कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी
पहिलेच स्पष्ट करतो की मला या धाग्यात श्रद्धा ,अंधश्रद्धा,नियती,नशीब,कर्तुत्व वगैरे बाबींचे घोळ घालायचे नाहीयेत.ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा.
आपण प्रत्येक जण थोड्या फार फरकाने शिक्षण ,नोकरी, लग्न,मुले या चक्रातून फिरता असतो.हळूहळू वय वाढता असते .अनेक चिंता विवंचना मागे लागलेल्या असतात .कधी त्यावर तात्पुरता उपाय काढला जात असतो तर कधी त्या प्रलंबित ठेवल्या जातात .अशातच कधीतरी कोणी घरातील अथवा बाहेरील वयस्कर माणूस सुचवतो की वर्षातून एकदा किंवा जेव्हा जमेल तेव्हा ,घरात मंगलकार्य झाले किंवा ठरले असल्यास कुलदेवतेला जाऊन या .आणि मग बरीच वर्षे मनात घोळत असलेला बेत डोके वर काढतो .
मला कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई आहे हे माहीत होते आणि पूर्वी मी एकदा तिथे जाऊन दर्शनही घेतले आहे. त्यानंतर बरीच वर्षे मध्ये गेली.जीवनात अनेक चढ उतार आले .घरात अनेक वेळा मंगल कार्य झाली पण अंबेजोगाईला पुन्हा जायचे राहून गेले होते.आता एकदा अंबेजोगाईला जाऊन या म्हणून घरची मंडळी मागे लागली .
ट्रेनने जाण्यासाठी मी आरक्षण बघत होतो पण एकतर जवळचे स्टेशन परळी वैजनाथ किंवा परभणी येथे जाणाऱ्या फार कमी ट्रेन आणि त्यांचे बुकिंग आधीच फुल झालेले.रस्त्याने जावे तर कुटुंबासहित रात्रभराचा प्रवास जर त्रासदायक वाटत होता आणि दोन दिवसात जाऊन येणे धावपळीचे झाले असते.
चौकशी करत असताना मला कर्जत जवळ कोन्ढाणे येथे गोगटे बंधूनी स्थापन केलेल्या अंबेजोगाई मंदिराची माहिती मिळाली.
पुण्याहुन कर्जतला एका दिवसात जाऊन येणे शक्य होते.फार तर एक दिवस मुक्कामही करता आला असता. श्री. अनिल गोगटे यांना फ़ोन करून माहिती विचारून घेतली. मी दुपारी पोचणार असल्याने देऊळ दिवसभर दर्शनाला उघडे असते का हे ही विचारले . त्यांनी सुद्द्धा उत्साहाने माहिती दिली.पुरुषांनी साधी शर्ट पॅण्ट (जीन्स/ थ्री फोर्थ/ शॉर्ट नाही) व बायकांनी साडी नेसुन दर्शनाला येण्याचा नियम आहे असेही सांगितले.
===============================
थोडी अधिक माहिती सांगतो.
कोकणस्थांची कुलदेवता मराठवाड्यात कशी गेली याबद्दल एक आख्यायिका सांगतात.
कोकणातील आडिवरे येथील देवीचे परळी वैजनाथ बरोबर लग्न ठरले .वऱ्हाड निघाले परंतु वाटेत अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणून देवी रुसून बसली आणि लग्न मुहूर्त टळून गेला. तेव्हापासून देवीने तिथेच वास्तव्य केले.
ही देवी कोकणस्थांचे कुलदैवत कशी बनली याविषयीचे एका गोष्ट .
कोकणप्रांताची निर्मिती केल्या नंतर श्री परशुरामांनी तिथे शेती करण्यासाठी १४ गोत्रांमधुन साठ कुटुंबे नेली.तसेच समुद्र किनारी अर्धमृत अवस्थेत लागलेल्या १४ व्यक्तींना संजीवनी देऊन त्यांचे विवाह लावण्यासाठी अंबेजोगाई येथून वधू नेल्या.तेव्हा आपल्या मुलींची पाठवणी करताना अंबेजोगाईच्या लोकांनी अट घातली की या सर्व कुळांनी योगेश्वरी देवीला कुलदैवत मानावे.
=================================
.
.
ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी पुण्याहून निघालो. कर्जत स्टेशनला पोचुन कोन्ढाणे गावात जाण्यासाठी एका परतीची रिक्षा ठरवली .तिथे जायला सिक्स सीटर पण मिळतात फक्त थांबायची तयारी पाहिजे कारण सर्व सीट भरल्याखेरीज ते निघत नाहीत.रिक्षा कोन्ढाणे गावात जायला निघाली.पावसाळ्याचे दिवस असल्याने अर्थातच बाहेर मस्त वातावरण होते.उल्हास नदीच्या काठाकाठाने रस्ता चालला होता.हळूहळू शहराची गजबज मागे पडत चालली आणि छान गावाचे वातावरण जाणवू लागले .छोटी छोटी घरे, हिरवीगार शेते, पावसाचे ढग ओठंगलेले डोंगर आणि बाजूने वाहणारा उल्हास नदीचा खळाळ. साधारण दहा किलोमीटरवर कोन्ढाणे गाव लागले .मंदिराचे जुळे कळस लांबूनच दिसू लागले आणि बघता बघता रिक्षा मंदिराच्या दारात पोचली.
.
.
बाहेरच चप्पल बूट काढून हात पाय धुवून मंदिरात प्रवेश केला.पुढे शेणाने सारवलेला सभामंडप एका बाजूला यज्ञ कुंड व पूजेची जागा तर दुसऱ्या बाजूला एक टेबल व काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत. गोगटे बंधूंपैकी दोघेजण मंदिरात आल्यागेल्याची चौकशी करायला आणि माहिती द्यायला हजर होते.अजून एक बंधू कामानिमित्त बाहेर गेले होते.
श्री. अनिल गोगटे यांनी गप्पा मारता मारता मंदिराची माहिती द्यायला सुरुवात केली.
गोगटे यांची आठवी पिढी सध्या येथे वास्तव्यास आहे.गांधी वधानंतर जे ब्राम्हणांचे शिरकाण चालू झाले त्यात कोन्ढाणे गावातील वीस पंचवीस ब्राम्हण कुटुंबे घरे सोडून परागंदा झाली .पण गोगटे घराण्यातील एक बाई खमकी होती.रोज घोड्यावरून ती शेतात जाई.माणसे कामाला लावून शेत कसे, आमराईतील आंबे काढी.जेव्हा दंगेखोर लोक घरे जाळायला आले तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की मी घर सोडून तर जाणार नाहीच.पण स्वत:कडची पोतेभर काडतुसे आणि बंदूक सज्ज ठेवीन आणि माझे घर जांळणाऱ्या घराचे पुरुष मारून टाकीन. बायका पोरांना हात नाही लावणार.बाईची जिद्द सगळ्या गावाला माहित असल्याने घर वाचले पण गोठा आणि इतर सगळे जाळून दंगेखोर निघून गेले.
ही बाई म्हणजे अनिल यांची पणजी. मध्ये बराच काळ गेला.
काही वर्षापूर्वी अनिल यांना स्वप्नात देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की तुझ्या जागेत जुळ्या जांभळीच्या झाडाखाली माझे वास्तव्य आहे.तर मला बाहेर काढ. मग ते झाड शोधून काढून आजूबाजूची माती उकरून त्यानी देवीचा तांदळा बाहेर काढला आणि त्याच जागी देवीचे प्रतिष्ठापना केली.दर पौर्णिमेला आणि मार्गशीर्ष महिन्यात देवीचा उत्सव असतो. तेव्हा अनेक भाविक येथे येत असतात. इतरही जण ज्यांना मराठवाड्यात अंबेजोगाईला जाणे शक्य होत नाही ते इकडे येतात.
दोन षटकोनी देवळा पैकी एकामध्ये श्री योगेश्वरी देवी तर दुसर्यामध्ये व्याडेश्वराची स्थापना केली आहे.व्याडेश्वराच्या समोर काळ्या पाषाणातला नंदी आणि दरवाज्यावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे.
देवीच्या गाभाऱ्या मागे कुशमांडा,स्कंद माता,कात्यायनी ,कालरात्री ,महागौरी, सिद्धीदात्री,शैलपुत्री,ब्रम्हचारिणी आणि चंद्रघंटा अशा नवदुर्गा अवताराच्या नऊ मूर्ती आहेत.
दर्शन झाल्यावर बराच वेळ श्री. गोगटे बंधूंशी गप्पा मारत बसलो होतो.त्यांना आलेले देवीच्या अस्तित्वाचे अनुभव ते सांगत होते.तसेच इतरही बरीच माहिती देत होते.वातावरण फार प्रसन्न वाटत होते.बघता बघता एक तास होऊन गेला. मला परतीची गाडी गाठायची असल्याने वेळेत निघणे भाग होते.
आता पुन्हा एकदा येईन तेव्हा भरपूर वेळ हाताशी ठेवून यायचे अशी खुणगाठ मनाशी बांधून जड अंतकरणाने आणि प्रसन्न मनाने शेवटी तेथून निघालो.

वाचने
22909
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
सम्पादन टॅब दिसत नाहिये?
In reply to सम्पादन टॅब दिसत नाहिये? by राजेंद्र मेहेंदळे
'भटकंती' सदरात { आणि कलादालन
छान लिहिलंय!!! पण फोटो असते
चांगली माहिती.
पुरुषांनी साधी शर्ट पॅण्ट
In reply to पुरुषांनी साधी शर्ट पॅण्ट by कैलासवासी सोन्याबापु
हेच लिहायला आलो होतो. कायपण
In reply to हेच लिहायला आलो होतो. कायपण by आदूबाळ
ते सौदिंडियन लोकांकडून आलंय
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
डेरवणलाही असा नियम आहे....
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
हो, डेरवणला अजूनही आहे हा
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
खेदकारक :(
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
ते सौदिंडियन लोकांकडून आलंय.
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय. by सूड
अरे सुडक्या
In reply to अरे सुडक्या by पैसा
सभामंडपात जाण्यासाठी ड्रेसकोड लागू केल्याबद्दल....
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
डेरवणला असा नियम आहे असे मी
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
हो डेरवनला आहे आजुण आम्ही
In reply to हेच लिहायला आलो होतो. कायपण by आदूबाळ
इथे ह्या मंदिराच्या बद्दल
बरे झाले ही माहिती सांगितलीत.
ह्या ठिकाणाविषयी ऐकले होते....
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद
In reply to सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
मला तिथली सर्व माहिती आहे
In reply to मला तिथली सर्व माहिती आहे by कंजूस
मग झालाच पाहिजे एक कट्टा कोंदिवड्याला
In reply to मग झालाच पाहिजे एक कट्टा कोंदिवड्याला by सुधांशुनूलकर
हम आयेंगा....
In reply to मग झालाच पाहिजे एक कट्टा कोंदिवड्याला by सुधांशुनूलकर
येईन की.
In reply to येईन की. by प्रचेतस
प्रचेतस + लेणी....
In reply to प्रचेतस + लेणी.... by मुक्त विहारि
आम्ही (कूणाकडे)
In reply to आम्ही (कूणाकडे) by नाखु
यु वरी नॉट...वी विल कॉल
ज्याने त्याने आपापल्या परीने
कुलदेवता घराण्याप्रमाणे बदलते
In reply to कुलदेवता घराण्याप्रमाणे बदलते by कॅप्टन जॅक स्पॅरो
होय
In reply to कुलदेवता घराण्याप्रमाणे बदलते by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो, बदलते. आमचीही ही देवी
फोटो
मागच्या वर्षी येथे जाणे झाले
छान माहिती... :)
खुप गोंधळ आहे
दुर्गा व्याडेश्वरी
मंदिर चालविणार्या माणसाची
नक्कीच
देऊळ म्हणून, ठिकाण म्हणून
देवळात जाताना ठराविकच पेहराव
In reply to देवळात जाताना ठराविकच पेहराव by यशोधरा
ड्रेसकोडवाल्या पार्ट्यांमध्ये
In reply to ड्रेसकोडवाल्या पार्ट्यांमध्ये by टवाळ कार्टा
नक्कीच नाही. तसे नव्हते
In reply to नक्कीच नाही. तसे नव्हते by यशोधरा
खरे देवळात जायचीही गरज नाही
In reply to खरे देवळात जायचीही गरज नाही by मुक्त विहारि
हं बात मे दम है मुविजी!!!
In reply to खरे देवळात जायचीही गरज नाही by मुक्त विहारि
मंदिराचे पावित्र्य राखलेच
In reply to खरे देवळात जायचीही गरज नाही by मुक्त विहारि
मुवि, तुम्ही जे म्हणत आहात
In reply to मुवि, तुम्ही जे म्हणत आहात by यशोधरा
तुमच्या त्या वाक्याला माझी पण सहमती होती....
In reply to तुमच्या त्या वाक्याला माझी पण सहमती होती.... by मुक्त विहारि
ओ सॉरी बॉरी काय! मला वाटले
In reply to ड्रेसकोडवाल्या पार्ट्यांमध्ये by टवाळ कार्टा
+१
In reply to +१ by माहितगार
+१
In reply to +१ by माहितगार
आक्षेप सर्वसमावेश्कता
In reply to +१ by माहितगार
टोकाची सक्ती कुठेच स्पृहणीय
In reply to टोकाची सक्ती कुठेच स्पृहणीय by यशोधरा
+१
In reply to +१ by पैसा
मात्र भारतीय लोकांच्या
In reply to मात्र भारतीय लोकांच्या by माहितगार
वरील भावनेशी सहमत
In reply to वरील भावनेशी सहमत by सुबोध खरे
असो
In reply to +१ by पैसा
हैला, हे कुठे? असेल सुद्धा
In reply to हैला, हे कुठे? असेल सुद्धा by यशोधरा
आहे आहे!
In reply to आहे आहे! by पैसा
हां, ओके.
In reply to आहे आहे! by पैसा
ते लोक म्हणजे कोण ?
In reply to ते लोक म्हणजे कोण ? by खटपट्या
फारेनर.
In reply to देवळात जाताना ठराविकच पेहराव by यशोधरा
खूप छान भटकंती. आवडली. यशोधरा
In reply to देवळात जाताना ठराविकच पेहराव by यशोधरा
असल्या ठिकाणी शक्यतो जात नाही
खूप छान माहिती. सॉरी चुकुन
छान आहे कथा पण अजुन एक कथा आहे
छान माहिती
आजच बायकोबरोबर जावून आलो....
In reply to आजच बायकोबरोबर जावून आलो.... by मुक्त विहारि
अरे वा! जाऊनही आलात!
In reply to अरे वा! जाऊनही आलात! by रेवती
वा मुवि
अंबेजोगाई बद्दल माहिती नव्हती