ईशान्येच राजकारण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big WorldIn reply to माहितगार साहेब, आपण संदर्भाची by मदनबाण
In reply to @ मदनबाण संदर्भ बातमी नमुद by माहितगार
In reply to माहितगार साहेब, आपण संदर्भाची by मदनबाण
In reply to Arunachal: Making of the by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रIn reply to 'देर आए दुरुस्त आए' म्हणत by माहितगार
'देर आए दुरुस्त आए' म्हणत सुप्रीम कोर्टाने अरुणाचल प्रदेशात डिसेंबर १५ची स्थिती पुन्हा बहाल करण्याचा निर्देश दिला असल्याची बातमी आहे.हा सगळाच प्रकार संशयास्पद वाटत आहे. काँग्रेस सरकारमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या नेत्याने भाजपसह सरकार स्थापन केले आणि नंतर त्या सरकारने आपले बहुमत विधानसभेत सिध्दही केले होते. मग आता या सरकारने आपले बहुमत गमावले आहे अशी परिस्थिती नसताना जुन्या काँग्रेस सरकारला परत बहाल करा असा आदेश कोर्ट कसा काय देऊ शकते? सभागृहात बहुमत असणे हा कोण सत्तेत राहणार याचा कळीचा मुद्दा आहे आणि तो लोकशाहीचा मुख्य गाभा आहे. कोणाला बहुमत आहे याचा निर्णय सभागृहाच्या पटलावरच करता येऊ शकतो. आता या परिस्थितीत विद्यमान सरकारने बहुमत गमावलेले नसताना ज्या नेत्याला बहुमत नाही त्या नेत्याला परत मुख्यमंत्री बनवायचे आणि मग जर त्या सरकारचा पराभव झाला तर परत सध्याच्या सरकारला सत्तारूढ करायचे? ही गोष्ट समजली नाही. कोर्ट फार तर जुने सरकार परत बहाल करा हा निर्णय देऊ शकेल पण आमदारांनी त्या सरकारच्याच बाजूने मत द्यावे हा आदेश कसा काय देऊ शकेल? एकूणच हा सगळा प्रकार ज्युडिशिअल ओव्हररिचचा आणि संशयास्पद वाटत आहे.
In reply to संशयास्पद by गॅरी ट्रुमन
In reply to संशयास्पद by गॅरी ट्रुमन
एकूणच हा सगळा प्रकार ज्युडिशिअल ओव्हररिचचा..सुरवाती पासून बातम्यांचा ट्रॅक न ठेवल्या मुळे तसे वाटत नाहीए ना ? गव्हर्नर ओव्हररिच आणि विधानसभा सभापती ओव्हररिच यांच्या ओव्हररिचचे खापर न्यायालयाच्या नावाने फुटत असण्याची शक्यता नाहीना हे तपासावे लागेल अर्थात मूळ निकाल वाचायला मिळणे केव्हाही उत्तम
In reply to एकूणच हा सगळा प्रकार by माहितगार
In reply to ओव्हररिच by गॅरी ट्रुमन
In reply to न्यायालय नक्कीच यांचे किंवा by माहितगार
Arunachal Pradesh governor Jyoti Prasad Rajkhowa's decision advancing session of the state assembly by a month is violative of the Constitution and is liable to be quashed.
In reply to न्यायालय नक्कीच यांचे किंवा by माहितगार
न्यायालय नक्कीच यांचे किंवा त्यांचे सरकार यावे असा निर्णय देणार नाहीतरीही--- १. न्यायालयाने काँग्रेसचे सरकार परत बहाल करावे असा निर्णय दिला आहे हे तर स्पष्टच आहे? २. सध्याच्या सरकारने बहुमत गमावले आहे अशी कोणतीही परिस्थिती नाही. आणि जरी तशी परिस्थिती असती तरी सरकारने खरोखरच बहुमत गमावले आहे की नाही याचा निर्णय राज्य विधानसभेतच व्हायला हवा.ते कोर्टाने सांगायचे काम नाही. ३. जर का पक्षांतरे वैध आहेत की नाही हा निर्णय न्यायालयापुढे असेल आणि या आमदारांचे पक्षांतर अवैध आहे (म्हणजेच त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले आहे) असा निर्णय न्यायालयाने दिला असेल तरी परत जुने सरकार बहाल करा हा निर्णय द्यायची तर्कसंगती लागत नाही. त्या आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले आहे एवढा निर्णय देणे नक्कीच कोर्टाच्या अधिकारात येते. त्यानंतर सरकारने बहुमत गमावले आहे का याचा निर्णय राज्य विधानसभेतच व्हायला हवा आणि सरकारने बहुमत गमावले असेल तर मग कोणाला नवा मुख्यमंत्री नेमावे, त्या नव्या मुख्यमंत्राला किती दिवसात बहुमत सिध्द करायला सांगायचे इत्यादी गोष्टी राज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात येतात. पण या आमदारांचे पक्षांतर अवैध आहे म्हणून जुन्या मुख्यमंत्रांनाच परत सत्तेवर आणा हे सांगायचा अधिकार कोर्टाचा कसा?
In reply to मुद्दे by गॅरी ट्रुमन
त्यानंतर सरकारने बहुमत गमावले आहे का याचा निर्णय राज्य विधानसभेतच व्हायला हवा आणि सरकारने बहुमत गमावले असेल तर मग कोणाला नवा मुख्यमंत्री नेमावे, त्या नव्या मुख्यमंत्राला किती दिवसात बहुमत सिध्द करायला सांगायचे इत्यादी गोष्टी राज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात येतात.तुमच्या या मुद्यात बळ आहे खरे, न्यायालयीन बाजू समजून घेण्यासाठी न्यायालया समोर झालेले युक्तिवाद आणि न्यायालयाचा निकाल मूळातून वाचावा लागेल.
पण या आमदारांचे पक्षांतर अवैध आहे म्हणून जुन्या मुख्यमंत्रांनाच परत सत्तेवर आणा हे सांगायचा अधिकार कोर्टाचा कसा?राष्ट्रपती राजवट आणि नंतर भाजपा सरकार येऊ देतानाच घटनात्मक निर्णयानंतर पूर्व तारखेने स्थिती पूर्वपदावर आणली जाऊ शकेल असे न्यायालयाने बहुधा आधीच स्पष्ट केले होते.
In reply to संशयास्पद by गॅरी ट्रुमन
In reply to घटनाक्रमातील खालील घटना by श्रीगुरुजी
त्यामुळे ६० सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसकडे फक्त १७ आमदार शिल्लक आहेत. फक्त १७ आमदारांच्या बळावर सरकार कसे स्थापन करणार?तेच म्हणतो. सध्या बहुमतात असलेल्या सरकारला पायउतार करून अन्य कोणाला सत्तेत पाचारण करायचा प्रकार अनाकलनीय आहे.
In reply to घटनाक्रमातील खालील घटना by श्रीगुरुजी
In reply to शंका.... by मन१
In reply to शंका.... by मन१
In reply to शंका.... by मन१
६० पैकी १७ आमदार घेउन काँग्रेस सरकार बनवत असेल तर बनवू देत की. राजरोस अविश्वास ठराव आणून ते सरकार उर्वरित ४३ जणांना पाडता येण्यात काय अडचण आहे ?याविषयी दोन गोष्टी आहेत. १. घटनात्मक दृष्टीकोनातून सरकार बनवायला कोणाला पाचारण करावे याविषयी कोणतेही निर्बंध राष्ट्रपती/राज्यपालांवर नाहीत. जरी राष्ट्रपती/राज्यपालांनी एखाद्या एकट्या अपक्षाला पंतप्रधान्/मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली तरी त्यावर घटनेत काहीच आडकाठी नाही.अर्थातच असे सरकार बहुमताअभावी फार काळ चालायचे नाही पण असे सरकार स्थापन व्हायला काहीच अडचण नसावी. तरीही एखाद्या राष्ट्रपती/राज्यपालाने असा निर्णय घेतला तर त्याचे समर्थन होऊ शकेल असे वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे एक घटनात्मक पद भूषवत असलेल्या राष्ट्रपती/राज्यपालांची देशात्/राज्यात एक स्थिर सरकार यावे आणि अनागोंदी असू नये यासाठी काम करायची जबाबदारी असते. ती गोष्ट राज्यघटनेत लिहिली नसली तरी घटनासमितीने ती गृहित धरली असावी. हीच गोष्ट न्यायालयाला का लागू होऊ नये? म्हणजे नंतर असे अल्पमतातले सरकार पडणारच आहे म्हणून कोणालाही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसविणे कसे काय समर्थनीय आहे? २. १९९६ मध्ये निवडणुकांनंतर शंकरदयाळ शर्मांनी अटलबिहारी वाजपेयींना सरकार बनवायला पाचारण केले होते. त्याविषयी बोलताना कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की शर्मांचा तो निर्णय चुकीचा होता. याचे कारण वाजपेयी १९३ पेक्षा जास्त लोकसभा सदस्यांचे समर्थन सादर करायच्या स्थितीत नव्हते तर त्याचवेळी युनायटेड फ्रंटचे देवेगौडा स्वतःचे १७८ आणि काँग्रेसचे १४० असे ३१८ सदस्यांचे समर्थन घेऊन तयार होते. अशावेळी ३१८ सदस्यांचे समर्थन असलेल्याला सरकार बनवायला पाचारण न करता १९३ सदस्यांचे समर्थन असलेल्याला पाचारण करणे कसे योग्य आहे? त्यातून एका अर्थी शर्मांनी घोडेबाजाराला उत्तेजन दिले नाही का? वाजपेयींनी तसे काही केले नाही हे चांगलेच झाले पण असा निर्णय शर्मांनी घेणे चुकीचे होते. याविषयी माझेही मत हेच आहे. कपिल सिब्बलचे नाव केवळ त्यांनी ते एका चर्चेत म्हटले होते म्हणून लिहिले आहे. हीच गोष्ट कोर्टाची. जर ४३ सदस्यांचा पाठिंबा घेऊन दुसरा तयार असेल तर त्याला पदावरून काढून १७ सदस्यांचा पाठिंबा घेऊन असलेल्याला मुख्यमंत्रीपदावर बसविणे कसे समर्थनीय आहे?
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
In reply to आभार.... by मन१
कोर्टाला थोडाफार टी पी करायचाच असेल (शंकरदयाळ शर्मांनी केला तसाच ) तर प्रॉब्लेम काय आहे, असे विचारत होतो.टि पी? हा काय पोरखेळ वाटला का?
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
२. १९९६ मध्ये निवडणुकांनंतर शंकरदयाळ शर्मांनी अटलबिहारी वाजपेयींना सरकार बनवायला पाचारण केले होते. त्याविषयी बोलताना कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की शर्मांचा तो निर्णय चुकीचा होता. याचे कारण वाजपेयी १९३ पेक्षा जास्त लोकसभा सदस्यांचे समर्थन सादर करायच्या स्थितीत नव्हते तर त्याचवेळी युनायटेड फ्रंटचे देवेगौडा स्वतःचे १७८ आणि काँग्रेसचे १४० असे ३१८ सदस्यांचे समर्थन घेऊन तयार होते. अशावेळी ३१८ सदस्यांचे समर्थन असलेल्याला सरकार बनवायला पाचारण न करता १९३ सदस्यांचे समर्थन असलेल्याला पाचारण करणे कसे योग्य आहे? त्यातून एका अर्थी शर्मांनी घोडेबाजाराला उत्तेजन दिले नाही का? वाजपेयींनी तसे काही केले नाही हे चांगलेच झाले पण असा निर्णय शर्मांनी घेणे चुकीचे होते. याविषयी माझेही मत हेच आहे. कपिल सिब्बलचे नाव केवळ त्यांनी ते एका चर्चेत म्हटले होते म्हणून लिहिले आहे.वाजपेयी यांना जरी १९३ सदस्यांचेच समर्थन होते, तरी भाजपने १६० जागा जिंकून लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष हे स्थान मिळविले होते. काँग्रेस व भाजप व्यतिरिक्त १३ पक्ष एकत्र येऊन काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनविता येईल का याची चाचपणी करीत होते. काँग्रेसने तत्वतः बाहेरून पाठिंबा द्यायचे मान्य केले होते तरी प्रत्यक्षात पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना द्यायला खूप उशीर केला. वाजपेयींचे नरसिंहराव व शंकरदयाळ शर्मांशी उत्तम संबंध होते. नरसिंहरावांना मनातून वाजपेयीच पंतप्रधान व्हायला हवे होते. त्यामुळे काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते या नात्याने त्यांच्या सहीचे पाठिंब्याचे पत्र तिसर्या आघाडीला हवे असताना नरसिंहरावांनी ते द्यायला बराच उशीर केला. काही दिवस वाट पाहून शेवटी लोकसभेतील सर्वाधिक मोठा पक्ष असल्याने शर्मांनी वाजपेयींना सरकार बनविण्यास पाचारण केले. वाजपेयींनी शपथ घेतल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी नरसिंहरावांनी तिसर्या आघाडीला पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींकडे पाठविले. वाजपेयींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर काही काठावरचे पक्ष स्वतःहून वाजपेयींना पाठिंबा देतील व त्यामुळे भाजपला बहुमतापर्यंत पोहोचता येईल अशी रावांची मनातून इच्छा होती. दुर्दैवाने अकाली दल, समता पक्ष व शिवसेना वगळता भाजपला नवीन मित्रपक्ष मिळविता न आल्याने शेवटी १३ दिवसातच वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला. अर्थात यातून धडा घेऊन अडवाणी व महाजनांनी बरेच प्रयत्न करून १९९८ च्या निवडणुकीपर्यंत तृणमूल काँग्रेस, अद्रमुक, बिजद इ. नवीन मित्र पक्ष मिळविले व त्यामुळेच १९९८ मध्ये भाजपला १८० जागा मिळूनसुद्धा बहुमताचे सरकार बनविता आले.
In reply to ... by चंपाबाई
In reply to 'गांधी घराणे प्रमुखपदी नसलेली by माहितगार
In reply to गॅरी ट्रुमन साहेब by अभिजीत अवलिया
In reply to धुतल्या तांदळासारखा कोणीच नाही by गॅरी ट्रुमन
या प्रकरणी विरोधी पक्ष भाजपची चूक म्हणजे भाजपने आपली पावले बऱ्यापैकी धसमुसळेपणे उचलली. कॉंग्रेस सरकारविरूध्द जानेवारीत विधानसभेचे अधिवेशन भरल्यानंतर अविश्वास ठराव आणून कॉंग्रेस सरकारला पायउतार केले असते तर हा गदारोळ माजलाही नसता.सभापतींनी पक्षांतरबंदीच्या अंतर्गत पक्षांतरीत आमदारांवर बरखास्तीची कारवाई केली कि तुम्ही म्हणता ती अविश्वास ठरावातून सरकार पाडण्याची संधी विरोधीपक्षाला राहिली नसती. सदस्यांना नोटिस बजावून त्यांच्याकडून उत्तरे मागविणे इत्यादी. ही प्रक्रीया विधानसभा अध्यक्षांनी पाळली असावी असे न्यायालयीन निर्णयातील नोंदींवरून दिसते, ज्या दिवशी नोटीस पिरिएड संपून अध्यक्षांनी बडतर्फी लागूचा निर्णय कायम केला असता हे पाहूनच विधानसभेचे आधीवेशन (मंत्रिमंडळाच्या सल्ल्या शिवाय) प्रीपोन करण्याचा प्रकार राज्यपालांनी केला असावा. मला वाटते अमुक दिवसांच्या आत विधान सभेत बहुमत सिद्धकरा एवढीच नोटीस राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना द्यावयास हवी होती. बाकीच्या लोचात पडावयास नको होते. अर्थात विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे काम निष्पक्षपणे करणे अभिप्रेत असते आणि राजकारणाच्या साठमारीत अभिप्रेत तटस्थतेचा लोप झाला आहे. अध्यक्ष विधानसभेच्या आत काय करतात यावर न्यायालयांना सहज काही करता येत नाही. अध्यक्षांचा निर्णय राज्यघटनेला अनुसरुन आहे की नाही त्याचा रिव्ह्यू घेऊन न्यायालयांना निर्णय देता येतो पण तोपर्यंत अध्यक्ष बरीच फिरवा फिरवी करु शकतात. समजा २/३ आमदार पक्षांतरास तयार आहेत तर तुम्हाला मंजूर नसेल तरीही पक्षांतर मंजूर करावयास हवे पण तसे न करता त्यातील काही लोकांनाच बडतर्फ करावयाचे आणि काही जणांना आधांतरी लोंबकळत ठेवायचे जे लोंबकळत आहेत त्यांना विश्वासदर्शक ठरावाला पाठींबा देण्यावाचून पर्याय रहात नाही असे काही अंकगणित मांडले जात असावे. एकुण राजकीय साठमारीच. एकुण कायतर पक्षांतर करणार्यांना लवकरात लवकर जसे की महिनाभराच्या आत पुर्ननिवडणूकीस जनते समोर जाण्यास सांगणे हाच खरा उपाय असावा. ते होत नाही तो पर्यंत ही साठमारी चालू राहील असे वाटते. असो.
In reply to नवी घडामोड by गॅरी ट्रुमन
In reply to काँग्रेसने नेतृत्व बदलावे अशी by श्रीगुरुजी
यालाच लॉस-लॉस सिच्युएशन म्हणतात का?:) ऐसा भी होता है ! पण या सगळ्या प्रकारात अरुणाचलची जनता नाराज झाली तर अवघड होऊ शकते. इशान्येतील एका शांत राज्याला नजर लागू नये एवढेच वाटते.
In reply to सर्वोच्च न्यायालयाने १५ by श्रीगुरुजी
पण आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात न घेताच राजीनामा दिला आहे...यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत नाही का?नाही त्यांचा शपथविधी झाला होता त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी राजीनामा दिला.त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून काम बघायला सुरवात केली नसली तरी घटनात्मक दृष्टीने ते राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही.
In reply to एकूण काय तर उत्तराखंडनंतर अरुणाचलमध्ये by बोका-ए-आझम
In reply to एकूण काय तर उत्तराखंडनंतर अरुणाचलमध्ये by बोका-ए-आझम
तसाही दिवा विझण्यापूर्वी मोठा होतोच.काँग्रेसचा दिवा विझू नये असे फार वाटते.त्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एक समर्थ विरोधी पक्ष असला पाहिजे. आणि दुसरे म्हणजे काँग्रेसची पडझड होत आहे ती जागा केजरीवाल, लालू असले गणंग भरत आहेत.केजरीवाल आणि लालू या दोघांपेक्षाही काँग्रेस कधीही परवडली.
In reply to काँग्रेसचा दिवा विझू नये by गॅरी ट्रुमन
In reply to समर्थ विरोधी पक्ष हवा हे ठीक by श्रीगुरुजी
In reply to धक्कादायक बातमी by गॅरी ट्रुमन
त्यांनी मुख्यमंत्री बनविले गेले नाहीमुख्यमंत्री बनविले गेले नाही याऐवजी मुख्यमंत्रीपदावर टिकून राहता आले नाही ही सुधारणा हवी आहे.
In reply to अरूणाचल प्रदेश मध्ये पुन्हा by श्रीगुरुजी
अरूणाचल प्रदेश मध्ये पुन्हा एकदा राडा झालाय.हा सगळाच प्रकार शिसारी आणणारा आहे. राज्यपालांना हाकलले आहेच. त्याबरोबरच या आयाराम-गयाराम आमदारांनाही हाकलून देता आले तर खूप चांगले होईल!! १९८० मध्ये इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल त्यांच्याबरोबरच्या सर्व आमदारांना घेऊन जनता पक्षातून काँग्रेसवासी झाले.इंदिरांनी जून १९८० मध्ये जनता पक्षाची राज्य सरकारे बरखास्त केली होती त्यापासून केवळ भजनलाल सुटले कारण ते काँग्रेसवासी झाले होते. भजनलाल सगळेच आमदार घेऊन दुसर्या पक्षात गेले.इथे केवळ एक आमदार कमी आहे असे दिसते. परत काही महिन्यांनी हे आणखी तिसरीकडे गेले नाही तर मिळवली. अगदीच बेजबाबदारपणा आणि स्वार्थीपणा चालू आहे सगळा. १९९९ मध्ये वाजपेयी सरकारने गोवा विधानसभा बरखास्त केली होती.अशाच आयाराम-गयारामांमुळे प्रतापसिंह राणे, विल्फ्रेड डिसूझा आणि लुईझिनो फालेरो हे तीन मुख्यमंत्री जुलै १९९८ ते फेब्रुवारी १९९९ या अल्प काळात झाले.आणि काही आमदारांनी परत लुईझिनो फालेरोंचा पाठिंबा काढून घेतला होता आणि त्यांना अल्पमतात घालवले होते!! असला पोरखेळ करणार्या सगळ्यांना लाथा घालता आल्या असत्या तर किती बरे झाले असते.
चीनचा हात असणारच