पूर्वी चार भिंतींमध्ये
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा उष्टे काढा
आयुष्य ती जगत होती.
कावळा तिला शिवत होता
चार दिवसाची हक्काची
सुट्टी तिला मिळत होती.
स्त्री आज स्वतंत्र आहे
घरा बाहेर पडली आहे.
ऑफिसात जात आहे
धंधा हि पाहत आहे.
मुलांना शिकवत आहे
स्वैपाक हि करीत आहे.
थकलेल्या शरीराने
अहोरात्र खटत आहे.
कावळा आज शिवत नाही
हक्काची चार दिवसाची
सुट्टी हि मिळत नाही.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4595
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली.
स्वैपाक करताना माझा फोटो बघा,
कविता पटली
अभिनंदन!
In reply to कविता पटली by एक एकटा एकटाच
=)))
In reply to कविता पटली by एक एकटा एकटाच
छान आहे कविता. आवडली.
साला कावळा पण डेम्बिस असतो
तर काय!!
In reply to साला कावळा पण डेम्बिस असतो by ज्ञानोबाचे पैजार
आपणास दंडाची नोटीस :)
In reply to साला कावळा पण डेम्बिस असतो by ज्ञानोबाचे पैजार
बंदी*
=))
In reply to बंदी* by नंदन
हम्म
हो, ऐकले आहे मी हे आज्जीकडूनच
In reply to हम्म by पैसा