<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>
लेखनविषय:
काव्यरस
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
'नसतेच मिपा हे जेव्हा
देह हलता-बोलता बनतो
तुंबलेली उरकती कामे
संसार नेटका होतो
आ वासून पाहे तीही
स्वतः उठून चहा जेव्हा करतो
बायकोपण करते कौतुक
नेटपॅकही शाबूत राहतो
तू सांग सखे वाट्टेल ते
तुजसाठी करेन मी आज
एक सोडून तुळशीबाग
जग सारे तुला फिरवितो
नको फुकाचे वादविवाद
ना डु-आयडींचे ट्रोलिंग
वटवट ना वाचे कुठची
दिन सुखेनैव हा कटतो
(...अर्ज किया है...)
ना स्पर्धा कुठली न ईर्ष्याही काही
स्कोअर-सेटलिंगला आता स्कोपच नाही
असे हेवनवासी होती आयडी काही
आता काडीही नाही, अन् आयडीही नाही!
(गाणे परत सुरू...)
ना अजून झालो कोता,
जाणार ना मी हो 'कुठेही'
झालंय का मिपा सुरू,
मी हळूच उघडून बघतो...!
नसतेच मिपा हे जेव्हा...'
;-)
वाचने
16707
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
मस्त!
हाहाहा. एक नंबर.
उत्तम!
वाह, खुप सही.
खासच
ब्येष्ट !
मिपा बंदचे 'फायदे' मिपावरच
In reply to मिपा बंदचे 'फायदे' मिपावरच by प्यारे१
तंतोतंत!
In reply to तंतोतंत! by नाखु
पण मिपा बंद असल्याचा एक
क्या बात ! खुलली आहे प्रतिभा
उत्तम !
झकास जमलंय विडंबन!
बेष्ट जमलय स्वॅप्सभौ!
मस्तच कळलंय विडंबन.
In reply to मस्तच कळलंय विडंबन. by अजया
नाव नका काढू हो त्या अभद्र
In reply to नाव नका काढू हो त्या अभद्र by एस
@नाव नका काढू हो त्या अभद्र
In reply to @नाव नका काढू हो त्या अभद्र by अत्रुप्त आत्मा
ही: ही: ही: ही:! दू दू बुवा!
ह्ही ह्ही ह्ही!
मस्त....
खी खी खी. =)) जबराट.
हाहाहा!
हा हा लय भारी :)
आवडले
माताग्रामेच द्वादशानी मूल्यम
हम्म..
कळकळ, तळमळ, हळहळ पोचली
In reply to कळकळ, तळमळ, हळहळ पोचली by वेल्लाभट
धन्यवाद हो धन्यवाद!
१ नंबर
जबराट जमलंय..
In reply to जबराट जमलंय.. by चिगो
कसचं कसचं! :-) *
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय
+१ . . आपल ते हे..छानय विडंबन