तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
ब) PaniniKeypad Marathi IME
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
वाचने
447844
वाचनखूण
प्रतिक्रिया
716
In reply to मुझे भी प्लीज :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडी कळ काढा मित्रहो.
In reply to थोडी कळ काढा मित्रहो. by आनंदी गोपाळ
नक्की द्या, वाट पाहतोय
In reply to नक्की द्या, वाट पाहतोय by श्री
थीम खरेच खूप सुंदर आहे ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptमदत.
फोन रूट केल्यावर
In reply to फोन रूट केल्यावर by घन निल
नाही.
In reply to नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by घन निल
नाय हो...नाय झाला रूट फोन !
insufficient phone memory
In reply to insufficient phone memory by arun jaykar
हो
radio off
In reply to radio off by रॉजरमूर
नै राव
अरं काही नवं ?
recovery software for Android mobile
In reply to recovery software for Android mobile by arun jaykar
मिळतो डाटा.
In reply to मिळतो डाटा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
recovery software for Android mobile
In reply to recovery software for Android mobile by arun jaykar
अजिबात नाहि
सिंगल सीम मोबाईल वर दोन whatsapp अकौंट.
In reply to सिंगल सीम मोबाईल वर दोन whatsapp अकौंट. by पाटील हो
एक सिम
आमचेकडे
मोबिले internet control
जी पी एस नेव्हिगेशन साठी एक जबराट अप्लीकेशन
In reply to जी पी एस नेव्हिगेशन साठी एक जबराट अप्लीकेशन by सुनिल साळी
म्हणजे GPS साठी internet
In reply to म्हणजे GPS साठी internet by रॉजरमूर
ही अॅपस( फ्री ,विंडोज) फक्त
In reply to म्हणजे GPS साठी internet by रॉजरमूर
जीपीएससाठी इंटरनेट आवश्यक
In reply to जीपीएससाठी इंटरनेट आवश्यक by आनंदी गोपाळ
आताचे नवीन क्वाड कॅार प्रसेसर
In reply to आताचे नवीन क्वाड कॅार प्रसेसर by कंजूस
आपण ट्रेन मधुन जातो तेव्हा
In reply to आपण ट्रेन मधुन जातो तेव्हा by कंजूस
नाही हो .
In reply to नाही हो . by रॉजरमूर
एक जुना नोकिया घेऊन टाका की
In reply to नाही हो . by रॉजरमूर
%%पूर्ण map बद्दल नाहीच म्हणत
In reply to आपण ट्रेन मधुन जातो तेव्हा by कंजूस
१. प्रत्येकाजवळ तो लेटेस्ट
मोबाईल एॉप
In reply to मोबाईल एॉप by arun jaykar
मोबाइल मधेच सुविधा आहे
ट्रेकींग चा रूट ट्रेस
Updated
In reply to ट्रेकींग चा रूट ट्रेस by कंजूस
ट्रेकींग चा रूट ट्रेस
बिरुटेसाहेब धन्यवाद.
वाट्सअप
आरं नवं काही ?
OTG support
In reply to OTG support by कपिलमुनी
हे हार्डवेअर बेस्ड फिचर आहे..
In reply to हे हार्डवेअर बेस्ड फिचर आहे.. by सुहास झेले
हे OTG supported फोन असला तर
In reply to हे OTG supported फोन असला तर by कंजूस
हो दोन्ही प्रकारे डेटा
विक्रम झालाय
- वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का? - १,११३ प्रतिसाद
- तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी... - ४७७ प्रतिसाद
- इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? - ४७४ प्रतिसाद
काल पर्यंत क्र. २ वर हा व काश्मीरचा धागा होता. आज काश्मीरच्या धाग्याला मागे टाकले. अर्थात काश्मीरच्या धाग्याला सक्तीची निवॄत्ती दिली गेली नसती तर चित्र वेगळे असते. या विक्रमाबद्दल धागाकर्ते सुहास झेले, सर्व प्रतिसादकर्ते व मिपावरील सर्व अॅन्ड्रॉइडप्रेमींचे हार्दिक अभिनंदन अन पंचशतकासाठी शुभेच्छा. बाकी मिपावर ब्लॅकबेरी १० वापरकर्ते एवढे वाढावेत की त्यासाठी स्वतंत्र धागा निघावा अशी इश्वरचरणी प्रार्थना :-) .In reply to विक्रम झालाय by श्रीरंग_जोशी
सर्वांना धन्यवाद... :) :)
In reply to सर्वांना धन्यवाद... :) :) by सुहास झेले
नही, नही, नही,
ऑफलाईन जीपीएस
In reply to ऑफलाईन जीपीएस by तुषार काळभोर
छान उपयुक्त माहीती Sygic
अतिशय माहितीपूर्ण अॅप...
अॅपसंबंधी प्रश्न ( फक्त
In reply to अॅपसंबंधी प्रश्न ( फक्त by कंजूस
TOI, ndtv बद्दल तरी काही
ओके नवीन TOI डाउनलोड करून
ओके नवीन TOI डाउनलोड करून
पाहिजे.
In reply to पाहिजे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते नंतर!!!
In reply to ते नंतर!!! by अत्रुप्त आत्मा
अभिनंदन
In reply to पाहिजे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे बघा चालतंय का: Titanium
In reply to हे बघा चालतंय का: Titanium by सुहास झेले
अर्रे व्वा...!
In reply to अर्रे व्वा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओला रेफरल कोड
एंड्रॉइड ऍप बाबतित प्रो
In reply to एंड्रॉइड ऍप बाबतित प्रो by देव मासा
बघा जमतं का
पार्श्वभूमि वर संगीत
मायक्रोमॅक्स युनाईट २
In reply to मायक्रोमॅक्स युनाईट २ by महेश-मया
रुट करण्यासाठी
In reply to रुट करण्यासाठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरवणी.
मोबाईल रुट व पुढील गोष्टी
In reply to मोबाईल रुट व पुढील गोष्टी by arun jaykar
बघा.
मोबाईल रुट व पुढील गोष्टी
...
In reply to ... by arun jaykar
फोन रुट करून मेमरी वाढविता
रुट
In reply to रुट by arun jaykar
link2sd plus & MiniTool-Partition-Wizard हे वापरा
माझा फोन
In reply to माझा फोन by चतुरंग
फोन रूट करा त्यानंतर रूट
रुट कसा करु ?
हुर्रेsssssss. शेवटी रुट केलाच.
इथे रुट करणे ह्यावर फार चर्चा
In reply to इथे रुट करणे ह्यावर फार चर्चा by पिलीयन रायडर
इतके सगळे प्रॉब्लेम आहेत..
In reply to इतके सगळे प्रॉब्लेम आहेत.. by सुहास झेले
करायचं कसं असतं ते?
In reply to करायचं कसं असतं ते? by पिलीयन रायडर
इथे बिरुटे सरांनी माहिती दिली
अॅन्ड्रॉईड ६.० - Marshmallow
lenovo k3 note सोलयुशव
In reply to lenovo k3 note सोलयुशव by arun jaykar
केलंय ते मी.. तरीही काही
sd card partitions
In reply to sd card partitions by arun jaykar
फोन मेमरी १ किंवा १.५ जीबी
पार्टीशन
In reply to पार्टीशन by arun jaykar
फोन मेमरी FAT३२ आणि एसडी
धन्यवाद
आर्युवेदीक App
Swapper app आणि link २ sd मधे
Android kitkat 4.4 वरुन SD
खोट्या/ अवास्तव जाहिरातींना आळा घालण्यासाठी
फोन रूत करन्याचे फायदे
%Android kitkat 4.4 वरुन SD
In reply to %Android kitkat 4.4 वरुन SD by कंजूस
अहो पण जुना सैनिक सगळ्यांच
नवं काय ?
SHAREit App झकास अॅप
In reply to SHAREit App झकास अॅप by नया है वह
Windows version
GoStories
गुगल लोगिन एरर
In reply to गुगल लोगिन एरर by स्वप्क००७
थांकू!
youtube download
In reply to youtube download by कपिलमुनी
UC Browser install करा
tubemate
अरे नवीन काही ?
अॅंड्रॉइडवर ऑफलाइन मॅप्स आणि
In reply to अॅंड्रॉइडवर ऑफलाइन मॅप्स आणि by अनुप ढेरे
गूगल मॅप्स
In reply to अॅंड्रॉइडवर ऑफलाइन मॅप्स आणि by अनुप ढेरे
सिजिक
Exclamation mark on cellular
In reply to Exclamation mark on cellular by मदनबाण
त्याचा संबंध डेटा शी आहे
In reply to त्याचा संबंध डेटा शी आहे by कानडा
त्याचा संबंध डेटा शी आहे
In reply to त्याचा संबंध डेटा शी आहे by मदनबाण
कुठे काय?
In reply to कुठे काय? by पैसा
हा बहुधा ५.१.१ ला दिसणारा
ब्लॅकबेरी प्रिव्ह
#bb-android-phone.
In reply to #bb-android-phone. by कंजूस
त्यांचा दावा तर आहे तसा
- Hardware-embedded cryptographic keys. Translation:The phone has security in the chipset itself that verifies and validates that the hardware is running an untampered operating system.
- A hardened Linux kernel. Translation: BlackBerry patched up the underlying Androidcore software to secure the operating system from vulnerabilities.
स्रोत: BlackBerry Priv Review: BlackBerry May Win You Back With Androidencryptionमुळे bbचे पॅकेज
In reply to encryptionमुळे bbचे पॅकेज by कंजूस
स्लाइडर फोन
In reply to स्लाइडर फोन by श्रीरंग_जोशी
सरकत्या कळफलकासाठी +९९९
In reply to सरकत्या कळफलकासाठी +९९९ by तुषार काळभोर
पुराने जमाने का फोनवा
In reply to पुराने जमाने का फोनवा by श्रीरंग_जोशी
अजून नाही वापरत
In reply to अजून नाही वापरत by तुषार काळभोर
क्या बात है
In reply to अजून नाही वापरत by तुषार काळभोर
हायला...
In reply to हायला... by योगी९००
मीसुद्धा वापरला असता अजून..
आजचे अॅप :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the bubble bursting for India's online start-ups?In reply to आजचे अॅप :- by मदनबाण
आजचे अॅप :-
In reply to आजचे अॅप :- by मदनबाण
नविन धागा काढा
अरे नवं कै आलंय का ?
टास्क किलिंग म्हणजे काय ,ते
In reply to टास्क किलिंग म्हणजे काय ,ते by कंजूस
काही अॅप्स बंद केल्यानंतरही
In reply to टास्क किलिंग म्हणजे काय ,ते by कंजूस
@पंतश्री
हायला हे मोठेमोठे टास्क
मोटो ई रूट करण्यासाठी कुणी
थोडी तांत्रिक मदत हवी आहे.
In reply to थोडी तांत्रिक मदत हवी आहे. by श्रीगुरुजी
माझी प्रोग्रॅमिंग बॅकग्राउंड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas@उगा काहितरीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peasमाझ्याकडे ASUS Zenphone 5 आहे
In reply to माझ्याकडे ASUS Zenphone 5 आहे by राजाभाउ
तुमचा फोन दुसर्या कुठल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peasमाझा सॅमसंग नोट अचानक ३०
In reply to माझा सॅमसंग नोट अचानक ३० by संदीप डांगे
सॅमसंगने जुने फोन इन्टर्नेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peasकाय नवं ?
In reply to काय नवं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवी आणी जुनी पण फारशी माहित नसलेली अशी आहेत
In reply to नवी आणी जुनी पण फारशी माहित नसलेली अशी आहेत by उपयोजक
यातच लिहा.
जरुर
In reply to जरुर by उपयोजक
हम्म
आजची अॅप्स :-
कोणी शामशुंग मोबाईलला
In reply to कोणी शामशुंग मोबाईलला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मित्राने सहा महिन्यांपूर्वी
In reply to मित्राने सहा महिन्यांपूर्वी by कंजूस
मी स्वतः युरेका प्लस वापरतो
In reply to मी स्वतः युरेका प्लस वापरतो by आनंदी गोपाळ
होय त्यांचा युरेका प्लस आहे
In reply to होय त्यांचा युरेका प्लस आहे by कंजूस
नाही.