मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हणजे...

शितल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
"ओढ" म्हणजे काय ते  जीव लावल्याशिवाय समजत नाही.  "विरह" म्हणजे काय ते  प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.  "प्रेम" म्हणजे काय ते  स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.

वाचने 5815 वाचनखूण प्रतिक्रिया 27

पिवळा डांबिस Tue, 02/03/2009 - 00:51
कविता आवाडली... आमचा व्हर्शन लवकरच देतोंव!!! :) निवेदनः आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा:)

वाह शितल. छान कविता केली आहेस. आवडली. (दारू म्हणजे काय ते स्वतः प्यायल्या शिवाय समजत नाही ) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन Tue, 02/03/2009 - 07:40
मस्तच आहे कविता, एकदम साधी सरळ आणि सोपी आहे. ( विडंबन करायला तर लै लै लै सोपी आहे, ;) ) बाकी पेशव्यांशी "१००% सहमत" ... - बेंगलोरचा पेशवा छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

दशानन Tue, 02/03/2009 - 10:10
जबरदस्त ! कोल्हापुरच्या पाण्यात कवितेचा गुण :? म्हणजे मी पण कविता लिहू शकतोच की :D *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

In reply to by छोटा डॉन

मनस्वी Tue, 02/03/2009 - 10:16
> मस्तच आहे कविता, एकदम साधी सरळ आणि सोपी आहे. असेच म्हणते. कविता छान आहे.

चतुरंग Tue, 02/03/2009 - 01:18
मला वाटतं तुझी पहिलीच कविता असावी, निदान मिपावरची तरी! अभिनंदन! (विचार मनात भरुन वाहिले की कवितेचं रुप घेतात का?) चतुरंग

शाल्मली Tue, 02/03/2009 - 02:10
सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
मस्त! कविता आवडली. --शाल्मली.

अनामिक Tue, 02/03/2009 - 02:19
शितल तै... तुझे लेख/कविता (पहिलीच का असेना) अगदि साध्या सोप्या भाषेत असतात... त्यामूळे लगेच आवडतात! अनामिक

पक्या Tue, 02/03/2009 - 03:09
कविता तितकीशी आवडली नाही. फारच गद्य वाटतीये...सुविचार वाचल्यासारखे वाटतात...जसे 'मुले म्हणजे देवाघरची फुले'.

In reply to by पक्या

सहज Tue, 02/03/2009 - 07:35
असहमत "कविता" म्हणजे काय ते विडंबन झाल्याशिवाय समजत नाही. :-)

In reply to by सहज

सुनील Tue, 02/03/2009 - 08:37
एक सोडून तीन-तीन विडंबने झालीत, महाराजा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पक्या Tue, 02/03/2009 - 07:44
ह्म्म्म्...मान्य. त्यामुळेच 'म्हणजे ' वरची पिडा आणि इतरांची विडंबने वाचून मजा आली.

झेल्या Tue, 02/03/2009 - 10:48
आवडली.. "प्रेम" म्हणजे काय ते पडल्याशिवाय (प्रेमात किंवा तोंडावर) समजत नाही :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

शितल Tue, 02/03/2009 - 20:08
मनापासुन सर्वाचे धन्यवाद :) आता "म्हणजे" वर इतकी विडंबन झालीत की माझी कविती कोठे गेली तेच मी शोधत होते. ;) बाकी म्हणजे वरची सर्वच विडंबन एकदम मस्त झाली, विडंबनांनी हसुन हसुन हैराण झाले. :)

रेवती Wed, 02/04/2009 - 20:14
उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व! आत्ताच वाचली कविता. अगदी मनातून सहजपणे उतरून मिपावर (कागदावर म्हणायचे आहे) आलीये. त्यावरची विडंबने वाचली नाहीत. सवडीने वाचीन. रेवती

विसोबा खेचर Wed, 02/04/2009 - 23:41
सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही. लाख रुपये की बात! शितल, जियो..! तात्या.