तुझा हात माझ्या हाती,
शब्द फिके अशा एकांती,
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली
सांज गुलाबी क्षितिजावरती...
किनारा असा फेसाळलेला,
आसमंत सारा गंधाळलेला,
बेधुंद करी त्या क्षणीचा जिव्हाळा
तुझ्याच डोळ्यांत सामावलेला...
होई अचानक तुझा स्पर्श वेडा,
हर्षीलाच जाई जीव हा बापडा,
चढु लागे धुंदी प्रेमाची जशी की
बने राजवर्खी हा ऋतू कोरडा...
किनाऱ्यावरी नाव रेंगाळणारी,
हिंडो कुठेही, विसावा किनारी,
असला दुरावा जरा काळ तरीही,
प्रेमच मिटवी त्या क्षणांची दरी...
- हृषीकेश
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1937
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
दर सॅटर्डे नाईटला , आमची अशीच स्थिती होते.....
बियरचा ग्लास हाती असला तर,
In reply to दर सॅटर्डे नाईटला , आमची अशीच स्थिती होते..... by मुक्त विहारि
बियरचा ग्लास हाती असला तर, सेम अशाच भावना मनांत येतात.....बाडिस देवानू !अनुभव नाही त्याचा..आणि
पसंद अपनी-अपनी...
In reply to अनुभव नाही त्याचा..आणि by Hrushikesh Marathe
तुम्ही (स्व्)देशी वाले दिसता
In reply to अनुभव नाही त्याचा..आणि by Hrushikesh Marathe
ठ्ठो!!! तुम्ही इथले माहितगार
In reply to तुम्ही (स्व्)देशी वाले दिसता by दमामि
छे हो, एकदम नया हूँ मय!
In reply to ठ्ठो!!! तुम्ही इथले माहितगार by कॅप्टन जॅक स्पॅरो
ज्या
नका घाबरवू हो-
In reply to ज्या by तिमा
तेव्हा त्या बंबावर करु की
In reply to ज्या by तिमा
+१
In reply to तेव्हा त्या बंबावर करु की by Hrushikesh Marathe