कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे
In reply to सलाम! by बेसनलाडू
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
In reply to मनापासून आणि प्रामणिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
धनंजय, तुमचं अतिशय प्रामाणिक लेखन फारच भावलं. प्रामाणिक लेखनाबद्दल अनेक आभार.असेच म्हणते. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
In reply to मनापासून आणि प्रामणिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to असामान्य by नंदन
In reply to अगदी अगदी by मेघना भुस्कुटे
In reply to असामान्य by नंदन
In reply to असामान्य by नंदन
In reply to कमिंग आऊट by बिपिन कार्यकर्ते
In reply to अतिशय by मेघना भुस्कुटे
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कमिंग आऊट by बिपिन कार्यकर्ते
In reply to प्रकटन आवडले by प्रियाली
In reply to प्रकटन आवडले by प्रियाली
अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.नको त्या व्यक्तीकडून वासनामय नजर अनुभवली तर नकोसे वाटेल, हा स्वयंस्पष्ट मुद्दा आहे. त्याचा समलैंगितकेशी स्पष्टसंबंध लागत नाही हे त्यांनीच सांगितले आहे. म्हणजे "एखादा पुरुष(ही)..." पण हा मुद्दा त्यांच्या मनात या संदर्भात आला. अन्य लोकांच्याही येतो. हे शक्य आहे, की अशा स्त्रियांकडून नको असलेली वासनामय नजर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात अनुभवली असेल. किंवा समलिंगी आकर्षण असलेली स्त्री सर्वभक्षी आहे अशी कल्पना मानलेली असावी. तात्यांनी दुजोरा दिलेला आहे, म्हणून हा मुद्दा पुरुषांनाही लागू आहे, असे येथे चर्चेत दिसते. काही लोकांची अशी धारणा आहे, हे जाणणे मला महत्त्वाचे असते. (हे मी आधीही जाणले आहे, पण प्रियाली यांनीही हा मुद्दा अधोरेखित केलेले आहे.) माझ्या बाबतीत विदा : पौगंडावस्थेतल्या अमूर्त आकर्षणानंतर मला तरी "सर्व पुरुषां"बद्दल आकर्षण नाही. फक्त ज्यांच्यावर थोडेफार प्रेम जमू लागले अशाच इन्या-गिन्या पुरुषांबद्दलच. तरी मला हे लक्षात ठेवले पाहिजे - काही पुरुषांना असे वाटते की मी त्यांच्याकडे वासनेच्या नजरेने बघतो. (त्यांना तसे का वाटते, हे कोडे आहे. पण जर त्यांना तसे वाटते असे ते म्हणतात, तर त्यांच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवतो, ठेवलाच पाहिजे.) माझ्याकडून वासनामय नजर नसतानाही ज्याला तशी नजर जाणवते, तशा पुरुषास चार हात लांब ठेवणे हे माझ्यासाठी योग्य धोरण आहे. जितकी त्या माणसाची संशयी दृष्टी, तितक्या प्रमाणात तो अविश्वासाने, माणुसघाणेपणे माझ्याशी वागेल, हे जाणून त्याच्याशी सावधानीने रोजव्यवहार करणे माझ्या दृष्टीने इष्ट. कित्येक पुरुष असे भेटतात, ज्यांना माझ्या नजरेत वासना आहे असे दिसत नाही (कारण तथ्यही तेच असते). कदाचित स्वतःच्या आकर्षक असण्याबद्दल अवास्तव कल्पना या पुरुषांना नसेल. किंवा मी सर्वभक्षी आहे, असे त्यांचा पूर्वग्रह नसेल. काही का असेना. सामान्य लोक एकमेकांना जितपत विश्वासाने, माणुसकीने वागवतात, त्याच प्रकारे असा पुरुष माझ्याशी वागेल. अशा पुरुषांशी तितक्याच विश्वासाने वागण्यासाठी माझे मन तयार असले पाहिजे. सवयीने कळते - कोणाच्या डोळ्यांत ही वासनेची अनाठायी (पण मनापासून) भीती आहे, आणि कोणाच्या डोळ्यांत नाही. एखाद्या समाजात जर बहुतेक पुरुष माझ्या नजरेत नसलेली वासना कल्पून बघत असतील, तर त्या समाजात माझा वावर कष्टाचा होईल. पण नागर समाजात असा पूर्वग्रह नसलेलेच बहुतेक पुरुष मला भेटतात, यामुळे माझे रोजचे जगणे तसे फारसे कठिण नाही.
In reply to सहृदय वाचन by धनंजय
In reply to सहृदय वाचन by धनंजय
अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.इथे माझा मुद्दा किंचित वेगळा होता. (स्त्री वेगळ्या नजरेने - वासनामय असेच नाही) पुरूष स्त्रियांकडे वेगळ्या नजरेने बघतात त्यावेळेस प्रत्येक स्त्रीला घृणा येतेच असे नाही. बरेचदा, ते आवडते असा अनुभव आहे. किंबहुना, पुरुषाने आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहावे हीच अनेकदा स्त्रियांची इच्छा असते. परंतु पुरूषाची वेगळी नजर वासनामय किंवा वखवख इतकीच दिसत असल्यास ते आवडेलच असे नाही. या उलट, स्त्रीने स्त्रीकडे केवळ वेगळ्या नजरेने पाहणे हे इतर स्त्रियांपेक्षा वेगळे असल्याने चटकन जाणवेल आणि बहुधा विचित्र वाटेल. मला वाटते कोणत्याही मनुष्याला इतर "सर्वांबद्दल" कधीच आकर्षण नसते. प्रतिसादाशी अवांतर: बाकी वर लिहिल्याप्रमाणे, आपल्यापेक्षा वेगळ्या असणार्या प्रत्येक माणसाच्या जागी आपण स्वतःला उभे करू शकत नाही किंवा तशी अपेक्षा इतरांकडून ठेवणे फार होते असे मला वाटते.
In reply to सहृदय वाचन by धनंजय
ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे.हे तुझे आत्मगत म्हण किंवा अनुभव म्हण पटवून घेताना मलाच भावनिक श्रम झाले. विदा/माहिती असूनही. कित्येकडाव वाटलं की तू एखादी गूगली टाकली आहेस. (तसं करण्यात तू पटाईत आहेस.अजूनही वाटतं._) इतरांच्या अनेक प्रतिसादांशी सहमत! विशेषतः - एक व्यक्ती म्हणून तुझ्याकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीत फरक पडला का? तर मुळीच नाही.
In reply to माझी वैचारीक पातळी उंचावली by विसुनाना
...हे उघड ... कशासाठी केलं असावंस? त्याला काही सबळ कारण आहे काय?याचे सोपे उत्तर आहे, माझा सामान्य व्यवहार [जमेल तितका] प्रामाणिक आहे. हे त्याचेच अंग. येथे अधोरेखित करतो - हा असामान्य प्रामाणिकपणा नाही, बाकीचे लोक जितपत प्रामाणिक असतात तितकाच प्रामाणिकपणा आहे. प्रसिद्धीसाठी उघड केले नाही, हे तर आधीच पटलेले आहे, त्यामुळे तो विचार पुढे चालवत नाही. - - - -
(एखादी स्त्री 'मी स्त्री आहे', एखादा पुरुष 'मी पुरुष आहे' म्हणून मुद्दाम सांगत नाही. तसं!)अत्यंत योग्य दिशेने विचार आहे. पण हा विचार इंटरनेटच्या पूर्वीच्या काळी निष्फळ ठरला असता. शरिराच्या आकारामुळे, वरच्या पट्टीतल्या आवाजामुळे, ऐकून-बघूनच स्त्री कोण आणि पुरुष कोण हे कळते. "भद्र"नावे (ऑफिशियल नावे) ही कित्येक भाषांत मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी असतात. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या/लेखाच्या संदर्भात लेखक/लेखिका पुरुष/स्त्री लगेच कळून येते. मिसळपावाच्या टोपणनांवात मात्र कोण पुरुष, कोण स्त्री हे कधीकधी कळून येत नाही. तरी कित्येकदा कोणाला उपप्रतिसादांत कोणी "अमुक-तमुक-दादा" म्हणते तर उप-उपप्रतिसाद येतो - "नाही, मी अमुक-तमुक-ताई आहे". स्त्रियांची नावे ("स्वाती, माधवी" वगैरे स्पष्ट, "सुहास, शिरीष" सारखी संदिग्ध नव्हे) घेऊन काही पुरुष मागे मिसळपावावर वावरत होते, त्याबाबत लेखा-प्रतिसादी झाली होती. असे दिसले की अनेक लोकांना हे ठीक वाटले नाही. पण कोणी पुरुषाने पुलंनी लिहिलेले पुरुष नाव "लखू रिसबूड" घेतले, किंवा कोणी स्त्रीने "सरला पित्रे" नाव घेतले, तर अशा प्रकारे चुकचुक होताना दिसत नाही. त्यामुळे मिसळपावाच्या सदस्यांनी नामनिर्देशाने शक्यतोवर आपण पुरुष की स्त्री आहोत असे सांगावे, असे मिसळपावाच्या अनेक सदस्यांना वाटते. असे दिसते, की बहुतेक लोक "आपण स्त्री की पुरुष" असे कुठल्यातरी पद्धतीने आपणहून सांगतात. नावाने नव्हे, तर "मला दादा नका म्हणू, ताई म्हणा" असे लिहून. - - - - खरे म्हणजे असे विचारता येईल की याच वेळी मिसळपावावर हे कसे काय सांगितले? माझ्या प्रकट (आभासी नव्हे) आयुष्यात ही बाब सांगून-न-सांगून उघड आहे. माझ्या प्रियकरासोबत मी घराबाहेर वावरत असतो, तेव्हा दोन प्रियकर एकमेकांशी ज्या प्रकारे वागतील त्याच प्रकारे मी वागतो. ऑफिसातल्या कोणी विचारले की तुझे लग्न झाले आहे का, किंवा तसे काही ठरले आहे का? तर जे आहे तेच उत्तर देतो. मागे माझ्या प्रियकराच्या गाडीला अपघात झाला होता, आणि मला ऑफिसहून सुटी घेणे भाग होते. तडकाफडकी सुटी मी कोण्या ऐर्यागैर्यासाठी घेत नव्हतो, आप्त माणसासाठी घेत होतो, हे ऑफिसातल्या वरिष्ठाना कळले नसते तर ते कोड्यात पडले असते. असे लहानसहान प्रसंग रोजच्या आयुष्यात दिवसाला दोनतीन येतात. उदाहरणार्थ कोणी विचारते "आज डब्यात आणलेल्या पदार्थाची पाककृती काय?" "मला माहीत नाही, उद्या त्याला विचारून सांगतो..." प्रश्न असा येऊ शकेल की जर माझ्या रोजच्या आयुष्यात मी इतका "सामान्य"पणे प्रामाणिक आहे (पुन्हा लिहितो, यात असामान्य असे काहीच सांगणे नाही), तर मग मिसळपावावर ही माहिती नवीन का? मिसळपावावर असे प्रसंग कितपत येतात, ते बघूया. मागे येथे कोणी क्ष यांनी सांगितले की "मला पाककृती करता येणार नाही, सौ. क्ष यांना सांगून करून घेईन." हे गरज नसताना "आपले लग्न झाले आहे" असे सांगत आहेत काय? मला असे वाटत नाही. किंवा तुम्ही तुमच्या पत्नीने काढलेली सुरेख चित्रे येथे दाखवून आम्हाला मोहवले होते. कोणी म्हणेल "ती तुमची पत्नी म्हणून सांगायची काय गरज होती. श्री. रामदास यांनी कोण्या तिर्हाईत चित्रकाराची चित्रे दाखवली, तसेच करायचे..." असे कोणी म्हणणे चूक आहे. तुमच्या लेखात "ही माझी पत्नी" ही आत्मीयता जाणवत होती. उद्या समजा मी माझ्या प्रियकराने काढलेली चित्रे येथे लावली. मी असे नाही म्हणणार "अशाच कुठल्या तिर्हाइताची चित्रे आहेत", तुम्ही पत्नीची म्हणून सांगितली तशी मी ती प्रियकराची म्हणून सांगेन. मिसळपावावर असे प्रसंग मला अनेक आले. येथेच मी अनेक प्रेमकविता प्रसिद्ध केल्या आहेत. पुरुष प्रियकराचा उगीच स्त्री म्हणून उल्लेख कुठेही केलेला नाही. त्याच्या प्रतिसाद-उपप्रतिसादात "कवितेतील प्रियव्यक्ती स्त्री की पुरुष" असा मुद्दा कधी उपस्थित झाला नाही. कदाचित एकदाच... "रविकर" या शारिर प्रेमकवितेत थानाचा उल्लेख होऊ शकला असता (पण झाला नव्हता) असे एका वाचकाने लिहिले होते - पण त्या कवितेत "ढुंगण" शब्द योग्य की अयोग्य याबद्दल जो संवाद झाला त्याच्याकडे माझे लक्ष जास्त होते. थोडक्यात मिसळपावावर माझे हे सांगणे संदर्भ होता तेव्हा झाले होते. संदर्भ नव्हता तेव्हा हा विषय मनातसुद्धा आला नाही. यात जाहिरातही नाही, आणि लपवाछपवीही नाही. मग हा अधिक तपशीलवार लेख आता का दिला? आता काय संदर्भ होता? असा तुमचा प्रश्न असू शकतो. हा प्रश्न मी लेखाच्या "समारोपात" हाताळला होता. मिसळपावावर मी काही साहित्यिक आनंद घेण्यासाठी येतो, आणि ज्या काही चर्चा येथे चालू असतात, त्यांच्यात भाग घेतो. समलिंगितेबद्दल थेट चर्चा फारशी येथे झालेली नाही. ही चर्चा सुरू करणासाठी मी विशेषज्ञ नाही. (मी कधीकधी पोटातला वायू ढेकरेवाटे सोडतो, हे माझ्या पोटात बरे वाटण्याकरिता फार महत्त्वाचे आहे. हे मी लपवतही नाही - म्हणजे ढेकर दिल्यास आपण ढेकर देऊच शकत नाही असा कांगावा करत नाही. पोटात वायू होता, तो बाहेर टाकल्यामुळे बरे वाटले, असे सरळसरळ संगतो. ढेकर देतो या गोष्टीची जाहिरातही करत नाही. काही लोक जठरातील वायू-उत्सर्जन क्रियेचा अभ्यास करतात, आणि त्याबद्दल लेख लिहितात. मी तसा अभ्यास करत नाही, त्यामुळे तसे अभ्यासपूर्ण लेखही लिहीत नाही. त्याचप्रमाणे या बाबतीत. पण जर कोणी म्हटले "ढेकरा देणारे लोक निसर्गतः नसतात" तर मी स्वतःचे उदाहरण विदा म्हणून देऊ शकतो - "मी ढेकर देतो, आणि सहेतुक दुष्ट हेतूने देत नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' ढेकर देतो." मला वाटते असा विदा देणे सुसंदर्भ आहे. मग मला कोणी विचारले - "ढेकरेची शरीरशास्त्रीय कारणमीमांसा सांग, नाहीतर तुझा विदा अमान्य" तर माझ्या मते "कारणमीमांसा नाही सांगणार" असे उत्तर योग्य ठरावे. शरीरशास्त्राऐवजी तुमच्या मित्राचा अर्थशास्त्राचा अभ्यास असता, तर तो कपाळ कारणमीमांसा सांगणार आहे. तरी त्याच्याकडूनही "ढेकर देतो, दुष्ट हेतूने देत नाही, जिथवर कळते, 'निसर्गतःच' ढेकर देतो." हा विदा मान्य असायला पाहिजे.) समारोपात दुवा दिलेल्या लेखात चर्चा चालू होती की "समलिंगी आकर्षण असणारे लोक निसर्गतः नसतात" तर मी स्वतःचे उदाहरण विदा म्हणून देऊ केला - "मला समलिंगी आकर्षण आहे, आणि ते सहेतुक दुष्ट हेतूने नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' आहे." मला वाटते असा विदा देणे सुसंदर्भ आहे. मग मला कोणी विचारले - "या आकर्षणाची शरीरशास्त्रीय कारणमीमांसा सांग, नाहीतर तुझा विदा अमान्य" तर माझ्या मते "कारणमीमांसा नाही सांगणार" असे उत्तर योग्य ठरावे.शरीरशास्त्राऐवजी माझा अर्थशास्त्राचा अभ्यास असता, तर मी कपाळ कारणमीमांसा सांगणार होतो. तरी "समलिंगी आकर्षण आहे, आणि ते सहेतुक दुष्ट हेतूने नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' आहे." हा विदा मान्य असायला पाहिजे. त्यामुळे वर विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे देणार नाही. काही प्रश्न विदा स्पष्ट करायला सांगतात, त्यांची उत्तरे देईन.
१. समलैगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर काय असते?(एखाद्या स्त्रीबद्दल वाटणारं शारीरीक आकर्षण आणि मानसिक आकर्षण यातला फरक पुरुषाच्या दृष्टीकोनातून मला माहित आहे.)जसा विचारला तसे उत्तर देता येणार नाही. स्त्रीच्या भावनांबद्दल तुमच्या मनात जी काही कल्पना आहे, त्याच्याशी तुलनात्मक विवेचन करता येणार नाही. "समलैंगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर माझ्यासाठी काय आहे?" या प्रश्नाचे उत्तर देईन. शारिरिक पातळीवर शरीरसंबध हवाहवासा वाटतो. भावनिक पातळीवर सहवास हवाहवासा वाटतो. प्रियकराशी सारखे बोलावेसे वाटते. प्रियकर जेव्हा भेटायला पाहिजे तेव्हा दिसला नाही तर असामान्य काळजी वाटते (बाकी लोकांबद्दल वाटत नाही). प्रियकराकडून बालहट्ट पुरवून घेणे, बालहट्ट पुरवणे याबाबत भावनांना मनात जागा आहे. (अन्य लोकांसमोर बालहट्ट कधी करत नाही, त्या भावना उद्भवतच नाहीत. अन्य प्रौढ लोकांनी माझ्यासमोर बालहट्ट केला, तर साधारणपणे आवडत नाही.) वगैरे, वगैरे. या भावनांचे कवितांमध्ये वर्णन आलेले आहे. या सर्व भावना शारिरिक नाहीत. याचा माझ्यापुरता समलैंगिकतेशी संबंध असा - भावनिक आणि शारिरिक आकर्षण एकत्र असले, की ते काही खास असते. हृदयाशी जास्त भिडलेले असते. असे भावनिक-शारिरिक जोड-आकर्षण मला ज्या लोकांबद्दल वाटले, ते सर्व पुरुष आहेत. ज्या काळात फक्त स्वप्नरंजन केले, त्या काळात स्वप्नातले आभासी प्रिय लोक पुरुषच होते. ते स्वप्नरंजन शारिरिक-भावनिक जोड-स्वप्नरंजन होते.
एखाद्या पुरुषात/स्त्रीत मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका कशामुळे उत्पन्न होतात?दुहेरी भूमिकेचा वैयक्तिक अनुभव मला नाही. माझी एकच मानसिक भूमिका आहे. (भूमिकांचे स्त्री/पुरुष असे वर्गीकरण करणारे निकष सांगितल्यास, ती जी एकच भूमिका आहे, ती कुठली ते सांगेन. माझ्या मते लोक ज्याला "पुरुष" भूमिका म्हणतात, तशीच काही माझी मानसिक भूमिका आहे.) म्हणून मला उत्तर देता येणार नाही. पण जर माझ्या मित्रांपैकी मला असे कोणी सांगितले की त्याच्यात (किंवा तिच्यात) मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका उत्पन्न होतात, तर त्यांना "उत्तर द्यायचे आहे का" विचारून बघीन. तोवर तुम्ही आणि मी, दोघेही प्रकाशित पुस्तकांमधून (संकेतस्थळांवरून) ही माहिती जमा करू शकतो.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी तू 'ते ' पुस्तक वाचले नसतेस तर तू सामान्य पुरुष म्हणून वावरला असतास काय?बहुधा ते पुस्तक नसते तर दुसरे काही निमित्त झाले असते. दहाबारा वर्षांच्या अमूर्त स्मृतींचा विदा साठला होता. पण कधीकधी असा भयाण विचार येतो - बारा वर्षे "शारिरिक-भावनिक जोड-प्रेम असते" ही भावना दाबून टाकली होती ती आणखी दहा-बारा वर्षे तशीच पुरून ठेवली असती तर? भावनेच्या दृष्टीने अधू असे ते जीवन मी आणखी कित्येक वर्षे कंठत राहिलो असतो. मला प्रेमकविता, थिल्लर प्रेमपट, प्रामाणिकपणे कधी समजले नसते. माझ्या ओळखीतल्या माझ्या वयाच्या काही "सामान्य" (स्पष्ट : समलिंगी नव्हेत) पुरुषांनी ठरवलेल्या मुलीशी निष्प्रेम विवाह केलेले आहेत. त्यांच्यातले ताणतणाव फार दु:खद दिसतात. (पुन्हा स्पष्ट : समलिंगी नव्हेत. घटस्फोट झाल्यास पुन्हा "सामान्य" विवाहच केलेत.) त्यांच्यासारखेच कुटुंबाने सांगितले म्हणून कदाचित मीही ठरवलेल्या स्त्रीशी विवाह केला असता. कर्तव्यभावनेने मी पत्नीला चांगले वागवले असते बहुधा. पण ज्या घनिष्ठ शरीर-भावना जोड-संबध मिळवण्याचा हक्क मी मानतो, त्याच्यापासून मी आणि ती स्त्री दोघेही वंचित राहिलो असतो. त्या शरीरसंबंधातून उत्पन्न झालेल्या संततीला केवळ कर्तव्यदक्ष आणि निष्प्रेम आईवडील घरात दिसले असते. घरच्यांनी नीट बघून जोडी जमवली असती, तर बहुधा स्त्री कर्तबगार आणि हुशार असती. आपल्या भावनिक हक्कांची पायमल्ली होताना बघून तिने लवकरात लवकर घटस्फोट घेतला असता, मीही तो योग्य मानला असता, अशा विचाराने थोडेसे (खूप थोडेसे) हायसे वाटते. त्या स्त्रीची तरुण्यातली काही वर्षे प्रेमाशिवाय वाया गेली असती. त्या गुन्ह्याचा मी वाटेकरी झालो असतो. ती स्त्री मी (आणि समाजाने) तिच्यावर केलेल्या अन्यायामुळे कडवट झाली असती. मुद्दामून वाईट न चिंतूनही असा पश्चात्ताप मला करावा लागला, म्हणून मीसुद्धा कडवट झालो असतो. असला दु:खी जीवनक्रम माझ्या (आणि ती कोण बरे स्त्री, तिच्या) वाट्याला आला नाही. माझी आणखी कित्येक वर्षे भावनिक अपंगत्वात गेली नाहीत. या घडलेल्या जीवनक्रमाबद्दल फारच आनंद वाटतो.
In reply to गूगली नाही :-) by धनंजय
In reply to आभार by विसुनाना
In reply to विरळा आणि श्रम by श्रावण मोडक
In reply to Bravo DJ by समीर गोखले
In reply to संदर्भ by श्रावण मोडक
In reply to पार्श्वभूमी संदर्भपूर्ण नाही पण... by आजानुकर्ण
In reply to संदर्भ by श्रावण मोडक
- मराठी आंतरजालावर कोणी स्वतःच्या लैंगिक जीवनपद्धतीविषयी लिहित असेल तर मी मराठी आहे हे लिखाणात येणे स्वाभाविक आहे. विशेषतः कोणी इंग्रजीत लिहित असेल तर कदाचित (आणि कदाचितच) असा संदर्भ देणे अधिक गरजेचे आहे.
- दुसर्या अर्थाने -- आजानुकर्ण आणि धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे -- ही असले प्रकार आमच्या समाजात नाहीत बुवा हा असा काहीसा गंड अजूनही दिसतो. त्याला छेद जाण्याच्या दृष्टीने वाचकाची लेखकाशी नाळ जुळणे गरजेचे असते... या संदर्भांनी त्याला नक्कीच हातभार लागतो.
In reply to स्वाभाविक संदर्भ by एकलव्य
In reply to हो. पण... by श्रावण मोडक
In reply to वा by Kamgaar_mahila
And Priyali, they (we) have been facing discrimination for a long time, in every small details of life. So if all you are concerned about is a "najar" of a woman, please educate yourself about what we go through.अगदी अगदी! लेख वाचून धक्के बिक्के बसणार्यांना अधिक माहितीची अजिबात गरज नाही पण आपला प्रतिसाद वाचून माझे डोळे उघडले आहेत तेव्हा अधिक माहिती घेण्याच्या मागे लागतेच. :) बाकी, संकेतस्थळाविषयी आपली निरीक्षणे मजेशीर वाटली.
In reply to अगदी! by प्रियाली
आपला प्रतिसाद वाचून माझे डोळे उघडले आहेतमाझेही! अगदी खाड्कन! इतके दिवस मी समलिंगी नाही अशी माझी स्वतःबद्दल उगीचच समजूत होती. आता मिपा वाचकांसाठी समलिंगी नसण्यासाठी 'क्वालिफाइंग क्रायटीरिया' कळल्यावर या समजुतीत काही तथ्य होते की नाही ते पाहू. १. मी जातीने "भट" आहे - चेक. २. मला "बायको" आहे - चेक. (सो फार, सो गूड.) ३. ती "भाजी" बनवते - वेल, कधी बनवते, कधी नाही बनवत. कधी चिकन बनवते. कधी इडल्या बनवते. कधी "दीप फूड्स"चे फ्रोझन प्याकेट मायक्रोवेव्हमध्ये टाकते. कधी सासूसासर्यांपैकी कोणी मुक्कामाला आले असेल तर ते बनवतात. कधी रेष्टारंटातला आचारी बनवतो. कधी (हल्ली हे फार क्वचित होते) मी बनवतो. त्यामुळे या निकषावर मी उतरत नाही. ४. माझ्या बायकोने बनवलेली भाजी हा माझ्यासाठी "एक्स्पीरियन्स"/"टिपिकल एक्स्पीरियन्स" असतो - वेल, एखादे दिवशी एखादी भाजी फारच उत्कृष्ट बनवली (किंवा फारच बिघडली) तर "एक्स्पीरियन्स" असू शकतो, अन्यथा असतोच असे नाही. इतरही "टिपिकल एक्सपीरियन्सेस" असू शकतात. जसे ऑफिसात सकाळीसकाळी काहीतरी गडबड झालेली असताना नेमका ट्राफिकमध्ये सापडून उशीर होणे आणि अशा परिस्थितीत बॉस डेस्परेटली मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना मोबाइलची बॅटरी रिकामी झालेली असणे. त्यामुळे याही निकषावर मी उतरत नाही. याचा अर्थ मिपा वाचकांसाठी समलिंगी नसण्याच्या चारपैकी दोन निकषांवर मी उतरत नाही. अरेच्या! म्हणजे मीही समलिंगी आहे तर! इतके दिवस स्वतःच्या लैंगिकतेविषयी भ्रमात वावरत होतो. आता स्वतःला आहे तसे, स्वतःच्या "ट्रू आयडेंटिटी"मध्ये ऍक्सेप्ट केले पाहिजे. बहुतांश मिपा सदस्यही या ना त्या निकषावर न उतरल्यामुळे माझ्यासारखेच समलिंगी आहेत हेही कळले ते बरे झाले. चला, म्हणजे मुबलक कंपनी आहे तर! माझी स्वतःची खरी ओळख मला स्वतःलाच होण्यास कारणीभूत झाल्याबद्दल कामगार महिलाताईंचे अनंत आभार!
In reply to अगदी! by प्रियाली
In reply to Some resources by Kamgaar_mahila
In reply to रोचक दुवे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to वा by Kamgaar_mahila
All the time I read this website, I thought okay, this is for typical "भट" who have "typical" experiences like what bhaji their "wife" made etc.एका स्टीरियोटाइपचे उत्तर दुसरा स्टीरियोटाइप होऊ शकत नाही. बायकोने बनवलेल्या भाजीइतकाच रेष्टारंटातल्या शेफाने बनवलेल्या ष्टेकात रस घेणारा एक "सर्वभक्षी" "भट" म्हणून यावर मी तीव्र आक्षेप नोंदवू इच्छितो. (आणि हो, माझी बायको कोंबडीही बनवते हो कधीमधी...)
Yes, there are queers (gays, lesbians and others) in all streams of life.And so are there "Bhat"s in all streams and spheres of life... So kindly keep your own stereotypes where they rightfully belong...
In reply to आक्षेप!!! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to प्रियालि व by Kamgaar_mahila
सम्वाद सुरु रहावा हि प्रामाणिक इच्छा.ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे / साधायची गरज आहे, त्यांना (१) नावे ठेवून, (२) त्यांच्याबद्दल चुकीची गृहीतके / स्टीरियोटाइप्स बनवून आणि (३) ती गृहीतके अपमानकारकरीत्या बोलून दाखवून, संवाद सुरू राहणे सोडा, पण मुळात संवाद सुरू होणे शक्य आहे असे प्रामाणिकपणे वाटते का याचा थोडा विचार व्हावा. उलटपक्षी जर थोड्याफार प्रमाणात संवाद सुरू करण्यात जर कोणी किंचित का होईना, पण यशस्वी झाला असेल, तर त्यावर अशा वक्तव्यांनी पाणी पडणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते का, यावरही थोडा विचार व्हावा. समलिंगींच्या काही अपेक्षा ('अपेक्षा' हा शब्द 'positions'साठी दुसरा चांगला मराठी प्रतिशब्द सापडला नाही म्हणून) समजू शकतो, जसे की expectation of tolerance from and greater acceptance within society on an equitable basis, equal civil rights वगैरे, किंवा इतरही अनेक न्याय्य बाबी असू शकतील ज्या समलिंगी नसल्यामुळे अननुभवामुळे माझ्या (किंवा समलिंगी नसलेल्या माझ्यासारख्या इतरांच्या) आकलनशक्तीच्या सध्या बाहेर असतील, आणि त्यातून काही विधायक आणि सर्वांसाठी न्याय्य असे सामाजिक बदल होण्यासाठी संवादाची आणि दोन्ही बाजूंना एकमेकांच्या बाजू, concerns समजून घेण्याची गरजही समजू शकतो. पण ज्यांच्याशी संवाद साधायचा त्यांना नावे ठेवण्याने त्यांना आपली बाजू ऐकून घेण्याची उपरती होईल असे का वाटावे हे कळत नाही. शेवटी सध्याची समाजरचना जशी आहे त्यात समलिंगींच्या बाजूतील न्याय्यता समजून न घेण्याने समलिंगी नसलेल्या समाजघटकाचे काडीचेही नुकसान होत नाही, आणि त्यांना नावे ठेवण्यातून त्यांना ती बाजू समजून घेण्याची इच्छा होण्याची सुतराम् शक्यता नाही, उलटपक्षी यदाकदाचित त्यांपैकी कोणाला अशा संवादाचे वावडे नसले किंवा काही अंशी काही बाबींमागील न्याय्यता समजूही शकत असली तरी अशा (विरळा) व्यक्तीची एकंदर बाजूतील न्याय्यतेबद्दलची सहानुभूती गमावण्याचीही शक्यता नगण्य नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. आपली बाजू, आपल्या मागण्या कितीही रास्त असल्या तरी ज्यांच्यासमोर त्या मांडायच्या, ज्यांना त्यांमागील न्याय्यता पटवून द्यायची त्यांना नावे ठेवण्याने ते आपली बाजू सहानुभूतिपूर्वक ऐकून घेण्यास बांधील राहत नाहीत, आणि संवाद साधणे तर सोडाच, पण उलट दरी वाढत राहते. आपल्या "संकेतस्थळाविषयीच्या आपल्या (stereotypical) निरीक्षणा"तून किती जणांचा अपमान अथवा किती जणांवर यातून अन्याय झाला, ते पाहू. १. सर्वप्रथम, अर्थातच, ज्यांच्यावरून हा stereotype होता तो गट, अर्थात जे मिसळपावावर येतात आणि ज्यांची पत्नी भाजी बनवते आणि ज्यांना आपली पत्नी कोणती भाजी बनवते यात रस आहे असे सर्व समलिंगी नसलेले विवाहित "भट" जातीतले शाकाहारी पुरुष. २. मिसळपावावर येणार्या सर्व (समलिंगी नसलेल्या) महिला (जात आणि आहार-निरपेक्ष), कारण यांना "पत्नी " असणे शक्य नाही आणि त्यामुळे १. मधील stereotypeमध्ये बसणे शक्य नाही, तरीही केवळ मिसळपावावर येत असल्यामुळे stereotypeमध्ये विनाकारण ढकलल्या गेल्यामुळे. (याचप्रमाणे १. मधील stereotype मध्ये न बसतासुद्धा केवळ मिसळपावावर आल्यामुळे त्या stereotypeमध्ये घुसडले जाणारे इतरही अनेक गट आहेत. जसे:) ३. मिसळपावावर येणारे अविवाहित पुरुष-सदस्य (जात, आहार आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांनाही "पत्नी" नाही. ४. मिपावर येणारे/र्या मांसाहारी/सर्वभक्षी सदस्य. (जात, लिंग आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांना केवळ "भाजी"त रस नसावा. ५. मिपावर येणारे परंतु आहारात फारसा रस नसणारे सदस्य (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष). यांनाही "भाजी"त रस नसावा. ६. मिपावर येणारे समलिंगी (किमानपक्षी पुरुष-समलिंगी) सदस्य (जात-निरपेक्ष). यांना "पत्नी" नसावी. हे भिन्नलिंगीही नाहीत. त्यामुळे stereotypeमध्ये बसत नाहीत. तरीही घुसडले गेलेत. ७. मिपावरील "भट"खेरीज इतर जातींतील सदस्य (लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष आणि केवळ "भट नाहीत" इतक्याच प्रमाणात जात-सापेक्ष). ८. मिपावरील अ-हिंदू सभासद (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष). (आणखीही काही गट राहिले असल्यास चूभूद्याघ्या.) आता इतक्या जणांच्या शेपटावर पाय देऊनसुद्धा जर संवादाची अपेक्षा असेल तर धन्य आहे!
In reply to धन्य आहे! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to वादे वादे by धनंजय
जगन्नाथाच्या रथाच्या एका चाकाखाली मी चिरडला जात असेन तर "हेच चाक वाईट/बाकी चाके केवळ त्याच गाड्याला जोडलेली" असे चित्र मला लगेच स्पष्ट दिसणार नाही. "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात"="रथाची सगळीच चाके उजवी-पाठीमागची माझ्या रक्ताने माखलेली-[माझ्या वडलांसारखे विवाहित भट, किंवा असे काही]" असतात असा स्टीरियोटाईप सुरुवातीला होणे शक्य आहे.रथाचे एकच चाक चिरडत असताना त्राग्यातून "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात" असा स्टीरियोटाइप होणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु येथे नेमका उलटा प्रकार होत आहे असे वाटते. समलिंगींना न समजून घेण्याचा मक्ता फक्त बायकोने बनवलेल्या भाजीत रस घेणार्या भटांनी घेतला आहे आणि उर्वरित सर्व समाजाचे समलिंगींशी सख्य आणि सामंजस्य आहे असा काही दावा आहे काय? माझ्या कल्पनेप्रमाणे समलिंगींबद्दल असामंजस्य हे कोणाही एका समाजघटकापुरते मर्यादित नाही. हे म्हणजे रथाच्या कोठल्याही चाकाखाली आले असता चिरडले जाण्याची शक्यता असली तरी केवळ मला हंडई गाड्या आवडत नसल्याने "हंडई गाडीच्या चाकाला लावलेली कोरियन कंपनीची टायरे वाईट कारण चिरडताना त्यांचे विशिष्ट आकृतींमध्ये वळ उठतात" असे म्हणण्यातला प्रकार आहे. एखाद्या संकेतस्थळावर समलैंगिकतेवर आर्टिकले येण्या-न येण्याचा आणि त्या संकेतस्थळाचे वाचक बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेले भट असण्यानसण्याचा संबंध काय? बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेल्या भटांखेरीज इतरांना समलिंगींबद्दल सहानुभूती असते असे यातून सुचवायचे आहे, की त्यांना समलिंगींचे (पॉझिटिव्ह) अनुभव पदोपदी येत असतात असे, की समलिंगींबद्दल सहानुभूती नसलेले सगळे एकजात बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेले भट असतात असे? बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेल्या भटांचे एक वेळ सोडा (का सोडा? पण तूर्तास सोडा.), पण इतर गटांना तरी यातील कोणतेही कॅरेक्टरायजे़शन योग्य किंवा न्याय्य वाटते का (बा. हा. भा. खेरीज इ. अ. न. भटांसाठी योग्य किंवा अयोग्य नव्हे; त्यात्या इतर गटांसाठी योग्य किंवा अयोग्य!) याची विचारणा केली आहेत काय? मला तरी हा अन्यायाखाली दडपण्यातून येणार्या त्रागात्मक स्टीरियोटाइपच्या प्रकारापेक्षा समलिंगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले असलेले इतर असंबद्ध स्टीरियोटाइप्स उधळण्याचा प्रकार वाटतो. असो.
In reply to वादे वादे by धनंजय
In reply to लेख by शुचि
एका प्रतिसादात वाचलं की सेक्सचा मूळ उद्देश आहे प्रजोत्पादन . मला ते चूकीचं वाटतं.सेक्स ची जैविक प्रेरणा ही प्रजोत्पादनाशीच निगडीत आहे या अर्थाने तो मुळ उद्देश आहे असे म्हटले जाते. प्रजोत्पादनाशी निगडीत न ठेवता तो केवळ आनंददाय़ी करणे आता शक्य असते हे मान्य. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
आपण चार