रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!
या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली.
तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले. रंजक वाटले मला हे कळल्यावर!
सकाळी ११ च्या आसपास कंजूस काकांना फोन केला आणि १ वाजता आम्ही बदलापूर ला भेटलो. बदलापूर पश्चिमेला एस टी स्थानक आहे. तेथून मुरबाड ला बस आहेत. बारवी धारण मार्गे जाणारी बस पकडली आणि आमचा प्रवास सुरू! बदलापूर गावाबाहेर पडल्यानंतर बसमधून दिसणारा निसर्ग दृष्ट लागण्याजोगाच! जेमतेम १८ किमी वर बारवी धरण लागते. बारवी धरण हे कल्याण आणि नवी मुंबईला पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. सव्वीस जुलै च्या प्रलयंकारी पावसावेळी धरण पूर्ण भरले होते आणि पाणी कल्याण भिवंडीत खांद्यापर्यंत साचले होते. धरणाचा परिसर वृक्षवैविध्याने नटाला आहे. भोकर , मोह आणि इतर झाडे येथे भरभरून आहेत. धरण मोठे आहे. रिमझिम पावसामुळे या भागात फिरण्यास मजा आली . विशेष म्हणजे शनिवार रविवार न जाता आम्ही मंगळवारी भेट दिल्यामुळे गर्दी आणि हुल्लडबाजी टाळून निसर्ग जवळून बघता आला. तिथे एक स्थानिक रहिवासी आताच्या मोसमात येणाऱ्या भाज्या गोळा करत होते. कंकाकांनी या भाज्यांबद्दल लिहावे अशी विनंती. सध्या नुकताच पाऊस सुरू असलेने आजूबाजूला थोडे पाण्याचे झरे पाहिले.
एकंदरीतच सुट्टी नसलेल्या दिवशी संवड काढून अशी ठिकाणे पाहणे उत्तम! पण हे कर्णोपकर्णी करु नका हं!
फोटो देत आहे. बाकीचे फोटो कंकाकांनी द्यावेत अशी त्यांना विनंती करतो .
रस्ता:
धरण
कंकाकाका आणि मी
परिसर
रहिवासी आणि भाज्या
धरण
कंकाकाका आणि मी
परिसर
रहिवासी आणि भाज्या
वाचने
13592
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
मस्त! फक्त फोटो रिसाईझ करुन
छान भटकंती.लहानपणी बारवी
In reply to छान भटकंती.लहानपणी बारवी by अजया
म्हातार पणी मी
In reply to म्हातार पणी मी by चौकटराजा
:प
In reply to म्हातार पणी मी by चौकटराजा
पांडूकाकाचं बोट धरुन जायला
तो ओढा डुंबायला कस्ला मस्त
In reply to तो ओढा डुंबायला कस्ला मस्त by टवाळ कार्टा
आमच्या घरापासून चालत
सर्वांना मनापासुन धन्यवाद!
फोटो टाकतो नंतर.
कंंजूसकाकांबरोबर भटकायला जाम
In reply to कंंजूसकाकांबरोबर भटकायला जाम by प्रचेतस
+१
खूपच छान भटकंती.
वृत्तांत आवडला.... पण.....
धन्यवाद मुवि
In reply to धन्यवाद मुवि by शान्तिप्रिय
जरूर.
फोटो
तसेच बदलापूर हे नाव कसे पडले
In reply to तसेच बदलापूर हे नाव कसे पडले by प्रचेतस
तुम्हाला
In reply to तुम्हाला by नाखु
तो प्रश्न नाही.
In reply to तो प्रश्न नाही. by प्रचेतस
'बदल' हा शब्द शिवकालीन
In reply to 'बदल' हा शब्द शिवकालीन by सूड
=))
In reply to तो प्रश्न नाही. by प्रचेतस
बदल
नावाबद्दल आणखि ही काही
ती चॉकलेटी कळीसारखी भाजी आहे
In reply to ती चॉकलेटी कळीसारखी भाजी आहे by गौतमी
त्याच कंदातून( सुरणासारखा कंद
शेवळं
डॅम
In reply to डॅम by पीशिम्पी
प्रतिसादातला तीन नंबरचा फोटो
In reply to प्रतिसादातला तीन नंबरचा फोटो by कंजूस
यन्दा उशीरा भरेल
छान लेख..
जलाशयाचा जवळुन फोटो घेतला
खुप छान. पण धरणाजवळ जायला
तलावाच्या मागच्या बाजूने
अजुन काही मागच्या आठवड्यातले
फोटो दीसत नाही,
पुन्हा एक प्रयत्न अपलोड करायचा
अजुन एक
गाडी सोबत
फोटो मस्त, रघुनाथ .केरकर.
In reply to फोटो मस्त, रघुनाथ .केरकर. by कंजूस
धन्यवाद
ती शेवळ आहेत आणि दुसरी भाजी