मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राँग नंबर

हर्मायनी · · जनातलं, मनातलं

आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे!

मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती! त्यावर तो म्हटला होता, This is the best gift I have ever got! किती मस्त वाटलं होतं तेव्हा! पुढच्या बर्थडेचे प्लॅन्स ही तिच्या मनात तेव्हाच सुरु झाले होते. आणि आज मात्र ती झोपाळ्यावर एकटीच बसली होती. मागच्या एका वर्षात पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. त्यांच्या भांडणानंतर तिने ग्रुपशी फारसे संबंधच ठेवले नव्हते.

आता एवढे जागलेच आहोत तर फोन करूयाच ह्या निर्णयाप्रत ती आली आणि तिने फोन लावला. सात-आठ रिंग्ज वाजल्या. जाऊ दे आता फोन कट करुया अशा विचारात असतानाच पलिकडून आवाज आला.
"हॅलो"
किती दिवसांनी ऐकला ह्याचा आवाज! खोल गंभीर आणि झोपेचा अॅडेड फ्लेवर! ती चटकन भानावर म्हणाली,
"हॅलो"
तिच्या हॅलोवर त्याची नेहमीची कमेंट ठरलेलीच. तू हॅलोच असं म्हणतेस की समोरचा राँग नंबर लागला तरी तासभर बोलत बसेल.
"हॅपी बर्थडे!"
"थँक्स! बट हू इज धिस?"
हू इज धिस??? नंबरदेखील डिलीट केलाय का ह्याने? आणि आवाज सुद्धा ओळखला नाही?! ह्याला नेहमीच लोकांना आयुष्यातून हाकलायची घाई असते. ती राँग नंबर पुटपुटली आणि फोन कधी कट झाला ते कळलंच नाही. He has moved on. There is no point in hanging on to someone who doesn't want you in their life. ह्या मैत्रीणी सांगून सांगून थकलेल्या गोष्टी एकदमच लक्षात आल्या होत्या. सगळं स्वच्छ झालं होतं. आज तिला खूप दिवसांनी शांत झोप लागणार होती.


वाचने 8251 वाचनखूण प्रतिक्रिया 33

जव्हेरगंज गुरुवार, 05/19/2016 - 21:05
नेमकं आणि क्लास! आज तिला खूप दिवसांनी शांत झोप लागणार होती. नाही हो, उलट आज तिचे डोळे खाडकन उघडले होते.

In reply to by जव्हेरगंज

हर्मायनी Fri, 05/20/2016 - 22:23
हो. पहिलाच प्रयत्न! धन्यवाद! तिला शांत झोप लागणार होती कारण तिला क्लोजर (मराठीत काय म्हणतात?) मिळालं.

नीळा गुरुवार, 05/19/2016 - 21:58
आमचे येथे जखमी ह्रुदयावर टाके घालुन मीळतील -Time

नीळा गुरुवार, 05/19/2016 - 21:58
आमचे येथे जखमी ह्रुदयावर टाके घालुन मीळतील -Time

तुषार काळभोर Fri, 05/20/2016 - 05:55
मेलोड्रामाचं न करता थोडक्यात आटोपलं ते बरं केलं. _पैलवान नागेश्वर नागशक्ती

मराठी कथालेखक Fri, 05/20/2016 - 13:43
छान... पण हे नाही पटलं
सगळं स्वच्छ झालं होतं. आज तिला खूप दिवसांनी शांत झोप लागणार होती.
नायिका हळवी वाटतेय, बरेच दिवस तिने प्रेम मनात जपलंय..निदान एका क्षणात तरी सावरणार नाहीच.. पुन्हा एकदा मनसोक्त रडून घेईल.. .. अर्थात ज्याच त्याचं मत.

सिरुसेरि Fri, 05/20/2016 - 15:18
छान लिहिले आहे . --मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो!-- अर्चीसारखीच बिनधास्त दिसते आहे .

हर्मायनी Fri, 05/20/2016 - 22:48
सर्वांना धन्यवाद! पहिलाच प्रयत्न आहे. जरा बिचकतच पोस्ट केली कथा. पण तुमच्या प्रतिक्रियांमुळे खूप छान वाटलं. ती झोपण्यआधी रडली नक्कीच असेल. पण तिला शांत झोप लागणार होती कारण तिला क्लोजर मिळालं. ती अजूनही त्याच्यामधेच अडकून पडली होती. She was hoping for a slightest possibility. Now, she got the closure she needed.

चिगो Tue, 05/24/2016 - 13:24
लघुकथा आवडली.. मिपावर स्वागत.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..