त्याला ती हवीये...
लेखनविषय:
काव्यरस
स्त्री कशीही असली तरी शेवटी पुरुषांना काय हवं असतं...
बायकोच्या हातचा डबा.. ऑफिस मध्ये मिरवायला..
तिचा मउसुत हात.. केसातुन फिरवायला...
तिची लांबसडक बोटं...मस्त तेल जिरवायला..
तिचे नाजुक ओठ.. गालावर फिरवायला..
आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला..
तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला..
तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला...
तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला..
त्याला बहीण हवी..हट्ट पुरवायला..
त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला...
त्याला ती हवीये... माधुर्य टिकवायला...
तिला तो हवाय.. गोडी वाढ्वायला...
खुप भांडण चालु आहेत.. चालु रहातील.. पण त्या निमित्ताने स्त्री-पुरुषाच्या नात्यातले सुंदर कंगोरे पण टिपावे वाटले...
वाचने
7714
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
भांडणावर उतारा फार छान!
मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेब
आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला..
तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला..
तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला...
तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला..
हे तुमच कडव अप्रतिम अप्रतिम अप्रतिम........
त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला
हि ओळ निव्वळ लाजवाब लाजवाब लाजवाब...
In reply to मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेब by निश
मी "म्याडम" आहे..!!!
धन्यवाद...
In reply to ओ मी साहेब नाहीये हो.. by पिलीयन रायडर
पिलीयन रायडर म्याडम, खरच माफि असावि.
पण कविता एकदम मस्त
In reply to पिलीयन रायडर म्याडम, खरच माफि असावि. by निश
माफीची गरज नाय.................... 'साहेब'च्या मागे "बाई" लावा.............
.................... हा. का. ना. का.
In reply to माफीची गरज by सुधीर१३७
@'साहेब'च्या मागे "बाई" लावा............. >>>
हसुन हसुन खपल्या ग्येलो हाय.. 
हसुन हसुन खपल्या ग्येलो हाय.. 
In reply to माफीची गरज by सुधीर१३७
'साहेब'च्या मागे "बाई" लावा............. की बाई मागे साहेब लावून "बाईसाहेब" करा? :)In reply to मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेब by निश
मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेबया सायेब न्हवं सायबीन बै हात... बाकी :: मस्त जमलीये कविता...
खुप भांडण चालु आहेत.. चालु रहातील.. पण त्या निमित्ताने स्त्री-पुरुषाच्या नात्यातले सुंदर कंगोरे पण टिपावे वाटले...कूल.
सुंदर काव्य..
आणखी येवूद्या..! :-)
त्याला हवी आहे ती पिलियन वर बसवायला !
कविता आवडली
चला म्हन्जे पुरुष थोडे का होइना चंगले असतात. ;)
त्याला ती हवी असते, या ना त्या कारणासाठि
मतितार्थ : पुरुष स्वार्थी असतो
In reply to चला म्हन्जे पुरुष थोडे का by किचेन
मतितार्थ : पुरुष स्वार्थी असतोएकेकाचा द्रुष्टिकोन.. समज.. आवाका... अनुभव...
भांडणं करुन करुन दमलेल्या पुरुषांची कहाणी अवडली... ;-)
In reply to भांडणं करुन करुन दमलेल्या by अत्रुप्त आत्मा
+ १००
तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला..>
हे आवडले. :)
In reply to तिच्या नावची शपथ.. जगालाही by कवितानागेश
स्वाक्शरी तून वयावा पत्ता लागत नाही पण आय डी वरून ंमंगोलियन असावी असे वाटते.
कारण नावात ब्रूस ली, जेट ली आणि माउ त्से तुंग दिसतात .
आय डी वरून मंगोलियन असावी असे वाटते.>
कदाचित असेनही....
हल्ली कुणाचा भरवसा नाही बाबा! :)
In reply to आय डी वरून मंगोलियन असावी असे by कवितानागेश
म्हणजे हजारात एक नसेल पण ७०० त एक नक्कीच!
ही कविता त्या धाग्यावरही आवडली होतीच. शेवटचं कडवं सगळ्यात छान :)
उत्तम कविता, खुप छान वाटलं.
मस्त!
मला नव्हति ऐकवली कधि ;(
आवडली.... :)
अप्रतिम कविता !
मस्त मस्त मस्त ताई!!!
गेल्या तीन दिवसाच्या तुफानानंतर भावनांचं छान इंद्रधनुष्य दिसलं!!!
पण काय हो.... तिला तो नकोय का?
In reply to आवडेश..... by माम्लेदारचा पन्खा
तुमच्या प्रश्नाचे उत्तर शेवटच्या वाक्यात अगदी थोडक्यात दिले आहे असे वाटते.
कविता भावली.
In reply to शेवटच्या वाक्यात उत्तर by श्रीरंग_जोशी
आमच्या हिला सांगितलं पाहिजे...
पुरुषाच्या आयुष्यातल्या या सर्वात महत्वाच्या स्त्रिया. त्याची आई, बायको, बहीण आणि मुलगी.
तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला.....वाह...
एक्दम झक्कस
मस्त कविता.
दोघे एक्मेकांसार्खे नाहीतच (किंबहुना नसावेत अशी निसर्गानेच तरतूद केलीय )
पण एक्मेकांसाठी नक्कीच आहेत, दोघांचेही आयुष्य आणखी सुंदर्/सुखावह करण्यासाठी (ती ही तरतूद निसर्गानेच केलीय, भावबंधातून जोपासायची खुलवायची इतकेच करायचे दोघांनीही)
पुलेशु !
स्त्रीमुक्ती आणि मुक्त स्त्री यातला नेमका फरक माहीत असलेला
नाखु
'ती' आणि 'तो' दोघांनाही एकमेकांची मानसिक, भावनिक गरज असतेच असते. एकमेकांविना एकमेकांचे आयुष्य अधुरे असते. कविता सुंदर आहे. आवडली.
मस्त
+१
क्लास...!
पि.रा. खूप छान कविता. थोड्क्या शब्दात किती मोठा आशय. अजून अशाच छान कविता लिही अन ईथे चिटकव.
कविता खूप आवडली. खरच पुरुषाला स्त्री ची आणि स्त्रीला पुरुषाची गरज असतेच.... अनादी पासून अनंतापर्यंत!
वा!