मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम

Hrushikesh Marathe · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझा हात माझ्या हाती, शब्द फिके अशा एकांती, प्रतिबिंब तुझे घेऊन झाली सांज गुलाबी क्षितिजावरती... किनारा असा फेसाळलेला, आसमंत सारा गंधाळलेला, बेधुंद करी त्या क्षणीचा जिव्हाळा तुझ्याच डोळ्यांत सामावलेला... होई अचानक तुझा स्पर्श वेडा, हर्षीलाच जाई जीव हा बापडा, चढु लागे धुंदी प्रेमाची जशी की बने राजवर्खी हा ऋतू कोरडा... किनाऱ्यावरी नाव रेंगाळणारी, हिंडो कुठेही, विसावा किनारी, असला दुरावा जरा काळ तरीही, प्रेमच मिटवी त्या क्षणांची दरी... - हृषीकेश

वाचने 1937 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by मुक्त विहारि

बियरचा ग्लास हाती असला तर, सेम अशाच भावना मनांत येतात..... बाडिस देवानू !

तिमा Sat, 06/06/2015 - 18:56
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली सांज गुलाबी क्षितिजावरती.. ज्या बिंबाच्या प्रतिबिंबावरही आपण एवढे खूष असतो, त्या बिंबाचा कालांतराने बंब होतो.