जागो ग्राहक जागो....
गृहकर्जाबाबत बँकेचे नियम यावरून या धाग्याची कल्पना सुचली..
आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने...
या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील..
माझे [ सध्या लगेच आठवणारे ;) ] दोन अनुभव..
*****************************************************************
लै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक.
स्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच.
दिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही.
वेळ: दुपारी १:००
मी ज्या पार्टीसोबत होतो त्यांचे या बँकेत व्यावसायीक करंट अकाऊंट आहे आणि त्यावर नेहमी भरभक्कम व्यवहार होतात. "Any Branch Banking" हा टॅगही असल्याने त्या बँकेच्या कोणत्याही बँकेत कितीही रकमेचे व्यवहार विनासायास होतात. अर्थात मोठी रक्कम काढावयाची असेल तर बँकेला आधी पूर्वसूचना देणे आवश्यक असते मात्र हा व्यवहार पैसे खात्यात भरावयाचा होता.
बँकेत प्रवेश करून कॅशीयरच्या लाईनीत उभारणे, त्या दरम्यान नोटांचे विवरण तयार करणे व डिपॉझीट स्लिप भरणे वगैरे सोपस्कार पार पडले.
कॅशीयर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.. थांबा साहेबांना विचारतो..
साहेब (असिस्टंट मॅनेजर) : तुमची कॅश स्वीकारता येणार नाही.
मी : कारण कळेल का..?
असिस्टंट मॅनेजर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.
मी : हरकत नाही साहेब.. एनी ब्रँच बँकींग आहे.
असिस्टंट मॅनेजर : तरीपण घेवू शकत नाही.
मी : तुमच्या मॅनेजरला बोलवा.
असिस्टंट मॅनेजर : साहेब रजेवर आहेत. मीच मॅनेजर आहे आज. कॅश घेता येणार नाही.
मी : नियम बघा.. घेता येते. मी महाराष्ट्रात सगळीकडे भरतो. व्यवहार बघा तुमच्या सिस्टीममध्ये.. आणि गावांची नावे बघा.
असिस्टंट मॅनेजर : नाही घेणार.
(आम्ही एकदम गोंधळून गेलो होतो)
आता सोबतच्याने रिंगणात प्रवेश केला..
अहो साहेब.. आमचेच अकाऊंट आहे... सगळीकडे कॅश घेतात...
असिस्टंट मॅनेजर : (बोलणे मध्येच तोडून आणि अत्यंत उद्धट सुरात..) अहो तुम्हाला सांगीतले आहे ते कळतेय का..? कॅश घेणार नाही..
आता दोघांचेही फ्युज गेले..
मी : ओ भाषा सुधारा..
सोबतचा : ओ तुम्हाला हे जड जाईल.. लेखी द्या कॅश देत नाही म्हणून.
असिस्टंट मॅनेजर : लेखी देणार नाही. काय करायचे ते करा.
मग आम्ही क्यू सोडला. आमच्याकडच्या एका कागदावर सगळा प्रसंग लिहून काढला आणि
यावर अॅक्नॉलेजमेंटची सही द्या अन्यथा आमच्या अकाऊंटला एक रिलेशनशिप मॅनेजर असाईन्ड आहे त्याला कॉल करतो असा दम दिला.
तो मॅनेजर सही देईल याची खात्री नव्हती कारण तशी सही देणे म्हणजे त्याने स्वत:च्या पंचनाम्यावर सही करण्यासारखे होते. पण साहेबांनी सही दिली.
आम्ही धावपळ करून दुसरी ब्रँच शोधली व पैसे भरले.
नंतर हे सगळे प्रकरण आणि त्या पत्राची प्रत cgmcsd@rbi.org.in या रिझर्व बँकेच्या ओम्बुड्समन \ कस्टमर केअरला पाठवली.
बँकेने विनाअट त्वरीत लेखी माफी मागीतली व त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली.
आता त्या ठिकाणी आमचे पैसे विनातक्रार स्वीकारतात.
*****************************************************************
ऑफिसमध्ये कामात बुडलेल्या अवस्थेत असताना अचानक फोन वाजला..
टेलीकॉलर -(मंजुळ सुरात..) मोदक सर बोलताय का..?
मी: हो.
टेलीकॉलर : मी ** सर्विसमधून बोलत आहे.. तुम्हाला कार घ्यायची आहे का..? तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का..? (हे सगळे एका दमात)
मी : (मनातल्य मनात) $%#^& हिला कसे कळाले माझे होम लोन आहे आणि ते पण या बँकेत..!!!!
मी: (तिला घोळात घेत) मॅडम मला SX4 घ्यायची आहे. बोला..
आणि साधारणपणे १५ मिनीटांच्या चर्चेनंतर मला हवी ती माहिती कळाली.
त्या सेल्सवालीचे नांव, तिच्या मॅनेजरचे नांव आणि सर्वात महत्वाचे बँकेच्या ज्या मॅनेजरने ही माहिती दिली त्याचे नांव.
मग एक सुस्पष्ट असा मेल लिहिला.
Subject: Complaint - Sharing Personal Details with Third Party.
Hello,
This is मोदक - My customer ID is १२३४५६७८९.
Today morning I got a call from a Maruti Automobile dealer "***" from Fugewadi Pune, asking for any requirement for Auto Loan. I was assured lucrative interest rate since I am a prevailed customer of XXXX Bank.
I was shocked to know that caller (Ms. XXXX from number +91-00000 00000) was referring to my home loan and my association with XXXX Bank. After demanding more information on 'my details available at their end' I got to know that "XXXX Has provided these details to her supervisor, Mr XXXX " and they have got data set for around 200 XXXX Home Loan customers.
Therefore I would like to know,
Is it legitimate to share Loan details / Personal details / Contact number with third party..?
If not - I request a thorough investigation as to "Why personal details were made available to third party"
I am really disappointed that such incident have taken place even after my contact number is registered for DND.
Please feel free to revert in case any information required from my side.
Regards,
मोदक.
नंतर त्या बँक मॅनेजरचा फोन आला.. त्यांनी असे फोन परत येणार नाहीत याची खात्री दिली आणि तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली
मारूतीच्या शोरूममधून ज्या मुलीने फोन केला तिने माफी मागावी अशी अपेक्षा आहे का..? असेही विचारले या गोष्टीस मी नकार दिला कारण माझे काम झालेले होते.
मला आजतागायत पुन्हा त्या शोरूम मधून किंवा कोणत्याही ठिकाणाहून Home Loan च्या रेफरन्सने फोन आलेले नाहीत.
*****************************************************************
या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील..
*****************************************************************
वाचन
69908
प्रतिक्रिया
107
चांगला धागा आहे. आपल्या
वा.खू. साठवलेली आहे
छान..!!
In reply to छान..!! by योगी९००
तेथील शिपायापासून प्रत्येकजण
तेथील शिपायापासून प्रत्येकजण insurance, credit card, personal or home loan या साठी मागे लागतोअशावेळी न विसरता आपल्याला दिली गेलेली आश्वासने ती आश्वासने देणार्यासमोरच एका कागदावर लिहून काढावीत व त्यावर त्याचे नांव, गळ्यात बॅज असेल तर एम्प्लॉयी आयडी, फोन नंबर आणि त्याच्या दोन किंवा तीन लेव्हल वरच्या मॅनेजरचे नांव, हुद्दा (रिजनल मॅनेजर / सेल्स मॅनेजर / एरीया मॅनेजर) आणि फोन नंबर घ्यावा. वरच्या मॅनेजरचे नांव आपल्याकडे असल्याने मिळालेली आश्वासने कन्फर्म करता येतात. सेल्स करणारे किराणा दुकानातली मुले काम सोडतात तसे काम सोडू शकतात कारण बहुतेकदा ते बँकेच्या पे रोल वर नसतात - ते एखाद्या DSA - Direct Sales Associate किंवा DST - Direct Sales Team कडून काँट्रॅक्टवर काम करत असतात. गळ्यात बॅज असला तरी तो "रिप्रेझेंटिटीव्ह" चा बॅज असतो - बँक अशा लोकांच्या बाबतीत कधीही हात वर करू शकते जर शंका असेल तर बिन्धास्त त्या मॅनेजरला फोनवावे आणि माहिती विचारावी. हे फोन रेकॉर्ड करून ठेवावेत. आजच्या Dogs Fight मध्ये सेल्स मॅनेजर कधीही "मला का फोन केला..?" किंवा "मी का माहिती देवू..?" असे म्हणणार नाही याची खात्री बाळगावी. आपणच नीट काळजी घेतली तर फसवणूक होण्याशी शक्यता खूप कमी होते.In reply to छान..!! by योगी९००
हाच अनुभव मलाही आलेला आहे
त्या असिस्टंट मॅनेजर
In reply to त्या असिस्टंट मॅनेजर by मराठी_माणूस
@आपली बदली अशा कारणामुळे झाली
In reply to @आपली बदली अशा कारणामुळे झाली by अत्रुप्त आत्मा
हो कळाले असणारच कारण नंतर
In reply to हो कळाले असणारच कारण नंतर by मोदक
मला आजतागायत हे समजलं नाही की
In reply to मला आजतागायत हे समजलं नाही की by प्यारे१
मला आजतागायत हे समजलं नाही की
मला आजतागायत हे समजलं नाही की एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या अकाऊंट असलेल्या शाखेव्यतिरिक्तच्या शाखांमध्ये का घेतली जात नाही.मलाही हा प्रश्न पडतो पण एक खाते पगाराचे असल्याने हा प्रश्न पडत नाही कारण पगाराचा टॅग असल्याने कोठेही पैसे भरता येतात आणि IDBI बँकेमध्ये कोठेही कितीही पैसे भरता येतात असा अनुभव आहे. "पणजी"च्याच बँकेत "प्लॅटीनम कस्टमर" असा काहीतरी प्रकार आहे. आपण ठरावीक रकमेच्या फिक्स्ड डिपॉझीट्स ठेवल्या की तो टॅग मिळतो. कोठेही रांगेत उभे न राहता व्यवहार होतात, आपले खाते कोणत्याही शाखेमध्ये कसेही वापरता येते - ही माहिती २ वर्षांपूर्वीची आहे. सध्या पॉलीसी बदलली असल्यास कल्पना नाही.In reply to मला आजतागायत हे समजलं नाही की by मोदक
माझ्या पगारखात्यातच एका
In reply to मला आजतागायत हे समजलं नाही की by मोदक
मोदक साहेब
In reply to मोदक साहेब by सुबोध खरे
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे
In reply to अर्थात स्वताच्या खात्यात पैसे by सुबोध खरे
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे भरायला काय आडकाठी असावी ते कळले नाही.प्यारेकाकांचा आणि माझाही हाच मुद्दा आहे.In reply to अर्थात स्वताच्या खात्यात पैसे by मोदक
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ
In reply to स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ by डॉ सुहास म्हात्रे
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे.स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे. येथे प्यारे काकांचे स्वत:चे पगारखाते आहे परंतु होम ब्रँच मध्ये पैसे भरावयाचे नसून त्याच बँकेच्या वेगळ्या ब्रँचमध्ये पैसे भरण्यास परवानगी मिळाली नाही. याबाबतचा नेमका नियम कोणाला माहिती आहे का..?In reply to स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ by मोदक
कॅश घेण्यापासून ते सुरक्षित
In reply to कॅश घेण्यापासून ते सुरक्षित by असंका
पगार खात्याचे म्हणताल तर
In reply to पगार खात्याचे म्हणताल तर by असंका
कंफ्युज्ड अकौंटंट साहेब
In reply to कंफ्युज्ड अकौंटंट साहेब by सुबोध खरे
+१०० .. खरे साहेब..
In reply to कंफ्युज्ड अकौंटंट साहेब by सुबोध खरे
याचे उत्तर खाली देत आहे. इथे
In reply to कंफ्युज्ड अकौंटंट साहेब by सुबोध खरे
५० हजारच्या वर
चांगला धागा.
मस्त रे मोदका !
आमची "जिव्हाळ्याची ब्यांक"
उत्तम धागा.
In reply to उत्तम धागा. by विजुभाऊ
इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा
In reply to इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा by मोदक
इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा
चांगला धागा रे मादका! खूप
In reply to चांगला धागा रे मादका! खूप by रेवती
मादका?
वरील लेखात हुच्च्भ्रू ब्यांक
मोलाचा धागा
साधारण साडेतीन
पुर्वी या प्रकारचा एक धागा
एक गंमतशीर प्रसंग...
In reply to एक गंमतशीर प्रसंग... by मुक्त विहारि
एका बांगलादेशी मैत्रिणीची
In reply to एका बांगलादेशी मैत्रिणीची by रेवती
तुम्ही जर महाराष्ट्रात रहात असाल तर...
.
श्या!
एकदा एअरटेलचे त्यांच्याच
In reply to एकदा एअरटेलचे त्यांच्याच by मोदक
कंपनीच्या फेसबुकावर डिटेल तक्रार टाकणे हा उत्तम मार्ग दिसतोय
बळचकर असेही..
In reply to बळचकर असेही.. by नाखु
बाळ सप्रेंच्या जागो ग्राहक
In reply to बाळ सप्रेंच्या जागो ग्राहक by मोदक
मानल बुवा!!
मोदक शेट
क्या बात मोदक.
In reply to क्या बात मोदक. by प्यारे१
हार जीत सोडा ओ प्यारे काका...
डॉ. सुबोध खरे साहेब-
चांगला धागा!
@कंफ्युज्ड अकौंटंट
In reply to @कंफ्युज्ड अकौंटंट by सुबोध खरे
प्रतिसाद प्रश्नांच्याच
In reply to @कंफ्युज्ड अकौंटंट by सुबोध खरे
नोटा मोजायची यंत्रे
पगार खाते हे टेलर्ड प्रॉडक्ट
In reply to पगार खाते हे टेलर्ड प्रॉडक्ट by सुबोध खरे
याला म्हणतात मिसक्वोटिंग! आपण
मी होम ब्रँचला पैसे भरुन
दहा हजार रुपये पगार असणार्या
दहा हजार रुपये पगार असणार्या
साईट वरून माहिती घेण्याच्या
साईट वरून माहिती घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग झाला असे दिसते आहे.साईटवरून माहिती देण्याचा दुवा आपण सांगण्याचं अगोदर मी दिला होता( जनहितार्थ) आपण जरा तपासून पाहावे इतकीच विनंती. मी आपल्या इतका वाणिज्य क्षेत्रात पुढारलेला नाही किंवा लोकांना सल्ला देण्या इतका ज्ञानी हि नाही. बाकी कुणाच्याही सल्ल्याचा फायदा कुणालाही झाला तरी ते चांगलेच. ( कुणाच्या का कोम्बडयाने , उजाडल्याशी कारण) राग आपल्याबद्दलचा नाही तर बँकेतील कर्मचार्याच्या( सरकारी सुद्धा) "मला काय त्याचे" या वृत्तीचा होता /आजही आहे. सरकारी कार्यालयाशी सामान्य माणसाचा रोज संबंध येत नाही पण बँकेशी येतो. उदा. १९८९ साली मी लखनौला कोर्स साठी गेलो असता मी ५००० रुपयाचा डिमांड ड्राफ्ट घेऊन गेलो होतो तेथील SBI शाखेचा. त्यावर तेथील म्यानेजरने मला हे पैसे आपल्याला एक महिन्याने मिळतील असे सांगितले. मी लष्करी अधिकारी आहे आणि एक महिन्यासाठी आलो आहे आणि मी पैसे मुंबईत भरलेले आहेत. मग आपण मला एक महिन्याने पैसे देत त्याचा अर्थ काय? तो म्हणाला आम्हाला त्यांची तर आली नाही. आता यात माझा काय दोष? हा म्यानेजर ढीम हलायला तयार नव्हता आणि मी सांगितले कि तुम्ही मुंबईला फोन करून खात्री करून घ्या. पाहिजे तर त्याचे पैसे मी देतो( बँकेत हि सोय असूनही) शेवटी मला आवाज चढवावा लागला आणि खात्यामार्फत तुमच्या विरुद्ध वैयक्तिक तक्रार करावी लागेल असे सांगितल्यावर त्याने उपकार म्हणून दोन दिवसांनी( कदाचित फोन केला असावा) पैसे दिले. अर्थात जेंव्हा मी आवाज चढवतो तेंव्हा त्याबद्दल नियमांची पूर्ण माहिती असल्याशिवाय नाही त्यामुळे आवाज चढवून माझी कामे होत आली आहेत. आणि बँकेच्या कर्मचार्यांच्या चुकीमुळे लावलेले शुल्क मी कधीही भरलेले नाही. standing instruction असताना माझी ECS बाउन्स झाली आणि त्याचे ३५० रुपये शुल्क मला लावले. हे पैसे मी बँकेला भरायला लावले. परंतु कर्जाचा एक हप्ता वेळेत न भरल्याबद्दल माझ्या निष्कलंक आर्थिक चारित्र्याला डाग लागला. असे अनेक वाईट अनुभव आल्यापासून मी सरकारी बँकेशी व्यवहार करणे सोडून दिले आहे. शेवटचा भविष्य निर्वाह निधीचे खाते पण आता राष्ट्रीयीकृत बँकेतून काढून घेतले आहे. लष्करात असताना बँकेने चुकीच्या बँकेला धनादेश सदर केल्यामुळे चेक बाउन्सचा बट्टा मला लागला. ( लष्करात हा दखलपात्र गुन्हा आहे). या सर्व प्रकरणाची दाद लावण्यासाठी मला आवाजही चढवायला लागला आणि लिखित तक्रार दिल्यावर त्या बँक म्यानेजरने माझी सर्वांसमोर गयावया करणे सुरु केले. अर्थात मी प्रकरण लिखित स्वरुपातच तडास लावायचे असल्याने त्याला तसे सोडले नाहीच. तेंव्हा कर्मचारी माझ्या मागे काय बोलतात याचे मला घेणे देणे नसते आणि नाही. असे असूनही पगाराच्या खात्यात पैसे भरू न देणे हे मला आजही अन्यायकारकच वाटते.In reply to साईट वरून माहिती घेण्याच्या by सुबोध खरे
साईटवरून माहिती देण्याचा दुवा
महिन्याभरापुर्वी "पिझ्झा हट"
In reply to महिन्याभरापुर्वी "पिझ्झा हट" by पिलीयन रायडर
म्हणून मराठी लोकांना नोकरी
In reply to म्हणून मराठी लोकांना नोकरी by काळा पहाड
काका.. तो हिंदी होता.. मी
दोन दिवसापुर्वीची गोष्ट. मी
In reply to दोन दिवसापुर्वीची गोष्ट. मी by अद्द्या
सिनियर
In reply to सिनियर by कपिलमुनी
हे इतकं सहज शक्य आहे? ते तर
असू शकेल . .
फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
फेसबुकवर टाकायला सांग
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
मी नोकिआ आशा २१० मागवलेला
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
अतिशय चांगला अनुभव आहे
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
"आर्मर जॅकेट"
In reply to "आर्मर जॅकेट" by कपिलमुनी
रद्दड क्वालिटीचे म्हणजे नेमका
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
येस
.दुप्लिकेट सिम
Dear Sir ,
My name is *** . I am from Mumbai. I had taken two cards ***and ***I am using them and paying the bills also since last few months.
But since last one month I am getting calls from you that I have one more connection *** They are asking me the pending bill which was initially 701 and now gone to 901.
This card is not mine. Your agent ***hadgiven me only two cards. This third card is not mine.
Kindly stop this number *** and please ddon't harass me.
Your agent who gave me two card is *** His number is . ***
Thanking you.
***
महिनाभर सारख फोन येत होते.. कार्ड तुमचेच आह . बिल भरा.. मी शेवटी कंटाळुन फेसबुकवर टाकले..
फेसबूकावर मेसेज केल्यावर चमत्कार् झाला. दोन तासाट एज्म्तचा फोण आला. म्हणाला .. माझा जॉब जाइल. त्याने स्वता पैसे भरून सिम ब्म्द केले
In reply to .दुप्लिकेट सिम by hitesh
.
मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या
In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
क्यारे....कुच कामधंदा नै
In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
घेतलेला वडापाव तीथेच टाकून
In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
उगाच तणतण, छान लागते की
In reply to उगाच तणतण, छान लागते की by अनुप ढेरे
एकदा हिरवी चटणी + सुक्की लसूण
In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
@ सगा...
येत्या 24 तारखेला राष्ट्रीय
In reply to येत्या 24 तारखेला राष्ट्रीय by सस्नेह
इतर दिवशी केवळ राज्यस्तरीय
काही वेळा पूर्वीच . . चक्क
In reply to काही वेळा पूर्वीच . . चक्क by अद्द्या
मलापण एक फोन आला होता. सांगत
सल्ला / मदत हवी
In reply to सल्ला / मदत हवी by मन१
मनोबा.. तुझ्याकडे एकच ऑप्शन
In reply to सल्ला / मदत हवी by मन१
अरे सायबा
In reply to सल्ला / मदत हवी by मन१
रुवातीचे तीन वर्ष व्याज ८.९
गेले ८ महिने एअरटेल सोबत वाद
In reply to गेले ८ महिने एअरटेल सोबत वाद by मोदक
मस्त च.
आज दुपारी त्यांनी एअरटेलला
ICICI Bank Account Low Balance amount deduction
In reply to ICICI Bank Account Low Balance amount deduction by राहुल०८
सुंदर !! अभिनंदन!!
In reply to ICICI Bank Account Low Balance amount deduction by राहुल०८
झकास.. अभिनंदन.!!
मला एक प्रश्न पडलेला आहे. पण
In reply to मला एक प्रश्न पडलेला आहे. पण by पिलीयन रायडर
शाळेला " xxx रूपये
In reply to मला एक प्रश्न पडलेला आहे. पण by पिलीयन रायडर
हे सर्व मुद्दे लिहुन मी
In reply to हे सर्व मुद्दे लिहुन मी by पिलीयन रायडर
व्वाह..!!! अभिनंदन.
In reply to व्वाह..!!! अभिनंदन. by मोदक
आपला आशिर्वाद आहे सर!
दुकान
आय डिया ची तक्रार करायची आहे
In reply to आय डिया ची तक्रार करायची आहे by विटेकर
प्रिपेड आहे की पोस्टपेड आहे
In reply to प्रिपेड आहे की पोस्टपेड आहे by मोदक
पॉस्त
...
कथा न घेतलेल्या क्रेडिट कार्डाची !
या महिन्यात वेगवेगळ्या