कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे
लेखनप्रकार
प्रस्तावना : पुढील लेख कल्पनिक नाही. अनुभवाचे वर्णन आहे.
---------------------------------------------------------------------------------
एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.
बदलणार्या शाळांत, मेडिकल कॉलेजमध्ये, नव्या हॉस्टेलात जायचं, नवीन ओळखी, नवीन समाजात रुळायचं, अशी आदली वीस वर्षे गेली. गप्पांचे नवीन विषय, करमणुकीची नवीन साधनं आपलीशी करत जायची. बालपणातून पौगंडावस्थेत जायचे हे अनुभव सर्वसामान्य आहेत. पण माझे काहीतरी वेगळेही होते. मित्रामित्रांच्या घोळक्यांत अर्धी रात्र उलटेपर्यंत मस्तपैकी गप्पा चालायच्या. त्यांच्यात मी सामील होतोही, पण एका प्रकारे नव्हतोही. मुलांच्या टवाळक्यांमध्ये पुन्हापुन्हा खाजवून येणारा एक विषय होता - मुली! लोकलज्जेला साजून दुरून-दुरून बोललेलो असतो, त्यांना कधी हात लावलेला नसतो. पण त्यांच्या विचारानेच बेजार होणारी आपली मनं, उत्तेजित होणारी आपली शरिरं. मीही टवाळक्यांत होतो - म्हणजे शरीर बेजार झाल्याचा अनुभव मलाही होता. रात्री ओला जागायचो तो बाकीच्यांसारखांच. पण त्यांची जागेपणी बेजार होणारी मनं काही माझ्या स्वत:च्या अनुभवातली नव्हती. वयात येणार्या शरिराचे पुस्तकी बदल मी शिकलेले होते. शरीररचनेचं, क्रियांचं ज्ञान तर अभ्यासक्रमातून उत्तम कळलं होतं. तरी मित्रलोक त्यांच्या मनात मुलींबद्दल जे काय चालतंय म्हणायचे, ते एक तर वखवखलेलं वाटायचं, नाहीतर पोरकट वाटायचं. आणि स्वानुभवात नसल्यामुळे, अगदी नाटकी वाटायचं.
लपून-छपून फिरणारी ती पुस्तकं मला भडक आणि निरुपयोगी वाटायची. त्यांत उगाच थोडक्यात घुसडलेलं भावनातिरेकाचं वर्णन खोटं वाटायचं. बहुतेक अवांतर होतंच! तेव्हा त्या पोर्नो पुस्तकांचं सोडा. तसं बघता कालिदासासारखे कवीसुद्धा शारिर वर्णने करायला लागले की कमालीचे भावुक होतात... पण तीसुद्धा मला उच्च दर्जाची उदात्त अतिशयोक्ती वाटायची. कवी आपलेच विचार आपल्यापेक्षा प्रभावी शब्दांत मांडतो आहे, असे जाणवून मी कधी हुरळून जायचो नाही. थोडक्यात असं की मला शरीराचं तंत्र माहितीचं होतं, पण लैंगिकतेच्या भावविश्व अनोळखी होतं. आणि माझं दारिद्र्य इतकं की त्याच्यावाचून माझं काही आडलं होतं, हेसुद्धा ठाऊक नव्हतं. म्हणजे मूर्त विचारांत कधी या उत्कट शरीर-भावना संबंधाची गरज भासली नव्हती. अमूर्त विचारांत काय वावटळी चालू होत्या त्या स्वप्नांतच उधळायच्या, स्वप्नांतच थकायच्या. त्या काळात मला विचारलं असतं, तर मी मनापासून म्हटलं असतं, "अरे, आपल्या वयातल्या भडक स्वप्नांचं काय घेता... मला ती सकाळी आठवतसुद्धा नाहीत!"
मेडिकल कॉलेजमधले मित्रांच्या लक्षात आलं होतं की मुलींच्या विषयी वैषयिक गप्पा स्वत:हून मी कधीच काढत नाही. पैकी काही म्हणायचे, "बैरागी"; काही म्हणायचे, "ढोंगी". पण मला माहीत होते की दोन्ही टोमणे खरे नव्हते - मला कसलं वैराग्यही नव्हतं, आणि माझ्या मनात भानगडीही नव्हत्या.
वय वर्षे पंचवीस चालू असताना विद्यापीठाच्या गंथालयात मी गेलो होतो, आणि केवळ डोळ्यासमोर होते म्हणून कुतूहल वाटून एक पुस्तक ओढून काढलं - "समलैंगिकता". मेडिकल कॉलेजचंच ग्रंथालय, मोठे अभ्यासपूर्ण पुस्तक होतं. तसं वस्तुनिष्ठ, कोरडं. पण बाकीच्या वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं. हे शारिरिक वर्णनं करत नव्हतं, भावनांचं विश्लेषण करत होतं. पानं उलटता-उलटता मी शाहारलो - यात माझं चरित्र लिहिलं आहे. पुस्तक लिहिलेलं होतं अमेरिकन वाचकांसाठी. त्यांची संस्कृती, धर्म वेगळे. त्यांचे शाळेतले अनुभव वेगळे. वास्तविक त्यातील तपशिलांशी मला जोडणारं काय असू शकत होतं? पण माझ्या आतड्याशी नातं जुळलं होतं. झोपेतून खाडकन जागं व्हावं तसं त्या क्षणी मी म्हटलं - हा "मी" आहे. ती स्पष्ट ओळख होती. एकेक मुद्द्याच्या तर्काची गरज नव्हती, कारण तर्क दहा वर्षांच्या अमूर्त आठवणींत सिद्ध होते. या क्षणी पहिल्यांदा मूर्त विचारांत जे प्रकट झालं ते आधीपासूनच माहीत असलेलं निर्विवाद ज्ञान होतं.
ज्ञान इतके निर्विवाद होतं की माझ्या वैज्ञानिक मनाला कारणं शोधावीशीच वाटली, तर "इतका उशीर कसा काय झाला?" याबद्दल. अगदी शाळेतही शरिराला चाळवणारं कोण होतं, कोणीकोणी मुलगेच होते, हे स्पष्ट आठवलं. रात्री ओली करणारी, स्मृतीतून पुसून टाकलेली स्वप्ने कोणाकोणत्यातरी मुलग्यांबद्दलच होती, ते स्पष्ट आठवलं. इतक्या स्मृती खर्याखरच्या नाही पुसून टाकता येत. फारतर पुरून ठेवता येतात. मूर्त विचारांत पंचविसाव्या वर्षी आलेला हा विचार अमूर्त अंत:करणात उमलून एक तप झालं होतं.
आजवर कुलूप लावलेलं एक दालन त्या क्षणी माझ्या मनात उघडलं. त्या दालनाच्या खिडकीतून जगाकडे बघायचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. माझ्या मित्रांची वखवख (होय, मुलींबद्दलची वखवख) त्यांच्या पौगंडावस्थेला अनुरूप, नैसर्गिक होती, असं इतक्या वर्षांच्या नंतर मला पहिल्यांदा जाणवलं. कारण त्याच्या समांतर एक ओढ त्या दालनात माझ्यापाशीही होती. पण ज्या वयात वखवख म्हणून दिसली असती, बंद दारामागे बेशुद्ध पडलेली होती. या उघड्या दालनातून कालिदासाचं उदात्त काव्य मला त्याच्या अनुभवाचं होतं, असं जाणवलं - त्यात एक तसूभर अतिशयोक्ती नव्हती असं जाणवलं.
पूर्वी दूरदर्शनवर "बालिका वधू" नावाचा एक चित्रपट मी बघितला होता. अल्लड खेळकर मुलीचं दूरगावी शिकणाऱ्या मुलाशी लग्न होतं. लैंगिक प्रेम असं काही असतं याची जाण तिच्या बाल्यात अडकलेल्या मनाला होता होत नव्हती. मग कधी एकदा कोणार्कच्या सूर्यमंदिरात ती जाते. आणि तिथली मत्त शिल्पं बघताना अकस्मात शृंगार म्हणजे काय? ही तिची जाणीव जिवंत होते. पहिल्यांदा नवर्याच्या प्रेमपत्रांची आर्तता तिला मनापासून जाणवते. एका वैद्यकीय पुस्तकातले कोरडे शब्द वाचून, एका शांत ग्रंथमंदिराच्या कोनाड्यात तशीच काही जाणीव मला झाली.
प्रेम, कामना, वासना, या सर्वांना थारा देण्यासाठी आपल्या हृदयात एक ठिकाण आहे, हे जाणवलं. तसंच जाणवलं, या सर्वांसाठी आपण किती व्याकूळ आहोत. मला माहीत होतं, की तहान जाणवण्यात तृप्ती नाही, पाणी मिळण्यात आहे. पण आपल्या नकळत अशी गरज आपल्याला होती हे कळलं, तशी ती गरज पुरवायचा मी प्रयत्न करेन, कधी काळी ती पूर्ण होईल, याची आशा मला मिळाली. आणि या आशेच्या तोलामोलाची दुसरी कुठली मिळकत मला मिळालेली नाही.
---------------------------------------------------------------------------------
समारोपाचे शब्द :
वास्तविक ज्या मराठी संकेतस्थळावर मी केवळ साहित्यिक आनंद मिळवायला येतो, तिथले वाचक हे या अनुभवासाठी योग्य वाचकवर्ग आहे की नाही याबद्दल मला पुर्वी शंका होती. हल्लीच "आपण आणि आपले 'ठराविक साचे'" या चर्चेच्या संदर्भात हा अनुभव काही वाचकांना वाचावासा वाटेल, असे समजून पूर्वीच लिहिलेला हा लेख येथे प्रकाशित करतो आहे.
वरील लेख अनुभवाचे वर्णन आहे. वैद्यकीय माहिती देणारा नाही आणि तार्किक ऊहापोह करणाराही नाही. तसे कुतूहल असणार्यांनी हल्लीच लोकप्रभेत आलेला लेख वाचावा, बिंदुमाधव खिरे यांची मराठी पुस्तके वाचावीत, किंवा इंग्रजीतली या विषयावरची पुस्तके वाचावीत. तुम्ही विधिमंडळात नसल्यास, न्यायाधीश नसल्यास, तुम्हांपैकी कोणास समलैंगिकता नैसर्गिक वाटते, की अनैसर्गिक या बाबतीत मला विशेष स्वारस्य नाही. माझा डावखुरा भाऊ डाव्या हाताने खातो. ढुंगण पुसताना घाण खात्या हाताला लागणार नाही याची काळजी तो घेतो, पण ते कोणाला दिसते? मग कोणी त्याला "घाणेरडा" म्हटल्यास त्यांच्याकडे यथेच्छ दुर्लक्ष करतो. माझेही तसेच.
तुम्ही विधिमंडळाचे सदस्य असल्यास, किंवा तुम्ही न्यायाधीश असल्यास मी तुम्हाला एक आठवण करू इच्छितो. "नैसर्गिक" काय अशी वैयक्तिक व्याख्या करायची मुभा तुम्हाला घटनेने दिलेली नाही. मॅकॉले साहेबाच्या ख्रिस्ती धर्माची व्याख्या स्वीकारायची मुभा तुम्हाला घटनेने दिलेली नाही. (हिंदू धर्माने व्याख्या केलेलीच नाही, पण केली असती, तर तीही स्वीकारायची मुभा घटना तुम्हाला देत नाही. मनुस्मृतीत पुरुष समलिंगी संबंध ठेवल्यास "कपडे घालून स्नान" आणि गव्यप्राशन हे प्रायश्चित्त दिलेले आहे. स्त्री समलिंगी संबंध ठेवल्यास, स्त्रीचा लग्नाच्या बाजारात भाव उतरला-की-नाही त्यावर दंड अवलंबून आहे. आंतर्जातीय विवाहाला याच्यापेक्षा कितीतरी भयंकर दंड सांगितलेला आहे. त्यामुळे त्या स्मृतीप्रमाणे काय अधिक विचित्र आहे, तो निर्णय तुमचा तुम्ही करा. पण जो काही धार्मिक निर्णय कराल त्याचा भारताच्या, किंवा अमेरिकेच्या कायद्याशी काहीही संबंध जोडता येणार नाही.) तुम्ही कायदेमंडळात असाल, तर आरोपाची अनैतिकता सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपकर्त्याची आहे, हे जाणून व्यवहार करावा.
ज्या कोणाला कायदेशीर कारवाई करायची जबाबदारी नाही, त्याला हवा तो नैतिक-अनैतिक, नैसर्गिक-अनैसर्गिक विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे मी येथेच मान्य करतो. माहितीशिवायही दृढ कल्पना असणार्या लोकांना समर्थन देणे फार शिणवणारे काम आहे. ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे. अनोळखी लोकांना मी फक्त आपले अनुभव सांगू शकतो, ते वर सांगितलेत. अनोळखी लोकांना पटवण्याचे भावनिक श्रम घेण्याइतपत जिव्हाळा मला वाटत नाही. त्यांना पटले पाहिजे असा माझा आग्रहही नाही.
---------------------------------------------------------------------------------
वाचन
66258
वाचनखूण
प्रतिक्रिया
88
आपण चार
बिंदुमाधव
ब्राव्हो!!!!
धक्का - खूप थोड्या धाडशी लोकांपैकी तुम्ही एक आहात
शास्त्रीय कारणमीमांसा!
सलाम!
In reply to सलाम! by बेसनलाडू
असेच म्हणतो!!
इतकं
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
या
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
बालसंगोपनाची उर्मी
मनापासून आणि प्रामणिक
In reply to मनापासून आणि प्रामणिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to मनापासून आणि प्रामणिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
'बालिका
प्रिय मित्र
असामान्य
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to असामान्य by नंदन
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by मेघना भुस्कुटे
सहमत
In reply to असामान्य by नंदन
अगदी!
In reply to असामान्य by नंदन
+१
सुंदर प्रतिसाद
उलगडा
मनाची ताकद...
अतिशय
कमिंग आऊट
In reply to कमिंग आऊट by बिपिन कार्यकर्ते
अतिशय
In reply to अतिशय by मेघना भुस्कुटे
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे आपल्या
In reply to हे आपल्या by बिपिन कार्यकर्ते
उत्तम
In reply to कमिंग आऊट by बिपिन कार्यकर्ते
मलाही मूळ
सुंदर
प्रकटन आवडले
In reply to प्रकटन आवडले by प्रियाली
+१
In reply to प्रकटन आवडले by प्रियाली
अत्यंत धाडसी
लेख वाचला,
उत्तम कथन, माझं मत..
धनंजय, तुला मनःपूर्वक दाद!
स्पष्ट
हॅट्स ऑफ टू यू धनंजय..
धाडसी लेख.
प्रामाणिक लेख
उत्तम लेख
लेख, विचार आणि मांडणी
प्रामणिक
किती हा प्रामाणिकपणा...!!!
सहृदय वाचन
In reply to सहृदय वाचन by धनंजय
धन्याशेठ, ख
In reply to सहृदय वाचन by धनंजय
किंचित वेगळा मुद्दा
In reply to सहृदय वाचन by धनंजय
सर्वभक्षी
मोकळेपणा...
माझी वैचारीक पातळी उंचावली
In reply to माझी वैचारीक पातळी उंचावली by विसुनाना
गूगली नाही :-)
In reply to गूगली नाही :-) by धनंजय
आभार
In reply to आभार by विसुनाना
विरळा आणि श्रम
In reply to विरळा आणि श्रम by श्रावण मोडक
धनंजय - आत्मकथन
लेखन
मला वाटते...
सरपंच...
In reply to सरपंच... by श्रावण मोडक
सूचनेशी
Bravo DJ
In reply to Bravo DJ by समीर गोखले
संदर्भ
In reply to संदर्भ by श्रावण मोडक
पार्श्वभूमी संदर्भपूर्ण नाही पण...
In reply to पार्श्वभूमी संदर्भपूर्ण नाही पण... by आजानुकर्ण
असेच असावे - "समाजाच्या अपल्या विभागातही" असा संदर्भ
In reply to संदर्भ by श्रावण मोडक
स्वाभाविक संदर्भ
In reply to स्वाभाविक संदर्भ by एकलव्य
सहमत
हो. पण...
In reply to हो. पण... by श्रावण मोडक
श्रावण
वा
In reply to वा by Kamgaar_mahila
अगदी!
In reply to अगदी! by प्रियाली
आय-ओपनर / एकाच नावेतले प्रवासी
In reply to अगदी! by प्रियाली
Some resources
In reply to Some resources by Kamgaar_mahila
रोचक दुवे
In reply to रोचक दुवे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
सांगितलं ना
In reply to वा by Kamgaar_mahila
आक्षेप!!!
In reply to आक्षेप!!! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
प्रियालि व
In reply to प्रियालि व by Kamgaar_mahila
धन्य आहे!
In reply to धन्य आहे! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
वादे वादे
In reply to वादे वादे by धनंजय
नेमका उलटा प्रकार
In reply to वादे वादे by धनंजय
आनंदपर्वणी....
Dear Shravan and
मिसळपाव वर
लेख
In reply to लेख by शुचि
जैविक
मिसळपाववर वाचलेल्या प्रामाणिक
हा धागा वर काढल्याबद्दल
एका प्रगल्भ संस्थळावर एका
अप्रतिम लेख..
मिसळपाववरचा एक सुंदर लेख.