मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्तित्वाची बोंब

संदीप डांगे · · जे न देखे रवी...
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या टंकायाच्या सभ्यपणाने लिंपायाच्या अंधार असे बे ढुंगणाखाली गंध नाही बस बोतल खाली अस्तित्वाची ही बोंबच निघाली झाकली मूठ ओपन झाली. - संदीप डांगे (शिघ्रकोपी शिघ्रकवी)

वाचने 7379 वाचनखूण प्रतिक्रिया 11

स्पा Mon, 02/08/2016 - 20:02
रोफ्ल बेक्कारच चला आता स्लाॅर्पियो कडे वळा

मितभाषी Tue, 02/09/2016 - 23:13
प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या
मी सध्यातरी काही पित नाही. बिरूटे सरांचा धागा फाॅलो करत आहे. प्रमाण एकदा फायनल झाले कि चालू करूया म्हणतो काय.

In reply to by मितभाषी

संदीप डांगे Tue, 02/09/2016 - 23:52
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल आमच्याकडुन तुम्हाला (जेव्हा केव्हा जे प्रमाण ठरेल, जो ब्रँड ठरेल, ती) भेट!