[ शतशब्दकथा स्पर्धा ] - लोक्शाई (उत्तरार्ध) लोकमान्य (पुर्वार्ध)

मृत्युन्जय जनातलं, मनातलं
लोकमान्य आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय." बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?
**************लोक्शाई - उत्तरार्ध************** बाई म्हनल्या "कचरा उचलनार नाहिस तर पालकांना बोलावुन आण." पप्पा तर गावाबाहेरच व्हते. मंग मी रोज वर्गाबाहेर. आज पप्पा धा दिसांनी परत येनार म्हनुन म्या एक्दम खुषीत. आता वर्गाबाह्यर नाही थांबायला लागनार. घरी गेलो तर पप्पा भडकलेले. म्हनाले "२५ जनांना संसदेबाहेर नाही काढु शकत. हा तर लोक्शाईचा खून आहे. पुतळा जाळु, मोर्चे काढु, लोक्शाई जिवंत ठेवाया हवी". पप्पांना कावलेलं बघुन मी त्यांना काईच सांगितलं नाही. दुसर्या दिवशी बाईंनी विचारलं "पालक कुठायत? आले नसतील तर हो बाहेर". म्या म्हनलो "तुमी मला बाह्यर नाही काढु शकत." लोक्शाईचा खून, पुतळा, मोर्चा वगैरा बोल्लो. लय सटकवला बाईंनी. गाल लाल झाल्ता. लोक्शाई फकस्त मोठ्यांसाठीच व्हय?
वर्गीकरण
लेखनप्रकार

56 टिप्पण्या 16,106 दृश्ये

Comments

पद्मावति नवीन

मस्तं आवडली. पुर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्हीही भाग वाचले. सही झाले आहेत.

अभ्या.. नवीन

मस्त स्टुरी. +१ (फकस्त असल्या जहाल नेत्याच्या गाबड्याला वर्गाबाहेर काढणारी अन सटकावणारी एखादीतरी शिक्षिका या लोक्शाईत असावी एवढीच ईच्छा)

पैसा नवीन

+१ हाहाहा! मस्तच!

अनिरुद्ध.वैद्य नवीन

आवडली.

माहितगार नवीन

+१ पुर्वार्ध अधिक सहज वाटला. उत्तरार्धात वर्तमानाचा संदर्भ घेऊन हलकेच विनोदाची झालर आणि विद्यार्थ्याची कारुण्यमय हतबलता एकदम जाणवतात आणि विरोधाभासाच्या कारणाच मुलाला न होणार आकलन सुरेख रंगवल्यामुळे शेवट मस्त जमलाय. पण विनोद साधताना उत्तरार्धात वर्तमान संदर्भाचा प्रभाव अधिक जाणवतो असं काहीस जाणवल. पुलेशु

चित्रगुप्त नवीन

व्वा मस्त. उत्तरार्धात काय घडणार, याची अजिबात कल्पना पूर्वार्ध वाचून आली नाही. पूर्वार्धात टिळक आणि उत्तरार्धात हल्लीचा नेता, हे मेतकूटही झकास.

चिगो नवीन

+१.. येक नंबर, शेठ.. म्हणूनच म्या मास्तरायच्या फुडं अक्कल नाय पाजतायचो.. लै मारे इच्याभिना..

द-बाहुबली नवीन

पहील्यापेक्षा जास्त रोचक.

तुडतुडी नवीन

उत्तरार्ध एवढा आवडला नै . खरा तर पूर्वार्धात सुधा बिया त्याच्या खिशातून खाली पडल्या तेव्हा त्या त्यानंच उचलायला हव्या होत्या ना

मी-सौरभ नवीन

लै भा हा री ही...

मधुरा देशपांडे नवीन

+1

नाखु नवीन

दुसर्या भागात "ताजा ताजा" संदर्भ अगदी झक्कास!

अन्या दातार नवीन

झकास उत्तरार्ध. लहानपणी पेप्रातले असे मोठमोठे शब्द फेकायची लैच उत्सुकता/खाज असते.

माधुरी विनायक नवीन

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, दोन्ही स्वतंत्रपणे सुद्धा छान जमलेत. उत्तरार्धातील ताजे भाष्य मस्त...!