इष्टाप ( शतशब्द्कथा )
लेखनप्रकार
दिपवाळीच्या सुट्ट्या लागल्या.
सकाळधरनं लय खेळलो .
किल्ला कराय अजून टाईम हाय .
दिप्या म्हनला लपाछपी खेळायची .
कसं म्हाईत नाय , पन दर खेपेला माज्यावच पैलं राज्य येतंय.
चला, धा - इस -तीस - चाळीस - पन्नास- साट- सत्तर --- रेडी का?
कोनच बोलंना !
लागलो हुडकाय … पार नाना सुताराच्या वखारीपस्नं परीट आळीपत्तर -कोनच घावंना !
गोठ्यात -गंजीत घुसून बगितलं. नानाची म्हातारी लई कावली.
आता मला भुका लागल्या.
लपा म्हनलं लेकांनो, म्या जातो जेवायलाच .
घरला जाऊन जेवलो, बचाकभर शेंगा घिउन निगलो .
नाथाच्या देवळापाशी आलो. लपाछपी इसारलोच हुतो.
तर समदी पोरं दिसली माज्याफुडच चालल्याली.
मलाच हुडकित व्हती.
समदी देवळात घुसली तसा मागनं म्या खच्चून वराडलो ,
'' दिप्या, बाळ्या, रम्या, सुन्या - इष्टाप !!''
वाचने
6805
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
हेहेहे! मीपण असेच करायचो! ;-)
झक्कास!!!!!!!!!!!
मस्त..........
मस्त आहे.
मस्तं, एकदम क्यूट गोष्ट आहे.
In reply to मस्तं, एकदम क्यूट गोष्ट आहे. by पद्मावति
असचं म्हणेन.
आणि खास सुट्टी स्पेषल !!!!
झकास फक्कड .
:)
मस्त फिरकी!
चलाख. ह्या चलाखीत बेईमानी नसते. निरागस हुषारी मात्र ठासून भरलेली असते. मजा आली वाचायला.
मस्त!
मस्त आहे!
आवडली.
हीहीही..आवडली. ..माझ्यावर कधीच राज्य यायचं नाही .. शेजारच्या मुलावर नेहमी यायचं तो रडुन , कांगावा करुन त्याच्या मोठ्या भावाच्या गळ्यात मारायचं ते राज्य :D
In reply to हीहीही..आवडली. ..माझ्यावर by स्रुजा
तो रडुन , कांगावा करुन त्याच्या मोठ्या भावाच्या गळ्यात मारायचं ते राज्य :Dहाहाहा.. मी पण असचं करायचे. माझी मोठी बहिण नेहमी माझं राज्यं घ्यायची
शशक लैच आवडली..
पुलेशुक्युट शशक
आवडली.
धप्पा!
कथा आवडली.
छान कथा!
Mast kathaa! Khup aavadali!
आम्ही चिटींग करायचो शेवटचे तीन उरले सुटताना की!! तिघं असले की १०-२०-३० करुन सुटताना ज्याच्यापासून सुरु केलं असेल त्याच्यावर शंभर येऊन ती व्यक्ती सुटते. अशा तिघात एखादा मित्र अडकलेला असला की त्याच्यापासून सुरु करुन शंभर त्याच्यावर आले की तो सुटला. मग उरलेल्या दोघांंनी काय करायचं ते करा. =))
खलास !
मस्त.
कथा आवडली..
मस्तच
हे भारीच की. :D
असंच काहीसं करायचो. आपणच कुठेतरी उंच जागी लपून बसायचं आणी इतर कंटाळून बाहेर पडू लागले की तिथुनच "इष्टाप".
फक्कड कथा आवडली
वाचक आणि प्रतिसादकांचे आभार..!
>> सूड यांनी सांगितलेली आयडिया तेंव्हा माहीत असती तर बहार आली असती.
फार आवडली :)
हां हां हां मस्त लहान पणीचा आवडता खेळ, इष्टोप पल्टी गेले गेले ते दिन :(
हेहेहे! मीपण असेच करायचो! ;-)