काही कविता.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
टरकावलेला चतकोर
तुकडा कागदाचा.
हवातसा वारा आल्यावर
मिजासखोर पतंग झाला.
हक्काचे आकाश
मागायला मोकळा.
---------------
अल्लाद टिक्करबिला खेळणारा अंगठा.
उंबर्यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा
रक्ताळला काळानिळा.
आता,
घरभर लंगडी लंगडी.
-------------------------
बारीक दाताच्या फणीनी
आयुष्याची एकेक बट विंचरून
मी विचारलंच ,
ठकूबाई,ठकूबाई,
जाणार कुठे गं
होमसीक झाल्यावर.
--------------------------------
एकेक वर्षं उसवत गेलं
अंगणापासून चौकापर्यंत
चिंध्यांच्या चेंडूंसारखं.
कृष्णा,पुरे झाल्या का
भरजरी शालूच्या धांदोट्या.?
--------------------------------------
(पतंग,टिक्करबिल्ला, ठकू बाहुली,चिंध्यांचा चेंडू या प्रतिमा वापरून मुक्तक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारणेचे स्वागत आहे.)
वाचने
8100
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
मिठू काय म्हणतो!
सुंदर रूपके
परत कविता?
पतंगाची आणि चेंडूची कविता आवडली!
In reply to पतंगाची आणि चेंडूची कविता आवडली! by चतुरंग
>>रामदास,
In reply to >>रामदास, by लिखाळ
कवितेत मांडलेला विचार.
In reply to कवितेत मांडलेला विचार. by रामदास
टिप्प्णीबद्दल धन्यवाद रामदास!
फारच सुंदर
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मुक्तकं
मोजक्या ओळीत
In reply to मोजक्या ओळीत by सहज
तुम्ही म्हणता
काही कविता
मार्मिक !
थोडंसं कळलं, बरंचसं नकळलं...
In reply to थोडंसं कळलं, बरंचसं नकळलं... by बिपिन कार्यकर्ते
कवितेचा कंद
In reply to कवितेचा कंद by मुक्तसुनीत
छान...
In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते
+++१
In reply to कवितेचा कंद by मुक्तसुनीत
मुक्तराव सुंदर विवेचन!
क्या बात
सर्वच कविता आवडल्या
हेच
छंदाबद्दल, मितशब्दी शैलीबद्दल
In reply to छंदाबद्दल, मितशब्दी शैलीबद्दल by धनंजय
सुंदर कवितांचे सुंदर विवेचन!
In reply to छंदाबद्दल, मितशब्दी शैलीबद्दल by धनंजय
धनंजय,
हे असं कसं
पहिल्या
कविता..
अल्लाद
मला