खादाडरावांची झाली फजिती
लेखनविषय:
काव्यरस
एक होता छबु
भलताच ढबू
बुद्धिचा जड
पण करी बडबड
एकदा झाली गम्मत
बसली होती पंगत
जेवायला होते लाडू
छबु किती वाढू
लाडू खाल्ले अठ्ठावीस
जीव झाला कासाविस
पोट आले फुगून
मग गेला भिऊन
पोट लागले दुखायला
तसा लागला लोळायला
रडला ओरडला तरी किती
खादाडरावांची झाली फजिती
-- संग्रहित
वाचने
2993
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
कसली भारी कविता.
संग्रहीत चालत असली/नसली तरी मला आवडली ब्वा.
मस्त मस्त.
तुमीबी कायतरी लिवाकी
अच्च झालं?
याचा पुढचा भाग आम्चे गुर्जी ल्हिआयचे एके काळी
In reply to याचा पुढचा भाग आम्चे गुर्जी by टवाळ कार्टा
शेवटच्या शब्दाशी साधर्म्य दाखविणार्या ओळी वर ही कवीता करीत असत ते सांज समयी.
नाखु साक्षीदार
मजेशीर.
गोड आहे कविता.
मजेदार . अशीच एक "मस्त मंडळी ..सुस्त होऊया.." कविता पुर्वी ऐकली होती .
कसली भारी कविता.