अस्तित्वाची बोंब
काव्यरस
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल.
प्रश्न पहिला माझा,
रे गड्या मितभाष्या,
काय पिवुनि तुवा
वाजवला हा ढोल-ताश्या!
मूळ बघता सर्व वादांचे
असे बस फक्त पिण्याचे
अध्यात्म नाहीरे षंढाचे
हे तुज नाही कळायाचे.
भेद भावा तु बघ जरा
अज्ञानास फाडती टरा टरा
डोळे फिरवती गरा गरा
दंभ नाहीच इथे खरा
तुम्हा नसे त्याची प्रचिती
म्हणुनि त्या खोटा म्हणती
मनापासुनि ते ओरडती
अंधारासी मी एकच पणती.
हिशोब सरला रे जन्माचा
बाकी थोडा असे मिपाचा
मिंधा नसे कुणाच्या बा'चा
पण मानासाठी घासतो टाचा
करु लढाया थुंकायाच्या
जोर लावुनि भुंकायाच्या
दोन शिव्या टंकायाच्या
सभ्यपणाने लिंपायाच्या
अंधार असे बे ढुंगणाखाली
गंध नाही बस बोतल खाली
अस्तित्वाची ही बोंबच निघाली
झाकली मूठ ओपन झाली.
- संदीप डांगे (शिघ्रकोपी शिघ्रकवी)
वाचने
7379
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
अमुचा नमस्कार घ्यावा
कोप न करावा कदापि
शहाणे करावे सकळा
बसुनी त्या गोदातटी
आमचे एक मित्रसुद्धा शीघ्रकवी आहेत.
In reply to आमचे एक मित्रसुद्धा शीघ्रकवी by प्रचेतस
पण ते फक्त हगोष्ण काव्य रचतात

ते कॉर्पिओ वाले पुन्हा भेटले का? =))
व्वाह! बहुत अच्छे..मजा आया।
रोफ्ल
बेक्कारच
चला आता स्लाॅर्पियो कडे वळा
प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्यामी सध्यातरी काही पित नाही. बिरूटे सरांचा धागा फाॅलो करत आहे. प्रमाण एकदा फायनल झाले कि चालू करूया म्हणतो काय.
In reply to प्रश्न पहिला माझा, by मितभाषी
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल आमच्याकडुन तुम्हाला (जेव्हा केव्हा जे प्रमाण ठरेल, जो ब्रँड ठरेल, ती) भेट!
In reply to हा हा, हलकेच घेतल्याबद्दल by संदीप डांगे
मी पण मी पण …
In reply to हा हा, हलकेच घेतल्याबद्दल by संदीप डांगे
कधी भेटायच सांगा. बंदा हाजीर है.:)
अमुचा नमस्कार घ्यावा