कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे.
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय
तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुमच्याकडन हाय दंडाच येण
आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुम्ही करता घाण
आमच्या काळ्या रंगाच्या नावान तुमची नसतीच ठणाण
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुमच्या नजरा वाईट
त्यासाठी डोंबकावळ्याची बदनामी, खूप झाली हाईट
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
कशाला ठेवता पिंड आणि
आणि मेलेल्या आत्म्यांच्या नावाने आमची नसतीच धींड
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
कशाला पिंजर्यात तुमच्या द्रोणकावळे
तुमच्या सत्तेसाठी कशाला कुजवता हकनाक आमचे मावळे
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स
इंग्लंडातल्या द्रोणकावळ्यांवर धागा लेख आणि आमच्या आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी या धाग्याची जाहिरात करणेत येत आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2478
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपणास दंडाची नोटीस :)
सर तुम्ही स्वत: कावळ्यांच्या
In reply to आपणास दंडाची नोटीस :) by माहितगार
कावळ्यांच्या बाजूने वकील
In reply to सर तुम्ही स्वत: कावळ्यांच्या by ज्ञानोबाचे पैजार
:)
कावळे दा बेष्ट