प्रेम
लेखनविषय:
तुझा हात माझ्या हाती,
शब्द फिके अशा एकांती,
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली
सांज गुलाबी क्षितिजावरती...
किनारा असा फेसाळलेला,
आसमंत सारा गंधाळलेला,
बेधुंद करी त्या क्षणीचा जिव्हाळा
तुझ्याच डोळ्यांत सामावलेला...
होई अचानक तुझा स्पर्श वेडा,
हर्षीलाच जाई जीव हा बापडा,
चढु लागे धुंदी प्रेमाची जशी की
बने राजवर्खी हा ऋतू कोरडा...
किनाऱ्यावरी नाव रेंगाळणारी,
हिंडो कुठेही, विसावा किनारी,
असला दुरावा जरा काळ तरीही,
प्रेमच मिटवी त्या क्षणांची दरी...
- हृषीकेश
वाचने
1937
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
बियरचा ग्लास हाती असला तर, सेम अशाच भावना मनांत येतात.....
In reply to दर सॅटर्डे नाईटला , आमची अशीच स्थिती होते..... by मुक्त विहारि
बियरचा ग्लास हाती असला तर, सेम अशाच भावना मनांत येतात.....
बाडिस देवानू !अनुभव नाही त्याचा..आणि घ्यायची इच्छाही नाही:D
In reply to अनुभव नाही त्याचा..आणि by Hrushikesh Marathe
खयाल अपना अपना ......
In reply to अनुभव नाही त्याचा..आणि by Hrushikesh Marathe
तुम्ही (स्व्)देशी वाले दिसता !
In reply to तुम्ही (स्व्)देशी वाले दिसता by दमामि
ठ्ठो!!! तुम्ही इथले माहितगार दिसता इथल्या आयड्यांची माहिती असायला.
In reply to ठ्ठो!!! तुम्ही इथले माहितगार by कॅप्टन जॅक स्पॅरो
छे हो, एकदम नया हूँ मय!
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली
सांज गुलाबी क्षितिजावरती..
ज्या बिंबाच्या प्रतिबिंबावरही आपण एवढे खूष असतो, त्या बिंबाचा कालांतराने बंब होतो.
In reply to ज्या by तिमा
त्या बिंबाचा कालांतराने बंब होतोतो लग्ना नंतरचा भाग आहे!
In reply to ज्या by तिमा
तेव्हा त्या बंबावर करु की दुसरी कविता:P
In reply to तेव्हा त्या बंबावर करु की by Hrushikesh Marathe
+१
दर सॅटर्डे नाईटला , आमची अशीच स्थिती होते.....