शरदातला स्वित्झर्लंड : ०७ : नंदनवनातला प्रवास
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
तासभर व्यापारी विभागात पायपीट केल्यावर निरोप घेऊन आम्ही आपापल्या हॉटेल्सकडे वळलो. आजचा दिवस तर अपेक्षेपेक्षा जास्त सुरेख गेला. उद्या माऊंट टिटलिस काय नजारे दाखवेल याचा विचार मनात चालू होताच. दिवसभराच्या दगदगीचा आतापर्यंत पत्ता लागला नव्हता, पण, बिछान्याला पाठ लावल्या लावल्या केव्हा डोळा लागला ते कळलेच नाही.
दुसर्या दिवसाच्या सकाळी न्याहारी करून पावणेसात वाजता हॉटेलच्या बाहेर पडलो. इंटरलाकन इस्ट स्टेशन पायी चालत पाच मिनिटावर असल्याने वेळेच्या आधी पोचलो. गाडी सकाळी लवकराची असल्याने फारशी गर्दी नसेल हा अंदाज बरोबर निघाला आणि खिडकीशेजारची मोक्याची जागा पकडायला काही प्रयास पडले नाहीत. आजच्या गंतव्याच्या पहिल्या प्रवासाचा मार्ग इंटरलाकन-हेर्गिसविल-एन्गेलबर्ग असा होता. या अडीच तासाच्या रेल्वेप्रवासानंतर टिटलिसवर काय बघायला मिळेल याच विचारात असतानाच जो परिसर सुरू झाला त्यातल्या प्रवासाचा अनुभव माझ्या सर्वोत्तम अविस्मरणीय अनुभवांपैकी एक होता.
जसजसे ढगांचे आणि धुक्याचे आवरण कमी होऊ लागले आणि सूर्यप्रकाशात परिसर उजळू लागला तसतशी रेल्वेच्या सकाळच्या प्रवासात डोळ्यावर सहजपणे येणारी गुंगी खाडकन उतरली. आणि जसजसा सूर्य वर चढत गेला तसतशी त्या प्रवासाची रंगत वाढतच गेली.
सुरुवात उंच डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्या खेड्याने झाली. डोंगराच्या उतारावर असलेल्या दाट झाडीला, ती बर्यापैकी धुक्यात गुरफटलेली असूनही, शरदाने बहाल केलेल्या नव्या रंगीबेरंगी वस्त्रांचा दिमाख दाखवायचा मोह आवरत नव्हता हे जाणवत होते. जरा जास्त प्रकाश असता तर काय बहारदार दृश्य दिसले असते असा विचार मनात येऊन मन थोडेसे खट्टू झालेच...
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०१
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०२
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०३
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०४
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०५
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०६
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०७
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०८
एन्गेलबर्गच्या दिशेने : ०९
एन्गेलबर्गच्या दिशेने : १०
एन्गेलबर्गच्या दिशेने : ११
एन्गेलबर्गच्या दिशेने : १२
एन्गेलबर्गच्या दिशेने : १३
वाचने
9461
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
एंगेलबर्ग ही शब्दशः यक्षपुरी आहे.. आणि टिटलिस तिचा परमोच्च बिंदू.. कितीदा गेले असेन.. पण अजूनही मन भरलं असं वाटत नाही.. मे महिन्यात गेलं तर मात्र टूरिस्टांचा सुळसुळाट असतो.त्या पायथ्याशी.. गुरमेट इंडियाच्या गाडीवर मसाला टी, समोसा,वडापाव खाणारे होते का शरदातही? :)
ऑटममध्ये टिटलिसची शोभा काही औरच..
स्वाती
In reply to यक्षपुरी.. by स्वाती दिनेश
"एंगेलबर्ग"चा अर्थच देवदूतांचे गाव असा होतो ! त्याची जाहीरात "The place where angels come to play !" अशी केली जाते. हा सर्व परिसरच इतका सुंदर आहे की त्या जाहिरातीवर विश्वास बसावा !
वेळेच्या अभावामुळे एंगेलबर्गमध्ये रहावे अशी इच्छा असूनही जमले नाही, त्यामुळे समोसा-वडापाववाल्यांशी सामना झाला नाही. पण सहलीत १२-१५ जणांच्या गुजराती सहप्रवाश्यांच्या जथ्याशी ओळख झाली !
In reply to यक्षपुरी.. by स्वाती दिनेश
१०० % सहमत.
टिटलिसला जाताना ऱोटेअरमधून दिसणारी Eugenisee नदी, नीळंशार पाणी, हिरवळ, टुमदार घरं, मोहक सौंदर्य.
गॉरमे इंडियाच्या गाडीवर मिळणारी पाव-भाजी, गाजर-हलवा, इडली-चटणी पण गं ;)
In reply to १०० % सहमत. by सानिकास्वप्निल
सर्व फोटो सुंदर आहेत, मस्तं लिहिला हा ही भाग :)
जाकास ....
सर्व फोटो स्वप्नवत आहेत.
आता वाचतोय..
अप्रतिम सुंदर नजारा!
खरोखरच नंदनवन.
फोटोंतील घरे अगदी जुनाट पद्धतीची आणि हिम-पावसापासून संरक्षण देण्याच्या पद्धतीने बांधल्यासारखी वाटतात.
In reply to खरोखरच नंदनवन. by प्रचेतस
बर्याचश्या लहान गावांतली घरे आग्रहाने पारंपारीक पद्धतीची असतात. गावांतल्या बर्याचश्या नविन इमारतीही लाकडी असतात. फक्त मोठ्या गावातल्या आणि शहरांतल्या नविन इमारती सिमेटच्या असतात. आतमध्ये मात्र सर्व आधुनिक सुखसोयी असतात.
ऐसाच ऑटम आपुनकू देकनेका हय ! मतलब ऑक्टो १५ २०१६ हा म्हऊर्त लागणार का काय आम्हाला ! असो. खरोखरच
पेटलेल्या ( हा शब्द माझ्या आतेभावाचा युरोपच्या ऑटम बद्द्ललचा) युरोपचे फोटो मस्त आलेत. हिरवळीत काहीसा तपकिरीपणा आला आहे पण त्यामुळे हिरवाई जरा गोडच दिसतेय.
In reply to ऐसाच by चौकटराजा
तुमको इस्से रंगीला ऑटम देखनेलो मिलेंगा ऐसाईच इच्चा करतई ।
एकदम ऐसाईच...
(जालावरून साभार)
(जालावरून साभार)
In reply to तुमको इस्से रंगीला ऑटम by डॉ सुहास म्हात्रे
सदर फ़ोटू चोरणेत येत हाये!
काय त्ये फ़ोटू !??? निस्त तरंगायलोय हवेत! इशेषत: थे दुसय्रा फोटूमुळे!
In reply to सदर फ़ोटू चोरणेत येत हाये! by अत्रुप्त आत्मा
पर्वा इल्ले. ह्यो फोटू तर आमीबी नेटावर्नच घ्येत्ल्येला हाय !
पाटील हो, खटपट्या आणि अजया : अनेक धन्यवाद !
वाचतो आहे.
योग्य नाव दिलेत. सुंदर...
अगदी हेच मनात आले.नदनवनच.
आप्रतिम फोटो.
हिरवागार निसर्ग,शुभ्र बर्फाच्छदित पर्वत बघितलेत .आता शरदात जायला हवे.इतके छान लिहिले आहे.
अविनाश पांढरकर, पद्मावति आणि इशा१२३ : अनेक धन्यवाद !
@ इशा१२३ : शरदमध्य अथवा मध्यानंतरच्या पहिला आठवडा गाठून जा. म्हणजे रंग पूर्ण बहराला आलेले असतील पण बहुसंख्य पाने झाडावरच असतील.
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
नक्किच!
या माहितिबद्दल धन्यवाद.
मी अमेरिकेत भरपूर फॉल कलर्स पाहिले असले तरी पर्वतराजीतले फॉल कलर्स अन तेही स्वीस आल्प्समध्ये म्हणजे माझ्यासाठी स्वर्गीय सौंदर्यच.
या लेखमालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
In reply to स्वर्गीय सौंदर्य by श्रीरंग_जोशी
कॅनडात एक जागा आहे... आता नाव विसरलो... पण ते सगळे जंगल शरदात काही आठवडे सर्व जंगलाला आग लागलेली दिसण्याइतकी आश्चर्यकारक लालभडक होते.
पण अनेक रंगाच्या छाटांची नक्षी जंगलभर विखरून टाकणारा स्विस शरद नेत्रसुखद आणि जास्त मनोहर असतो !
फॉल कलर्सचे फोटो खूप सुंदर आले आहेत. स्विस आल्प्सचे फॉल कलर्सचे फोटो म्हणजे एक पर्वणीचं आहे!
ओह माय गुडनेस्स....
ओह माय गुडनेस्स
श्रीरंग_जोशी, जुइ आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद !
यक्षपुरी..