कार्यकर्ता
लेखनविषय:
उडालेला धुराळा
चोळलेले डोळे
फिरत्या मोटारी
बसलेले आवाज
फुटलेल्या बाटल्या
कापलेली बोकडं
व्हडाचढ़
चढ़ाओढ़
सरकलेली बंडलं
बोटावरचि शाई
त्याच्यावरचि गणितं
उधाळलेला गुलाल
मोठालि हारं
अंधुक भाषणं
विरलेले शब्द
रखरखती माती
उधड़लेलं काळीज
बंगल्यावरच्या खेटा
वाचने
1430
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
=)
एवढं निराश करणारं असतं का सगळं ?
आम्हाला हा कार्यकर्ता वाटला.
व्हडाचढ़ चढ़ाओढ़हे दोन्ही म्हणजे सेमच ना?
उधडलेलं काळीजजबराट
कार्यकर्ता....
एक रुप असंही...
दादा म्हनले
आंदोलन करा
आमी बशी जाळ्ळ्या…
दादा म्हनले
चळवळ करा
आमी दुकानं फोळ्ळी…
दादा म्हनले
सत्याग्रेव करा
आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी…
दादा म्हनले
त्यो लै बोलतुया
तेची जीभ तोळ्ळी …
दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो………….?
विशाल
=)