मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस · · जे न देखे रवी...
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!) प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे - ('खरे' कवी यांची माफी मागून...) 'नसतेच मिपा हे जेव्हा देह हलता-बोलता बनतो तुंबलेली उरकती कामे संसार नेटका होतो आ वासून पाहे तीही स्वतः उठून चहा जेव्हा करतो बायकोपण करते कौतुक नेटपॅकही शाबूत राहतो तू सांग सखे वाट्टेल ते तुजसाठी करेन मी आज एक सोडून तुळशीबाग जग सारे तुला फिरवितो नको फुकाचे वादविवाद ना डु-आयडींचे ट्रोलिंग वटवट ना वाचे कुठची दिन सुखेनैव हा कटतो (...अर्ज किया है...) ना स्पर्धा कुठली न ईर्ष्याही काही स्कोअर-सेटलिंगला आता स्कोपच नाही असे हेवनवासी होती आयडी काही आता काडीही नाही, अन् आयडीही नाही! (गाणे परत सुरू...) ना अजून झालो कोता, जाणार ना मी हो 'कुठेही' झालंय का मिपा सुरू, मी हळूच उघडून बघतो...! नसतेच मिपा हे जेव्हा...' ;-)

वाचने 16728 वाचनखूण प्रतिक्रिया 32

श्रीरंग_जोशी 05/08/2015 - 01:31
खासच आहे विडंबन. अजुन येऊद्या :-) .

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

माझिया मना 05/08/2015 - 06:33
आवडले एकदम ब्येश्ट!

In reply to by अजया

नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

अत्रुप्त आत्मा 05/08/2015 - 12:14
@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

सस्नेह 05/08/2015 - 10:13
आमचीच कविता लिवलीय ! तुंबलेली कामे,..बैलाचा डोळा...!

चिगो 05/08/2015 - 12:15
जबराट जमलंय मिपा-बंद-स्फुर्त विडंबनकाव्य.. लै कलाकार तुम्ही, स्वॅपभौ..

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!