मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्याला ती हवीये...

पिलीयन रायडर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
स्त्री कशीही असली तरी शेवटी पुरुषांना काय हवं असतं... बायकोच्या हातचा डबा.. ऑफिस मध्ये मिरवायला.. तिचा मउसुत हात.. केसातुन फिरवायला... तिची लांबसडक बोटं...मस्त तेल जिरवायला.. तिचे नाजुक ओठ.. गालावर फिरवायला.. आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला.. तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला.. तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला... तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला.. त्याला बहीण हवी..हट्ट पुरवायला.. त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला... त्याला ती हवीये... माधुर्य टिकवायला... तिला तो हवाय.. गोडी वाढ्वायला... खुप भांडण चालु आहेत.. चालु रहातील.. पण त्या निमित्ताने स्त्री-पुरुषाच्या नात्यातले सुंदर कंगोरे पण टिपावे वाटले...

वाचने 7713 वाचनखूण प्रतिक्रिया 39

निश Mon, 03/19/2012 - 17:44
मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेब आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला.. तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला.. तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला... तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला.. हे तुमच कडव अप्रतिम अप्रतिम अप्रतिम........ त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला हि ओळ निव्वळ लाजवाब लाजवाब लाजवाब...

In reply to by कवितानागेश

चौकटराजा Tue, 03/20/2012 - 09:09
स्वाक्शरी तून वयावा पत्ता लागत नाही पण आय डी वरून ंमंगोलियन असावी असे वाटते. कारण नावात ब्रूस ली, जेट ली आणि माउ त्से तुंग दिसतात .

स्मिता. Tue, 03/20/2012 - 16:30
ही कविता त्या धाग्यावरही आवडली होतीच. शेवटचं कडवं सगळ्यात छान :)

पद्मावति Fri, 07/31/2015 - 21:56
पुरुषाच्या आयुष्यातल्या या सर्वात महत्वाच्या स्त्रिया. त्याची आई, बायको, बहीण आणि मुलगी.
तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला..
...वाह...

नाखु Sat, 08/01/2015 - 11:55
दोघे एक्मेकांसार्खे नाहीतच (किंबहुना नसावेत अशी निसर्गानेच तरतूद केलीय ) पण एक्मेकांसाठी नक्कीच आहेत, दोघांचेही आयुष्य आणखी सुंदर्/सुखावह करण्यासाठी (ती ही तरतूद निसर्गानेच केलीय, भावबंधातून जोपासायची खुलवायची इतकेच करायचे दोघांनीही) पुलेशु ! स्त्रीमुक्ती आणि मुक्त स्त्री यातला नेमका फरक माहीत असलेला नाखु

प्रभाकर पेठकर Sat, 08/01/2015 - 12:34
'ती' आणि 'तो' दोघांनाही एकमेकांची मानसिक, भावनिक गरज असतेच असते. एकमेकांविना एकमेकांचे आयुष्य अधुरे असते. कविता सुंदर आहे. आवडली.

प्रियाजी Sun, 09/13/2015 - 16:55
पि.रा. खूप छान कविता. थोड्क्या शब्दात किती मोठा आशय. अजून अशाच छान कविता लिही अन ईथे चिटकव.