बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

लेखक: ज्ञानोबाचे पैजार जे न देखे रवी...
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई ....... समजून तयाला घे तू , तो साहेब सरळसा नाही सर्वस्व लुटले राज्याचे, काही ना बाकी उरले किती स्वतःस हरवून बसले , पण साहेब बधला नाही, .........इतुके न कुणाचे घ्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यातही थोडा आहे, साहेब वेगळा नाही या राज्यातील उपेक्षा, मी मूठ वळवली नाही बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही, ........ साहेबांची होता मेहेरबानी , कार्यकर्ता बने खंडणीस्वार ........ उघड्या नयनांनी बघ तू , महाराष्ट्राचा बनेल बिहार पैजारबुवा,

प्यारे१ यांनी 07/09/2015 - 16:12 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे. समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही. जै हिन्द जै महाराष्ट्र

हीण? आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती. तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन? दातच पाडुन टाकेल त्याचे आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे. पैजारबुवा,

द-बाहुबली यांनी 07/09/2015 - 16:22 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते कोणाचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कोणाचे मनोगत आहे ?

अभ्या.. यांनी 07/09/2015 - 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

माऊली सर्वोत्तम विडंबन. . जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय. बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही. किंवा बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.

" बनलो असतो दादा, मज चाकू भेटला नाही " हा सब्जेक्ट मात्र कॉपीराईटेड आहे याची नोंद घ्यावी.

खास श्रीगुर्जींसाठी असेल तर इशयाचे टैटल असे पायजे: "बनले असते माई, मज "हे" भेटले नाहीत". =))

फकस्त किरकोळ दुरुस्तीसह.
"बनले असते माई, मज "हे" आडून भेटले नाहीत". =))
नाखु बेडेकर अभामिपातडकफलकदुरुस्तीसंघ

बॅटमॅन यांनी 08/09/2015 - 16:24 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by नाखु

Permalink

सहीच!

जेपी यांनी 07/09/2015 - 16:35 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आवडल..

बहुगुणी यांनी 07/09/2015 - 17:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

स्वतंत्र कलाकृती म्हणून ही व्हॉट्सॅपवर व्हायरल व्हायच्या लायकीची रचना आहे.

प्राची अश्विनी यांनी 07/09/2015 - 17:55 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

झक्कास!

पैसा यांनी 07/09/2015 - 19:12 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

लै भारी!

अजया यांनी 07/09/2015 - 19:34 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

=)) सही!

मित्रहो यांनी 07/09/2015 - 19:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

एकदम झकास

dadadarekar यांनी 07/09/2015 - 22:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.

संजय पाटिल यांनी 07/09/2015 - 23:16 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...

एस यांनी 08/09/2015 - 00:44 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही. झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.

नि३सोलपुरकर यांनी 08/09/2015 - 16:14 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

"उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई"........ चपखल!!!

रेवती यांनी 08/09/2015 - 16:59 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

भारी! आता बिग्रेडी धावून येणार..........

कावरे कोल्ड्रिन्क्समध्ये चौकशी करायची होती ना! गेला बाजार सुजातामध्येपण मिळते.

चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)

विवेकपटाईत यांनी 11/09/2015 - 18:11 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.

चंदेरी,अशोक नगर आणि श्रीमंत हे तिन्ही नाही कळले. थोडे अधिक सांगता का, प्लीज ?