[ शतशब्दकथा स्पर्धा ] - लोक्शाई (उत्तरार्ध) लोकमान्य (पुर्वार्ध)
लोकमान्य आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय." बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?**************लोक्शाई - उत्तरार्ध************** बाई म्हनल्या "कचरा उचलनार नाहिस तर पालकांना बोलावुन आण." पप्पा तर गावाबाहेरच व्हते. मंग मी रोज वर्गाबाहेर. आज पप्पा धा दिसांनी परत येनार म्हनुन म्या एक्दम खुषीत. आता वर्गाबाह्यर नाही थांबायला लागनार. घरी गेलो तर पप्पा भडकलेले. म्हनाले "२५ जनांना संसदेबाहेर नाही काढु शकत. हा तर लोक्शाईचा खून आहे. पुतळा जाळु, मोर्चे काढु, लोक्शाई जिवंत ठेवाया हवी". पप्पांना कावलेलं बघुन मी त्यांना काईच सांगितलं नाही. दुसर्या दिवशी बाईंनी विचारलं "पालक कुठायत? आले नसतील तर हो बाहेर". म्या म्हनलो "तुमी मला बाह्यर नाही काढु शकत." लोक्शाईचा खून, पुतळा, मोर्चा वगैरा बोल्लो. लय सटकवला बाईंनी. गाल लाल झाल्ता. लोक्शाई फकस्त मोठ्यांसाठीच व्हय?
वाचने
16106
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
Aavadali
+१
खीक
ह्या ह्या ह्या!
+१
मस्तं आवडली.
पुर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्हीही भाग वाचले. सही झाले आहेत.
हाहाहा!
मस्त स्टुरी.
+१
(फकस्त असल्या जहाल नेत्याच्या गाबड्याला वर्गाबाहेर काढणारी अन सटकावणारी एखादीतरी शिक्षिका या लोक्शाईत असावी एवढीच ईच्छा)
In reply to मस्त स्टुरी. by अभ्या..
(बाई नंतर वाड्यावर जात असल्या तर???? ;) )
-निळू फुले
+१ हाहा मस्तच :)
+१
हाहाहा! मस्तच!
+१
+ ११
+१
+१
+१
आरं द्येवा!
+१
+१
हाहाहा +१
आवडले दोन्ही भाग ! +१
+१. आवडली.
मस्त
आवडली.
मस्त!
+१
पुर्वार्ध अधिक सहज वाटला. उत्तरार्धात वर्तमानाचा संदर्भ घेऊन हलकेच विनोदाची झालर आणि विद्यार्थ्याची कारुण्यमय हतबलता एकदम जाणवतात आणि विरोधाभासाच्या कारणाच मुलाला न होणार आकलन सुरेख रंगवल्यामुळे शेवट मस्त जमलाय. पण विनोद साधताना उत्तरार्धात वर्तमान संदर्भाचा प्रभाव अधिक जाणवतो असं काहीस जाणवल.
पुलेशु
+१११११... सर्वात जास्त आवडलेला उतरार्ध
In reply to +१११११... सर्वात जास्त by विवेकपटाईत
+१११
+१
लै ब्येस !
+१
एकदम फक्कड .
व्वा मस्त.
उत्तरार्धात काय घडणार, याची अजिबात कल्पना पूर्वार्ध वाचून आली नाही. पूर्वार्धात टिळक आणि उत्तरार्धात हल्लीचा नेता, हे मेतकूटही झकास.
खूप आवडला हा पण भाग.
मस्तच! +१
+१.. येक नंबर, शेठ.. म्हणूनच म्या मास्तरायच्या फुडं अक्कल नाय पाजतायचो.. लै मारे इच्याभिना..
छान!
+१
पहील्यापेक्षा जास्त रोचक.
+१
उत्तरार्ध एवढा आवडला नै . खरा तर पूर्वार्धात सुधा बिया त्याच्या खिशातून खाली पडल्या तेव्हा त्या त्यानंच उचलायला हव्या होत्या ना
In reply to उत्तरार्ध एवढा आवडला नै . खरा by तुडतुडी
सगळा कचरा तू उचल असं म्हणाल्या बाई त्याला.फक्त त्याच्या खिशातून पडलेल्या बिया नाही.
+१
लै भा हा री ही...
+1
दुसर्या भागात "ताजा ताजा" संदर्भ अगदी झक्कास!
+१
+१
+१
+१
+१
झकास उत्तरार्ध. लहानपणी पेप्रातले असे मोठमोठे शब्द फेकायची लैच उत्सुकता/खाज असते.
+1
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, दोन्ही स्वतंत्रपणे सुद्धा छान जमलेत. उत्तरार्धातील ताजे भाष्य मस्त...!
+1
सर्व वाचक प्रतिसादकांचे अनेक आभार. तुमच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रतिसादांमुळे हुरुप आला.
मस्त, झ्यकास, खुसखुशीत !
१+