मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही कविता.

रामदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
टरकावलेला चतकोर तुकडा कागदाचा. हवातसा वारा आल्यावर मिजासखोर पतंग झाला. हक्काचे आकाश मागायला मोकळा. --------------- अल्लाद टिक्करबिला खेळणारा अंगठा. उंबर्‍यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा रक्ताळला काळानिळा. आता, घरभर लंगडी लंगडी. ------------------------- बारीक दाताच्या फणीनी आयुष्याची एकेक बट विंचरून मी विचारलंच , ठकूबाई,ठकूबाई, जाणार कुठे गं होमसीक झाल्यावर. -------------------------------- एकेक वर्षं उसवत गेलं अंगणापासून चौकापर्यंत चिंध्यांच्या चेंडूंसारखं. कृष्णा,पुरे झाल्या का भरजरी शालूच्या धांदोट्या.? -------------------------------------- (पतंग,टिक्करबिल्ला, ठकू बाहुली,चिंध्यांचा चेंडू या प्रतिमा वापरून मुक्तक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारणेचे स्वागत आहे.)

वाचन 8100 प्रतिक्रिया 0