नाव वाचुन काय वाटतंय? कुठल्या मिरच्या? आपल्या तिखट मिरच्या की सिमला मिरच्या/ढोबळ्या मिरच्या की त्या कमी तिखट मोठ्या मिरच्या असतात त्या? नाही म्हणजे ज्या बारक्या हिरव्या मिरच्या ज्या भाजीत किंवा कुठल्याही पदार्थात तिखटपणासाठी घालतात, तर त्याचीच भाजी करायची...हो...त्याचीच, त्याच्यासोबत इतर पदार्थ काय काय ते बघु पुढे...
बुलढाणा जिल्ह्यात ही भाजी म्हणजे लेवा पाटील लोकांची खासीयत. नाकातोंडातुन पाणी येईलच अशी तिखट्ट भाजी आणि सोबत भाकरी, ती कुस्करायची, त्यावर कच्चं तेल घ्यायचं आणि कांदा, लिंबु, टोमॅटो चिरुन घ्यायचे. खास करुन पावसाळ्याच्या दिवसात बर्याच ठिकाणी या भाजीच्या पार्ट्या होतात शेतात.
बहुधा खान्देशात यालाच डाळगंडोरी म्हणतात. ही आईने लेवा पाटील लोकांकडुन शिकलेली कृती, फक्त यात मिरच्यांचे प्रमाण मुळ पाकृपेक्षा बरेच कमी केले आहे. ज्यांना आवडतात आणि सहन होतात, त्यांनी ते वाढवल्यास हरकत नाही.
साहित्यः
हिरव्या मिरच्या - ५०-६० ग्रॅम. यातही थोड्या नेहमीच्या तिखट मिरच्या आणि थोड्या एकदम तिखट मिरच्या अशा एकत्र घेऊ शकता.
तूरडाळ - १०० ग्रॅम
आंबट चुका - १ जुडी / १ पाव
२-३ मोठे कांदे - बारीक चिरुन
जाडसर दाण्याचा कुट - पाव वाटी
किसलेले सुके खोबरे - पाव वाटी
८-१० लसूण पाकळ्यांची पेस्ट
थोडंसं आलं किसुन
गरम मसाला - १ चमचा
मीठ चवीनुसार
कृती:
तुरीच्या डाळीला थोडे तेल लावुन + मिरच्यांचे तुकडे करुन हे कुकरमध्ये एकत्र शिजवुन घ्यायचे.
आंबट चुका कुकरमध्ये वेगळा शिजवुन घ्यायचा.
तेल तापवुन उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भरपुर परतुन घ्यायचा. आता शिजलेल्या डाळीत चुका घालायचा, त्यातच खोबर्याचा कीस, जाडसर दाण्याचा कुट, परतलेला कांदा आणि मीठ हे सगळे साहित्य घालुन व्यवस्थित मिसळुन घ्यावे. हे सगळे मिसळताना मुख्य काळजी ही घ्यायची की या भांड्यावर सतत झाकण ठेवायचे, म्हणजे त्या मिरच्यांचा स्वाद तसाच राहतो.
तेल गरम करुन फोडणीत हळद, लसूण पेस्ट घालुन परतायचे. मग किसलेलं आलं आणि हे वरचे मिश्रण घालावे. थोडी उकळी आली की गरम मसाला घालावा आणि झाकण ठेवुन परत उकळी आणावी. मिरच्यांची भाजी तयार आहे.
एकीकडे भाकर्या करायच्या, कांदा, लिंबु, टोमॅटो चिरायचे. पसरट थाळीत ही भाजी घ्या, त्यावर भाकरी कुस्करा, हवं असल्यास कच्चं तेल घ्या, लिंबु पिळा आणि करा सुरुवात.
एकीकडे भाकर्या करायच्या, कांदा, लिंबु, टोमॅटो चिरायचे. पसरट थाळीत ही भाजी घ्या, त्यावर भाकरी कुस्करा, हवं असल्यास कच्चं तेल घ्या, लिंबु पिळा आणि करा सुरुवात.
वाचने
18708
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा! तोंपासु!!
आम्ही ग्राहकचे अनियमीत ग्राहक
In reply to व्वा! तोंपासु!! by चांदणे संदीप
होय!
In reply to आम्ही ग्राहकचे अनियमीत ग्राहक by उगा काहितरीच
ग्राहक बद्दल माहिती नाही.
In reply to व्वा! तोंपासु!! by चांदणे संदीप
खल्लास फोटो!
मस्तच अनवट पाकृ!!!
मस्त ग.
मस्त दिस्तेय भाजी झणझणीत
झणझणीत पाकृ!
क्या बात है
वा!
अहाहा!
मल्कापुरलाच आमच्या मित्राकडे
दोन दिवसांच्या मध्ये त्रास नै
In reply to मल्कापुरलाच आमच्या मित्राकडे by अत्रुप्त आत्मा
जनरली पाकृ सोमवारी टाकल्या
In reply to दोन दिवसांच्या मध्ये त्रास नै by टवाळ कार्टा
खिक्क...तब्येतीत खावी लागत
In reply to जनरली पाकृ सोमवारी टाकल्या by प्यारे१
सलग दोन दिवस.....??? तिही
In reply to मल्कापुरलाच आमच्या मित्राकडे by अत्रुप्त आत्मा
"कारण" नै..."प्रेरणा" म्हणतात
In reply to सलग दोन दिवस.....??? तिही by मधुरा देशपांडे
तेच रे ते...;) अनेक
In reply to "कारण" नै..."प्रेरणा" म्हणतात by टवाळ कार्टा
बाकी प्रेरणा वेग्ळ्या...ही
In reply to तेच रे ते...;) अनेक by मधुरा देशपांडे
मस्तं, एकदम झणझणीत पाककृती :)
या भाजीबद्दल आधी कधी ऐकले
मस्स्त करून बघेन (?) सौ. कडून
मस्त..
अगं नाही इथे नाही केली भाजी.
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
देशपांडे मॅडम. भाजी एक नंबर
आहा...मस्तं चटपटीत पाककृती.
गावातल्या पार्ट्या
मधुरा,झकास पाककृती.नक्कीच
झणझणीत
भाजी प्रत्यक्षात फोटूतल्या
In reply to झणझणीत by दिपक.कुवेत
वेगळाच प्रकार!
ho yalach day gandori mhantat
मिरच्यांची भाजी, ताकातली घोळ,
भाजी आवडली. आमची सौ. तिथलीच
झणझणीत !
मस्त, करून बघायला आवडेल पण