हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
" मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
" हो. कुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला.
" मग मंदिरात कसे आला ?"
" तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो."
" तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो."
" देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छा" मी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल."
" आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला.
"ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
" ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला.
" त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
" सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
" ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
" अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
" चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो.
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
" आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही."
" पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला.
" ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "
"गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले.
" ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा."
गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे.
.................................................................................
वर्गीकरण
वाचने
108265
प्रतिक्रिया
421
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्या काही श्रद्धा आहेत त्या
In reply to माझाही कर्मकांडांना विरोध आहेच by ट्रेड मार्क
मंत्रशक्तिने उपचार म्हणजेच
In reply to तुमचे अनुभव वाचले. त्यातून by नगरीनिरंजन
मला अल्ट्रासाऊंड वगैरे माहीत
In reply to मंत्रशक्तिने उपचार म्हणजेच by स्वप्नांची राणी
अल्ट्रा साऊंड होते
In reply to मंत्रशक्तिने उपचार म्हणजेच by स्वप्नांची राणी
पहिला अनुभव माझ्या बाबांचा
In reply to बहुधा इथे कोणीच येणार नाही. by आनन्दा
खरे तर हा प्रतिसाद अस्थानी
In reply to पहिला अनुभव माझ्या बाबांचा by मार्मिक गोडसे
ओके.
In reply to खरे तर हा प्रतिसाद अस्थानी by आनन्दा
या सार्याशी मी सहमत आहे. पण
In reply to ओके. by मार्मिक गोडसे
@ आनन्दा.
In reply to या सार्याशी मी सहमत आहे. पण by आनन्दा
जनावरांच्या जखमेवर पेट्रोल
In reply to ओके. by मार्मिक गोडसे
पहिला अनुभव माझ्या बाबांचा
In reply to बहुधा इथे कोणीच येणार नाही. by आनन्दा
.
मी व माझा देवhttp://mr
100
शंभरी
In reply to 100 by जेपी
पुरुष जर नास्तिक असेल आणि
विजुभाऊ - तुमच्याकडे
In reply to पुरुष जर नास्तिक असेल आणि by विजुभाऊ
प्रसाद नाकारण्याचे कारण काय ?
कारण प्रसाद म्हंटले की नियम आलेत
In reply to प्रसाद नाकारण्याचे कारण काय ? by सप्तरंगी
पदार्थ म्हणून खाताना प्रसादास
In reply to कारण प्रसाद म्हंटले की नियम आलेत by मराठी कथालेखक
हाच सल्ला अस्तिकांना पण लागू होतो ना ?
In reply to पदार्थ म्हणून खाताना प्रसादास by सप्तरंगी
भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात
In reply to हाच सल्ला अस्तिकांना पण लागू होतो ना ? by मराठी कथालेखक
पण प्रसादाबद्दलच्या भावना
In reply to भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात by सप्तरंगी
काळा पडलेला प्रसाद.....
In reply to हाच सल्ला अस्तिकांना पण लागू होतो ना ? by मराठी कथालेखक
मग जे झालं ते चांगलं झालं की
In reply to काळा पडलेला प्रसाद..... by प्रभाकर पेठकर
चुकीचे होते ते.
In reply to मग जे झालं ते चांगलं झालं की by असंका
आपले म्हणणे योग्य आहे.
In reply to चुकीचे होते ते. by प्रभाकर पेठकर
आपण पाहतोय ते हे नास्तीकत्त्व
In reply to कारण प्रसाद म्हंटले की नियम आलेत by मराठी कथालेखक
का मिरवू नये बरे ?
In reply to आपण पाहतोय ते हे नास्तीकत्त्व by sagarpdy
हि विचाराची संयतता हि आपले
In reply to आपण पाहतोय ते हे नास्तीकत्त्व by sagarpdy
हि विचाराची संयतता हि आपले नास्तीकत्त्व "मिरवण्यापेक्षा" अधिक महत्त्वाची!***** स ह म तकाही आस्तिकांच्या भावना उगाचच
मला वाटते अतिरेक वाईट, मग तो
ह्यात दुसरा एक प्रकार ही असू
मी पण नास्तिक
+१
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
प्लस १११
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
लाडू खाल्ला नाही म्हणून भडकले
आपण बहुतेक लोक ( आस्तिक किंवा
रोचक चर्चा आहे... =))
इथे खुप लोक यनावालांच्या
उत्तम प्रतिसाद
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
+१
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
सहमत.
In reply to +१ by प्रकाश घाटपांडे
या धाग्यावरचे
In reply to सहमत. by संदीप डांगे
डांगे.. बुद्धिला मर्यादा
In reply to सहमत. by संदीप डांगे
बुद्धिला मर्यादा आहेतच >>>
In reply to डांगे.. बुद्धिला मर्यादा by पिलीयन रायडर
प्रतिसाद आवडला
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
खूप छान लिहिले आहे, तुमची
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
ठाम, सुस्पष्ट विचार
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
सिलेक्टिव!!!
In reply to ठाम, सुस्पष्ट विचार by यनावाला
>> पिरातैंनी एवढा मोठ्ठा
In reply to सिलेक्टिव!!! by ट्रेड मार्क
@मराठे
In reply to >> पिरातैंनी एवढा मोठ्ठा by मराठे
अगदी अचूक मांडणी. प्रतिसाद ऑफ
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
गुरुजीमी नवस केला, आणि मला
In reply to अगदी अचूक मांडणी. प्रतिसाद ऑफ by राजेश घासकडवी
सुंदर सारासारविवेकी प्रतिसाद
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
छान!
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
बऱ्याच अंशी सहमत पण काही बाबतीत वेगळा विचार
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
वैश्विक शक्ति म्हणा किंवा इतर
In reply to बऱ्याच अंशी सहमत पण काही बाबतीत वेगळा विचार by ट्रेड मार्क
सकारात्मकता जोपासावी.
In reply to वैश्विक शक्ति म्हणा किंवा इतर by पिलीयन रायडर
इथे खुप लोक यनावालांच्या
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
मी वर तेच म्हणतेय.. बॉसला न
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by प्रसाद१९७१
_/\_
In reply to इथे खुप लोक यनावालांच्या by पिलीयन रायडर
सगळी चर्चा वाचली. बनेल होमो
आशावादी म्हणजे काय?
देवाला नवस केल्याने मुल(गा)
In reply to आशावादी म्हणजे काय? by गामा पैलवान
कोणताच दोश नसेल तर
In reply to देवाला नवस केल्याने मुल(गा) by मराठे
जर आपल्याकडे पैसा आणि वेळ
In reply to कोणताच दोश नसेल तर by संदीप डांगे
देवाची मर्जी = ?
In reply to जर आपल्याकडे पैसा आणि वेळ by मराठे
भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात
चुकून इथे पोस्ट झाले
In reply to भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात by सप्तरंगी
आस्तिकांचा बाय डिफॉल्ट
डॉक्टरसाहेब,
In reply to आस्तिकांचा बाय डिफॉल्ट by डॉ सुहास म्हात्रे
नास्तिकांना नेहमीच वाटते की
In reply to डॉक्टरसाहेब, by प्रभाकर पेठकर
सॉरी
In reply to नास्तिकांना नेहमीच वाटते की by प्रसाद१९७१
दुटप्पीपणा नाही....
In reply to सॉरी by नाखु
>>>>इथेच लादणे दिसते पेठकर
In reply to नास्तिकांना नेहमीच वाटते की by प्रसाद१९७१
पण आपलं कांही चुकतंय, आपण
In reply to डॉक्टरसाहेब, by प्रभाकर पेठकर
निम्मी चर्चा तर प्रसादाच्या
मी नास्तिक नाही, पण तरीही
असहिष्णूता... आस्तिकांची की नास्तिकांची???
अगदी अगदी
In reply to असहिष्णूता... आस्तिकांची की नास्तिकांची??? by प्रभाकर पेठकर
नास्तिकांचा गट असू शकतो पण
In reply to अगदी अगदी by राही
हि एका नास्तिकाने कथन केलेली
In reply to असहिष्णूता... आस्तिकांची की नास्तिकांची??? by प्रभाकर पेठकर
"पण मन श्रद्धेने लिप्त झाले
In reply to हि एका नास्तिकाने कथन केलेली by हतोळकरांचा प्रसाद
पेठकर काका
In reply to असहिष्णूता... आस्तिकांची की नास्तिकांची??? by प्रभाकर पेठकर
विचारप्रवर्तक लेख ...
अनुभव
प्रथम यनावालांचे इतर लेखनही वाचा
http://yanawalavalakar
In reply to प्रथम यनावालांचे इतर लेखनही वाचा by प्रकाश घाटपांडे
धन्यवाद !
In reply to प्रथम यनावालांचे इतर लेखनही वाचा by प्रकाश घाटपांडे
त्यांतील "बिनडोकपणाचा कळस "
In reply to धन्यवाद ! by यनावाला
इतके
ज्या तोंडाने मी प्रसाद
मला इन जनरलच एक प्रश्न पडलाय.
In reply to ज्या तोंडाने मी प्रसाद by तुडतुडी
अहो पिरा असं काय करताय...
In reply to मला इन जनरलच एक प्रश्न पडलाय. by पिलीयन रायडर
एखादी चांगली गोष्ट झाली कि
In reply to ज्या तोंडाने मी प्रसाद by तुडतुडी
आवडले
In reply to एखादी चांगली गोष्ट झाली कि by प्रकाश घाटपांडे
तेही आस्तिकच.
In reply to एखादी चांगली गोष्ट झाली कि by प्रकाश घाटपांडे
१) देवळात जाणारे सगळेच भक्त
In reply to तेही आस्तिकच. by प्रभाकर पेठकर
नीट कळले नाही.
In reply to १) देवळात जाणारे सगळेच भक्त by प्रकाश घाटपांडे
जत्रेत जसे हौशे गवशे नवशे
In reply to नीट कळले नाही. by प्रभाकर पेठकर
अरे बापरे.....
In reply to जत्रेत जसे हौशे गवशे नवशे by प्रकाश घाटपांडे
:)
In reply to अरे बापरे..... by प्रभाकर पेठकर
प्रतिसादात वापरलेली भाषा
In reply to ज्या तोंडाने मी प्रसाद by तुडतुडी
+१
In reply to प्रतिसादात वापरलेली भाषा by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by मराठी कथालेखक
नावाला हे कठोर नास्तिक म्हणून
थोडेफार सहमत,
In reply to नावाला हे कठोर नास्तिक म्हणून by तुडतुडी
कशाला स्वतःला निर्बुद्ध
In reply to नावाला हे कठोर नास्तिक म्हणून by तुडतुडी
नास्तिकाने देवाबद्दल जे
पण बहूधा पहिली खोड अस्तिकच काढतात
In reply to नास्तिकाने देवाबद्दल जे by प्रसाद१९७१
आता इतका वादविवाद झाला, आणि
मुददा अगदी बरोबर आहे.
In reply to आता इतका वादविवाद झाला, आणि by डॉ सुहास म्हात्रे
सहमत
In reply to आता इतका वादविवाद झाला, आणि by डॉ सुहास म्हात्रे
आस्तिक काय म्हणाले हे पण
In reply to आता इतका वादविवाद झाला, आणि by डॉ सुहास म्हात्रे
सर्वच वाद, काथ्याकूट एकतर्फीच.
In reply to आता इतका वादविवाद झाला, आणि by डॉ सुहास म्हात्रे
पेठकर साहेब,
In reply to सर्वच वाद, काथ्याकूट एकतर्फीच. by प्रभाकर पेठकर
"पीडीत मानसिकतेचा (व्हिक्टीम
In reply to पेठकर साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर साहेब,
In reply to पेठकर साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे
In reply to डॉक्टर साहेब, by प्रभाकर पेठकर
तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही ह्यात कोणा एका वक्तीला त्रास होतो अशातला भाग नाही तर ह्यातून अव्यवहार्य कर्मकांडाचे महत्व वाढील लागून आख्या समाजाच्या वर्तनावर परिणाम होतो असे मला वाटते.मानवी मनाची जडणघडणच अशी आहे की बहुसंख्य माणसांना स्वबळावर स्वतंत्रपणे परखड आचारविचार जमत नाही. त्यांना कोणा ना कोणाचा कमीजास्त प्रमाणात मानसिक आधार लागतो. यामुळेच धर्मापासून राजकारणापर्यंत नेते तयार होतात व लोक त्यांच्या मागे कधी डोळसपणे, तर बहुदा अंधपणे जाते. ही जीवशास्त्रीय वस्तूस्थिती आहे. आता माझ्या मताने सामान्य जीवनातली वस्तूस्थिती : या जगात पूर्ण पांढरे किंवा पूर्ण काळे असे काहीच नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा आहेत. तेव्हा एका टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाने दुसर्या टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाचे काही एका ठराविक सीमेपर्यंत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण त्या सीमेपलिकडे अश्या प्रयत्नांचा परिणाम हवा त्यापेक्षा उलटा होऊन टाळू शकणारी त्रासदायक / दुखःद परिस्थिती अथवा संघर्ष निर्माण होतो. अश्या वेळेस माझ्या वर म्हटल्याप्रमाणे, "इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते." अश्या सगळ्या माणसांपासून माझी वरच्या प्रतिसादात लिहिलेली मते लपलेली नसतात... किंबहुना मी ती स्पष्टपणे सांगितलेली असतात. हे जग विविधतेने भरलेले आहे आणि काही थोडे अतिरेकी अपवाद सोडल्यास ही विविधताच जग जास्त सुंदर, मनोरंजक व आनंददायक बनवते. सर्वच बाबतीत सगळे जग माझ्यासारखेच वागले पाहिजे नाहीतर ते माझ्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही (याला इंग्लिश्मध्ये सुंदर चपखल वचन आहे : माय वे ऑर हाय वे.) हे म्हणणे मला ठीक वाटत नाही. असे करणे अतिरेकी / ऑटोक्रॅटीक / कम्युनिस्ट व्यवस्थेचे लक्षण आहे. नव्या पिढीचा कर्मकांडांसंबंधी विचार/कृती पाहिली तर त्यांचे महत्व काळाबरोबर कमी होईल असेच दिसते... जसे मागच्या पिढीच्या तुलनेत आपल्या पिढीत झाले आहे. शिवाय आधुनिक काळातल्या वाढत जाण्यार्या धकाधकीत निरुपयोगी प्रथा-कर्मकांडे कमी कमी होत जातील असेच दिसते. काही गोष्टींना थोडा वेळ देणे जास्त श्रेयस्कर होईल असे वाटते. प्रत्येक कृती करण्यात वा न करण्यात फायदा आणि तोटा असतोच... त्यांचे तौलनिक प्रमाण पाहून ते फायदेशीर असल्यासच ती कृती करावी अथवा न करावी असे मला वाटते. मानवी इतिहास पाहिला असती हेच दिसते की सतत जुन्या प्रथा-कर्मकांडे जाऊन त्यांची जागा नवीन प्रथा-कर्मकांडे घेत असतात... ज्या काळात सामाजिक-मानसशास्त्रियदृष्ट्या लोकांना जरूर वाटते व परवडते ते टिकते, नाहीतर ते नष्ट होते व त्याची जागा नवीन काहीतरी घेते. कारण, मानसशास्त्रिय/वैचारीक/तात्वीक निर्वात अवस्थेत (आयडियालॉजिकल व्हॅक्क्युम) माणूस आनंदी/खुशाल राहू शकत नाही. जसे सर्व १००% मानवांची शरीरे (उंची, वजन, आरोग्य, इ बाबतीत), १००% वेळेस, १००% एकसारखी नसतात, तसेच मनाचे आहे. अर्थातच, वास्तव जीवनात छोटे-मोठे विसंवाद अपेक्षितच आहेत... जोपर्यंत हे विसंवाद धोकादायक किंवा असह्य नसतात, तोपर्यंत त्यांना शल्यचिकित्सेची गरज नसते, सुसंवादाने त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करावा, तेही न जमल्यास "असहमतीवर सहमती (अॅग्री टू डिसअॅग्री)" या तत्वावर आनंदी सहजीवन शक्य असते; असे माझे मत आहे. वरच्या कृतीने ; (अ) आजचे आनंदी सहजीवन (जगा आणि जगू द्या) शक्य होईल, (आ) मी माझी मते स्पष्टपणे सांगत असल्याने, आत्ता कर्मकांडांवर विश्वास ठेवणार्यांचे भविष्यात मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते... याउलट संघर्षाचा परिणाम अहं (इगो) दुखावून माणूस मूळ मतांशी (चूकीची असली तरी) जास्त घट्ट चिकटण्याची शक्यता वाढते. हा प्रतिसाद जरा मोठा झाला. पण माझा निर्णय केवळ "सोपी तडजोड" म्हणून केलेला नसून त्यामागे मला पटलेला काही विचार आहे हे सांगण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे. मुख्य म्हणजे : लेखकाने इतर काही सोईस्कर प्रतिसादावर मतप्रदर्शन केले आहे. पण, माझ्या प्रतिसादात मांडलेल्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले आहे (जे इतरांच्या अगोदरच्या प्रतिसादांप्रमाणे अपेक्षित होते). याचा अर्थ माझे मुद्दे लेखकाला मान्य आहेत असे वाटते आहे. असो.मते आणि टोकाची मते.
In reply to तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे by डॉ सुहास म्हात्रे
पेठकर साहेब, वर तुम्ही उधृत
In reply to मते आणि टोकाची मते. by प्रभाकर पेठकर
ओके.
In reply to पेठकर साहेब, वर तुम्ही उधृत by डॉ सुहास म्हात्रे
स्वस्तिक
हॅहॅ
In reply to स्वस्तिक by तिमा
ओक्के
खायचा ना!!
In reply to ओक्के by इरसाल
नाय हां
In reply to खायचा ना!! by पिलीयन रायडर
करोडोंची नासाडी.
In reply to नाय हां by पैसा
तायडे.. मी सगळीकडेच वाद घालत
In reply to नाय हां by पैसा
=))
In reply to तायडे.. मी सगळीकडेच वाद घालत by पिलीयन रायडर
नाय
In reply to खायचा ना!! by पिलीयन रायडर
ज्या तेरा लोकांनी
दिला असेल हो, यांनीच नाकारला
In reply to ज्या तेरा लोकांनी by मार्मिक गोडसे
"एक लाडू की आत्मकथा"
यनावाला सर तुम्हाला ईश्वर ही
जे ज्ञानोबा तुकोबा, नामदास,
In reply to यनावाला सर तुम्हाला ईश्वर ही by मांत्रिक
बंद करा हे सर्व. लोकांच्या
In reply to जे ज्ञानोबा तुकोबा, नामदास, by मांत्रिक
प्रभू येशू: अहो कष्टी व
In reply to बंद करा हे सर्व. लोकांच्या by मांत्रिक
मांत्रिकभाऊ,
In reply to प्रभू येशू: अहो कष्टी व by मांत्रिक
+१
In reply to मांत्रिकभाऊ, by राही
+२
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच
In reply to मांत्रिकभाऊ, by राही
@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच
In reply to मांत्रिकभाऊ, by राही
आणि हो माझ्या सर्व
In reply to @ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच by मांत्रिक
"क्षमस्व" कशाकरिता ?
In reply to @ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच by मांत्रिक
धन्यवाद सर...
In reply to "क्षमस्व" कशाकरिता ? by यनावाला
प्रभू येशू: अहो कष्टी व
In reply to बंद करा हे सर्व. लोकांच्या by मांत्रिक
प्रभू येशूनं एका वेश्येला
In reply to प्रभू येशू: अहो कष्टी व by मांत्रिक
शनी..शनी....विसरलात की हो...!
In reply to यनावाला सर तुम्हाला ईश्वर ही by मांत्रिक