मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इष्टाप ( शतशब्द्कथा )

खेडूत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दिपवाळीच्या सुट्ट्या लागल्या. सकाळधरनं लय खेळलो . किल्ला कराय अजून टाईम हाय . दिप्या म्हनला लपाछपी खेळायची . कसं म्हाईत नाय , पन दर खेपेला माज्यावच पैलं राज्य येतंय. चला, धा - इस -तीस - चाळीस - पन्नास- साट- सत्तर --- रेडी का? कोनच बोलंना ! लागलो हुडकाय … पार नाना सुताराच्या वखारीपस्नं परीट आळीपत्तर -कोनच घावंना ! गोठ्यात -गंजीत घुसून बगितलं. नानाची म्हातारी लई कावली. आता मला भुका लागल्या. लपा म्हनलं लेकांनो, म्या जातो जेवायलाच . घरला जाऊन जेवलो, बचाकभर शेंगा घिउन निगलो . नाथाच्या देवळापाशी आलो. लपाछपी इसारलोच हुतो. तर समदी पोरं दिसली माज्याफुडच चालल्याली. मलाच हुडकित व्हती. समदी देवळात घुसली तसा मागनं म्या खच्चून वराडलो , '' दिप्या, बाळ्या, रम्या, सुन्या - इष्टाप !!''

वाचन 6804 प्रतिक्रिया 32