शरदातला स्वित्झर्लंड : ११ : र्हाईन धबधबा (र्हाईनफाल्)
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
प्रेमात पडावे असे शहर ! नाईलाजाने पदयात्रा संपवून बस थांब्यावर परतलो आणि लुत्सर्नकडे जाणारी बस पकडली. सहलीच्या पुढच्या गंतव्याकडे जाणारी रेल्वे लुत्सर्न बानहोफवरून सुटली आणि र्हाईनच्या धबधब्याबाबतच्या विचारांची गर्दी मनात सुरू झाली.
.
मध्य स्वित्झर्लंडमधल्या लुत्सर्नवरून निघालेली रेल्वे झ्युरिक् मार्गे स्वित्झर्लंडच्या जर्मनीबरोबरच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या श्लोसलाउफन (schlosslaufen) कडे निघाली. या दोन तासांच्या प्रवासात झ्युरिक् आणि विंटरथुर या दोन थांब्यांवर गाडी बदलून पुढे जायचे होते. या दोन्ही स्टेशनवर १४ मिनिटे आणि ७ मिनिटे अश्या फरकाने एकमेकांपासून दूर असलेल्या प्लॅटफॉर्म्सवरून पुढची गाडी पकडायची होती. आतापर्यंत स्विस रेल्वे आणि खुद्द माझ्यावरचा माझा विश्वास इतका वाढलेला होता की हे काम मी रोज लोकल/बस बदलत कामाला जाणार्या मुंबईकराच्या सफाईने केले !
गाडी आल्प्सचा निरोप घेऊन सुरुवातीला लहानमोठ्या टेकड्यांचा मधून आणि त्सुग व झ्युरिक् अशी (त्यांच्या काठावरच्या शहरांची) नावे दिलेल्या मनोहर सरोवरांच्या काठाने झ्युरिक् पर्यंत जाते. त्यामुळे हा प्रवास जरा भरकन संपतो. इतक्या दिवसांनंतर या प्रवासात प्रथमच मोठी सपाट शेते दिसायला सुरुवात झाली होती...
र्हाईन धबधब्याच्या दिशेने
र्हाईन धबधबा : ०१
र्हाईन धबधबा : ०२
र्हाईन धबधबा : ०३
र्हाईन धबधबा : ०४ : निरिक्षणमनोरा असलेला सुळका
थुर्बो (टर्बो) रेल्वे ०१
थुर्बो (टर्बो) रेल्वे ०२
वाचने
10786
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
काय सुंदर आहे.
र्हाईनफॉल्स हे माझे पहिले
एक्का साहेब...
-हाईन फाॅलला भेट म्हणून
र्हाईन धबधबा पाहून निराशाच
सुरेख वर्णन. स्विस पर्यटन,
पद्मावति, मधुरा देशपांडे,
In reply to पद्मावति, मधुरा देशपांडे, by डॉ सुहास म्हात्रे
"एक दिवसाचा मोकळा वेळ आरामात
In reply to "एक दिवसाचा मोकळा वेळ आरामात by मधुरा देशपांडे
काय हे !? मी तेथे गेलो असताना
मस्स्स्स्स्स्स्त!
उत्तम!
छान ........
धन्यवाद !
खूप छान लिहिलंय!
क्या बात है
धन्यवाद !
वाह! मजा आली वाचायला! फ़ोटो पण
In reply to वाह! मजा आली वाचायला! फ़ोटो पण by अरुण मनोहर
धन्यवाद !
२०१३ ला धबधब्यास दिलेली भेट