खादाडरावांची झाली फजिती
लेखनविषय:
काव्यरस
एक होता छबु
भलताच ढबू
बुद्धिचा जड
पण करी बडबड
एकदा झाली गम्मत
बसली होती पंगत
जेवायला होते लाडू
छबु किती वाढू
लाडू खाल्ले अठ्ठावीस
जीव झाला कासाविस
पोट आले फुगून
मग गेला भिऊन
पोट लागले दुखायला
तसा लागला लोळायला
रडला ओरडला तरी किती
खादाडरावांची झाली फजिती
-- संग्रहित
वाचने
2991
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
कसली भारी कविता.
संग्रहीत?
अच्च झालं?
याचा पुढचा भाग आम्चे गुर्जी
In reply to याचा पुढचा भाग आम्चे गुर्जी by टवाळ कार्टा
या प्रतिसादातील
मजेशीर.
गोड आहे कविता.
मजेदार .