एक माणूस मिशी काढून..............
लेखनविषय:
काव्यरस
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!
इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला
हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
वाचने
25330
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
एक नंबर. खूप आवडली.
कित्येक दिवसांनी एवढी सुरेख कविता वाचायला मिळाली!
रंगा
In reply to क्या बात है!! by चतुरंग
+++१११
अत्यंत सहमत
अतिप्रचण्ड आवडली
In reply to क्या बात है!! by चतुरंग
+१११
असेच म्हणते
अप्रतिम काव्य! अगदी झक्कास स्टाईल!!!
उत्तम उत्तम उत्तम लिहिता!
U r 1 of the rarest gr8 minds!!!
मस्तच! शाळेत गुर्जी कवितांना चाल लावायचे तश्शीच म्हणून पाहिली! :))
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिलाशेवटही उत्कृष्ट!
की त्यावरुन मला एक कविता सुचली -
एक माणूस मिशी 'काढून' सिनेमामध्ये पोहचला
बघता बघता डोळ्यांमधून मनात जाऊन बसला.
थेटर भरले मुलामुलींनी
निखळ हासणे मनापासुनी
हळूच पाही डोळे पुसुनी,
काय सांगतो चेहेर्यामधुनी!
गल्ल्यावरची गणिते सुटली?
चित्रपटांची भाषा कुठली?
कितीक नटवर आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
पिसे जीवाला एकच लागे
मिशीमागचे भोळे डोळे!
'गोल्ड रश' अन 'किड' हलवुन गेले
'डिक्टेटर' 'सिटीलाईट' हसवुन गेले
वेताची काठी फाटके बूट
जुनाट टोपी ढगळा सूट
आठवांसहित हरवुन गेले
मिशीमागचे भोळे डोळे!
एक मुलगा मिशी लावून थेटरबाहेर पडला
हरवलेले भोळे डोळे पुन्हापुन्हा शोधित राहिला.
(अ किड) रंगा
In reply to तुमची कविता इतकी आवड्ली by चतुरंग
भारी जमलंय. आवडेश .
In reply to तुमची कविता इतकी आवड्ली by चतुरंग
सुरेख!!!!
In reply to तुमची कविता इतकी आवड्ली by चतुरंग
सहीय हे पण!
In reply to तुमची कविता इतकी आवड्ली by चतुरंग
मूळच्या सुरेख कवितेला चतुरंगाचा अप्रतिम प्रतिसाद! व्वा! झकास. आता केशवसुमारने येउन यावर कडी चढवली की मी चिमटा काढून बघेन - टाईम मशीनमधनं चार-पाच वर्ष मागे नाही ना गेलोय बघायला ;-)
एक माणूस मिशी काढून / लावून.... क्या बात है....
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
In reply to अहाहा... by मिसळपाव
अगदी खरे, केशवसुमारांची आठवण खूपदा येते.
In reply to अहाहा... by मिसळपाव
इतक्या जुन्या आय डी ने प्रतिक्रिया दिली.
बरे वाटले.
In reply to तुमची कविता इतकी आवड्ली by चतुरंग
ही कवितापण छान आहे.
आता चॅप्लिनचे सिनेमे नक्की पाहणार. धन्यवाद या कवितेबद्दल.
In reply to तुमची कविता इतकी आवड्ली by चतुरंग
रंगा.. कडकडून मिठी!
मूळ कविता बेस्ट
आणि चतुरंग रावांची कविता पण सरस.
अप्रतीम...सुरेख...लाजवाब
वा! सुंदर कविता.चतुरंगपंतांची पण खासच.
सुंदर कविता!
सुरेखच लिहिलीये कविता.
खुपच सुंदर आहे तुमची कविता. खुप दिवसानी काही तरी मस्त वाचायला मिळाले.
अग बाई अरेच्चा-एक मुलगीच्या चालीवरच्या दोन्ही कविता/विडंबन आवडले.
शाई कशाला सांडली?
वा!!!!!
अत्यंत सुंदर!!!
खुपच आवडली!!!!
वा!!!!
अत्यंत सुरेख कविता ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Get Down :- Backstreet Boysमस्त!! :)
:-)
:)
कवितेचा आशय आवडला.
वाह, सुंदर कविता !
:):):)
फारच सुंदर!
हाण तेजायला. मस्तच!
In reply to हाण तेजायला. मस्तच! by बॅटमॅन
पुन्हा पुन्हा याद आणि दाद यावी अशी
आवडली कविता..
मूळ कविता आणि रंगाशेठनी केलेले विडंबन (विडंबन का म्हणावे हाही प्रश्न आहेच) मस्तच. लिहित रहा.
In reply to मूळ कविता आणि रंगाशेठनी by अन्या दातार
उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार त्याच कवितेच्या धाटणीत बांधलेत. "मला सुचलेली कविता" असं तिथेच म्हटलं आहे.
फारच आवडली
सुंदर सुंदर सुंदर.
क्या बात हाऊन
छान
छान
गमती गमतीत सहज लिहिलेली कविता तुम्हा सर्वांना आनंद देऊन गेली!
छान वाटले. सर्वांचेच आभार.
गमती गमतीत सहज लिहिलेली कविता तुम्हा सर्वांना आनंद देऊन गेली!
छान वाटले. सर्वांचेच आभार.
दोन्ही कविता अतिशय आवडल्या.
इतक्या सहजपणे मिशी काढतायेत नाही याची या निमित्ताने पुन्हा एकदा जाणिव झाली आणि उदास करुन गेली.
पैजारबुवा,
छान
मूळ कविता आणि चतुरंग यांची रचना दोन्ही अप्रतिम.
अ फ ला तू न !
काव्य. सलाम.
कल्पनाच किती सुंदर!! फार आवडली कविता!
चतुरंग ह्यांची कविताही आवडली!
आता पर्यंत बर्याच वेळा हि कविता वाचून काढली तरीही प्रत्येक वेळी खूप मस्त वाटते! :)
कित्ती सहजपणे भूतकाळात घेऊन जाते आणि संपता संपता आम्हाला मिशी लाऊन वर्तमानात आणते! ;)
खूपच छान, लिहित राहा...
In reply to आता पर्यंत बर्याच वेळा हि by शब्दबम्बाळ
अनेक वेळा सहमत....
मस्त.....आवडली!
मस्त हे
जबरदस्त
सुरेख कविता.
आवडली कविता
आवडली कविता
मिशी इतकी आवडते? म्हैती नवतं!
तुम्ही सगळे त्या मुलाबरोबर आलात, छान वाटले!
फारच सुरेख!!
धन्यवाद!!
इतके दिवस हा धागा वाचला नव्हता. आत्ता माझ्या शाळेत एका कार्यक्रमाला आहे. मुलींना शाळा दाखवली. सहज धागा उघडला तर हे दिसले!!! जबरी योगायोग. कविता आवडलीच.
बिका, शाळा खुश!!
In reply to बिका, शाळा खुश!! by शिव कन्या
मी पण.
निसटली होती.
उत्तम कविता. थेट भिडते. :-)
रंगाशेठनं पाणी आणिक गहिरं केलं.. तेही मस्तच!!
राघव
सहमत...
शिवकन्या आणि चतुरंग या दोघांच्यामुळे दोन उत्कृष्ट टाईमलेस क्लासिक्स मिपावर दाखल झालेत...
दोनही कविता उत्तम! खूप आवडल्या..
कविता आज तिसर्यांदा वाचली. कवितेतील रुपक आणि अर्थछटांकडे नव्याने लक्ष गेले.
.... रिबिनीमागचे भोळे कोडे! ... साधेभोळे हळवे कोडे! भान आले, बाहेर आला.... एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिलाउपरोक्त शालेय वय ते युवावस्थेतील बदल सुरेख टिपला आहे, त्यातल्या 'भान आले' ला दोन अर्थछटा आहेत आणि दोन्ही अर्थ छटांसहीत वाचताना मस्त वाटले.
हातचा राखून गणित चुकले नजर चकवून भाषा हुकली कितीक राजे आले गेले इतिहासाच्या पानोपानी....या ओळीपण मस्त आहेत.
In reply to झकास कविता by माहितगार
अरेच्या! अजून त्या मुलाबरोबर !!
छान वाटले.फार सहज येता जाता लिहीलिय ही कविता!
In reply to अरेच्या! अजून त्या मुलाबरोबर by शिव कन्या
मिशी हे रूपक घेऊन अलिकडे मी सुद्धा एक मिशी नृत्य नावाची कविता लिहिती झालो. कदाचित पब्लिकला फारशी लक्षात आली नसावी.
In reply to मिशी हे रूपक घेऊन अलिकडे मी by माहितगार
वाचली, विचार करूनही अर्थ बोध झाला नाही......
मस्तच!
मस्तच!
जबरा