(कूणास ठाऊक ?)
काव्यरस
पेर्ना
कूणास ठाऊक ?
काय घेण्यासाठी
काय वेचण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय चापण्यासाठी
काय गिळण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय टापण्यासाठी
काय हुंगण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नूसतेच खर्चण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
पाकिटशोध (दिव्यसंग्रह)
वाचने
17512
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
kelkar रसातली ही अनर्थशास्त्रीय रचना अगदी फ्रिस्टाइल भुछत्रासारखी जमलीये ;)
पेरनेवर दिलेलाच इथं लिहणार होतो पण आता कंटाळा आला. तुझ्याकडून एवढ्या सोज्वळ विडंबनाची अपेक्षा नव्हती मित्रा. पूर्वीचा टक्या राहिला नाही हेच खरे. सर्दी खाँसी ना मलेरिया हुआ ये गया यारो इसको जिलबीरिया हुआ ^=^
नवरे मंडळींना हे असले प्रश्न पडतात.
आणि इतका गुळमाट...
काही तरी लोच्या आहे, बुवांना विचारावे लागेल (सध्या त्यांचा फोन दिवसा सुद्दा बंद असतो काय करावे ब्रे).
वल्लींना साकडे घालणे आले.
नित वाचक नाखु
In reply to टक्या by नाखु
सध्ध्या ते हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करत असतात....डिश्टर्ब णका क्रू त्येंला ;)
In reply to टक्या by नाखु
टक्या आणि इतका गुळमाट...मिपाला झणझणीत पदार्थ मानवत नाहीत
विडंबन विभागाच वेगळा काढायला हवा
हल्ली दर धाग्याला एक विडंबन या रेशो ने जिलब्या पडतात
In reply to विडंबन विभागाच वेगळा काढायला by स्पा
'Right to Ignore' वापरा.
विडंबन धागा ओळखू येण्यासाठी कंस असतात, न उघडणे आपल्या हातात असते, सिंपल !
कुणास ठाऊक ?
आहेर देण्यासाठी
की फुकट जेवण्यासाठी
या हॉलमध्ये आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
गुलाबजाम चापण्यासाठी
की मट्टा ढोसण्यासाठी
या हॉलमध्ये आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
गाठीभेटी घेण्यासाठी
की पक्षी पाहण्यासाठी
या हॉलमध्ये आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
कार्यक्रम पार पाडण्यासाठी
की नुसतेच हजेरीसाठी
या हॉलमध्ये आलोय आम्ही
मंगलशोध (भव्यसंग्रह)
In reply to .. by नीलमोहर
अरारा! ^=^
In reply to .. by नीलमोहर
खि खि खि
In reply to .. by नीलमोहर
मूळ विडंबनापेक्षा भारी !
In reply to .. by नीलमोहर
=)))
In reply to .. by नीलमोहर
कहर आहेस निव्वळ! =))
खेळकर विडंबन छान जमलंय.
एक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी जेवायला मिळणार नाही असा हुक्म होता का रे?
In reply to एक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी by अभ्या..
खिक्क...मला क्काय ** समजलास ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ
In reply to एक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी by अभ्या..
हा हा हा !
मस्त जमलय राव
:)
हा हा हा
हा हा हा
कुणास ठाऊक ?
प्रतिसाद देण्यासाठी
की निव्वळ वाचण्यासाठी
या मिपावर आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
चर्चा करण्यासाठी
की दंगा करण्यासाठी
या मिपावर आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
अनुभव घेण्यासाठी
की कुरापत उकरायसाठी
या मिपावर आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
ब्लॉगचा निचरा काढण्यासाठी
की नुसतेच जाहीरातीसाठी
या मिपावर आलोय आम्ही
दंगलबोध (दिव्यसंग्रह)
कुणास ठाउक ?
अध्यात्म मिरवण्यास
की अं अहं जपण्यास
या मिपावर आलोय आम्ही
कुंणास ठाउक ?
मोदीना बुकलण्यासाठी
अन मोदी प्रेम उतू जाण्यासाठी
या मिपावर आलोय आम्ही
चायला!! एकाच पेर्नेची कित्ती कित्ती विडंबने? आवरा.
In reply to चायला!! एकाच पेर्नेची कित्ती by अन्या दातार
नाईईईईईई!
अज्जुन पडू द्या!
नाखू(न) चौरा जिन्नदाबाद! 
अज्जुन पडू द्या!
नाखू(न) चौरा जिन्नदाबाद! 
kelkar रसातली ही