<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>
लेखनविषय:
काव्यरस
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
'नसतेच मिपा हे जेव्हा
देह हलता-बोलता बनतो
तुंबलेली उरकती कामे
संसार नेटका होतो
आ वासून पाहे तीही
स्वतः उठून चहा जेव्हा करतो
बायकोपण करते कौतुक
नेटपॅकही शाबूत राहतो
तू सांग सखे वाट्टेल ते
तुजसाठी करेन मी आज
एक सोडून तुळशीबाग
जग सारे तुला फिरवितो
नको फुकाचे वादविवाद
ना डु-आयडींचे ट्रोलिंग
वटवट ना वाचे कुठची
दिन सुखेनैव हा कटतो
(...अर्ज किया है...)
ना स्पर्धा कुठली न ईर्ष्याही काही
स्कोअर-सेटलिंगला आता स्कोपच नाही
असे हेवनवासी होती आयडी काही
आता काडीही नाही, अन् आयडीही नाही!
(गाणे परत सुरू...)
ना अजून झालो कोता,
जाणार ना मी हो 'कुठेही'
झालंय का मिपा सुरू,
मी हळूच उघडून बघतो...!
नसतेच मिपा हे जेव्हा...'
;-)
वाचने
16728
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
हाहाहा. एक नंबर.
हितचिंतक,
मधुरा
झकास जमले आहे!!
वाह, खुप सही.
खासच आहे विडंबन. अजुन येऊद्या :-) .
ब्येष्ट !
मिपा बंदचे 'फायदे' मिपावरच सांगताय?
मस्त जमलंय हे वे सां न ल.
In reply to मिपा बंदचे 'फायदे' मिपावरच by प्यारे१
प्यारे माझे प्रतीसाद ढापतोय काय असा सौंशय येऊ लागलाय (ह.घ्या)
घरघरकी कहानीवाला नाखु
In reply to तंतोतंत! by नाखु
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्या मिपाकरांनाच आहे! :-)
क्या बात ! खुलली आहे प्रतिभा ;)
आवडले एकदम ब्येश्ट!
झकास जमलंय विडंबन!
बेष्ट जमलय स्वॅप्सभौ!
मस्तच कळलंय विडंबन.
तुळशीबागेवर भारी राग हो तुमचा!
In reply to मस्तच कळलंय विडंबन. by अजया
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.
In reply to नाव नका काढू हो त्या अभद्र by एस
@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>>
मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! 
मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! 
In reply to @नाव नका काढू हो त्या अभद्र by अत्रुप्त आत्मा
ही: ही: ही: ही:! दू दू बुवा! ;-)
ह्ही ह्ही ह्ही!
सुंदर विडंबन
खी खी खी. =))
जबराट.
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))
अनर्थशास्त्र ?? हे काय असतं ?
आवडले
"माताग्रामेच द्वादशानी मूल्यम !"
बहु सुन्दरं अस्ति !
आमचीच कविता लिवलीय !
तुंबलेली कामे,..बैलाचा डोळा...!
कळकळ, तळमळ, हळहळ पोचली
In reply to कळकळ, तळमळ, हळहळ पोचली by वेल्लाभट
धन्यवाद हो धन्यवाद! तुम्हांलाही आणि वरील सर्वांनाही..! :-)
१ नंबर
जबराट जमलंय मिपा-बंद-स्फुर्त विडंबनकाव्य.. लै कलाकार तुम्ही, स्वॅपभौ..
In reply to जबराट जमलंय.. by चिगो
कसचं कसचं! :-) *
*(प्रतिसादकल्पनामूळश्रेय - श्री. दमामि यांचा एक प्रतिसाद.)
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे?
पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं?
इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
+१ . . आपल ते हे..छानय विडंबन!
मस्त!