसा
ओह, अच्छा! धन्यवाद पैतै. :)
In reply to नाही by पैसा
मंगेशी
जबरदस्तीने'त्यांच्या आगमनाच्या आनंदाखातर' जबरदस्तीने धर्मांतरे करण्यास सुरू केल्याने, काही सजग हिंदू भक्तांनी देव तिथून उठवून, ते आता आहेत तेथे, म्हणजे प्रियोळ येथे आणले व देऊळ तिथे पुनः वसवले.In reply to गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे by गॅरी ट्रुमन
https://github.com
फाऊल फाऊल फाऊल
फोटु कुठेत?
सुंदर गाव आहे हे. आम्ही
पुढच्या वेळी सुट्ट्यांची
परवाच ऐकले होते तुमच्याकडून
ओह हो
एक राहिलं
मस्तं लिहिलंय ! पण फोटो
कधी जायचं मास्तुरे?
फोटो बद्दल
ट्रिप प्लानिंग वगैरे करायचा
छान माहिती.
छान लिहिलंय
जाणार म्हणजे जाणार इथे.. फोटो
फोटू टाका
..
फोटू आवडले
In reply to फोटू आवडले by गॅरी ट्रुमन
फोटो???
मस्त लिहिलंय रे अनुप... मी
वाखु साठवली आहे.डिसेंबरात
द. गोवा हे भारी आहे असे
खूप छान!
छान लिहलय.
सदर गावांचे नाव केळशी आहे.
In reply to सदर गावांचे नाव केळशी आहे. by साहना
ते शिवरायांचे गुरु बाबा
In reply to ते शिवरायांचे गुरु बाबा by अभ्या..
श्रध्दास्थान असे म्हणले तरी
In reply to ते शिवरायांचे गुरु बाबा by अभ्या..
काही माहिती नाही केळशी नावाची
In reply to ते शिवरायांचे गुरु बाबा by अभ्या..
बाबा याकूतांचे
गणामास्तर, लै भारी... फोटो न
छान!
सगळ्यात भयंकर मोडतोड ....
In reply to सगळ्यात भयंकर मोडतोड .... by गामा पैलवान
... आणि Arpora = हडफडे.
In reply to ... आणि Arpora = हडफडे. by आदूबाळ
आबा अजुन भरपूर भयंकर
मस्ताड लिहिलंय ! केळोशी
भारीच !!
मास्तर कुठे राहिला होतात
In reply to मास्तर कुठे राहिला होतात by टर्मीनेटर
खरडवही मध्ये देतो हॉटेल्स चे
In reply to खरडवही मध्ये देतो हॉटेल्स चे by गणामास्तर
बाकीच्यांनी काय .... ??
In reply to बाकीच्यांनी काय .... ?? by हलकट बाब्या
बाब्या लका, खरडवहीत लिहिले
आवो मास्तर समदे फोटु
In reply to आवो मास्तर समदे फोटु by कंजूस
कंकाका _/\_ =))
In reply to कंकाका _/\_ =)) by यशोधरा
+१११
In reply to +१११ by प्रीत-मोहर
दोस
In reply to +१११ by प्रीत-मोहर
नाही गं विसरले नाही, किती
In reply to नाही गं विसरले नाही, किती by यशोधरा
स्लर्प.खरय.
वाह वाह सुरेख लेखन !
In reply to वाह वाह सुरेख लेखन ! by प्रसाद गोडबोले
तुम्ही गेलाय का तिकडे कधी ?