माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण-
माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने!
पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्या माणसांचा द्वेष करू नका. कारण त्यांनी तो मिळवण्यासाठी केलेली मेहेनत आपल्याला माहित नसते. आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच. त्याची चिंता आपण कर्मफल सिद्धांतावर सोडून द्यावी. अर्थात पैशांचे महत्व आहे आणि ते नाकारून चालणार नाही. तेव्हा पैशाला तुमचे गुलाम बनवा. पैशाचे गुलाम बनू नका. पैशाने पैसा वाढवा. कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्या मिळाल्या असत्या का? त्या उद्योगपतींनीही आणि सगळ्यांनीच जर हाच विचार केला असता की, "जास्त पैसा नाश करतो, चला आपण अल्पसमाधानी राहू आणि एखादा जाॅब शोधू" तर मग या जगात इतरांना नोकरी देणार्या कंपन्या कारखाने उभेच राहिले नसते. मेहेनत करा. पैसा कमवा. पैसा टिकवा. पैसा वाढवा. माणसे जोडा. माणसे टिकवा. पण पैशाच्या प्रभावाने नव्हे तर चांगल्या स्वभावाने!
पाच हजार रूपये जेवढे महत्वाचे तेवढेच पाच पैसे सुध्दा महत्त्वाचे हे जो जाणतो तोच खरे पैशाचे मोल जाणतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की शाही घराणे, राज घराणे यांना वारसा हक्काने पैसा मिळतो पण त्यांना तो टिकवता आला नाही. उलट तो विकून खाल्ला गेला. पैसा टिकवणे आणि वाढवणे हे एक कौशल्य आहे. ते ज्या राजघराण्यांना जमलं त्यांची रया कधीच लयाला गेली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला जर आपण अशी दूषणे देत असू की "याच्या लेखी पैसाच सर्वकाही आहे" तर त्याच न्यायानूसार आपण सुद्धा दोषी ठरतो कारण "फक्त पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला वाईट समजतो" म्हणजेच त्या व्यक्तीशी असलेल्या मैत्री अथवा नात्याला आपण सुद्धा फक्त पैश्यांपुरते महत्व देतो आहे असा त्याचा अर्थ होतो, नाही का? हे जर खरे असेल तर माणसे जोडण्यामागे स्वार्थ असतो हे सिद्ध होते. महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला? पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
22384
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
निमिष्काका, शीर्षक पटलं नाही!
थोपू म्हणजे काय?
In reply to निमिष्काका, शीर्षक पटलं नाही! by खेडूत
फेसबुक
In reply to थोपू म्हणजे काय? by निमिष सोनार
बुक
In reply to फेसबुक by भुमन्यु
मी हे फेसबुक व्हाटस ऐप साठी लिहिलं. म्हणून तसं लिहिलं ..
इतरांना मिपा च्या धाग्याची लिंक शेअर करू शकता..
त्ये कळतंय हो !
In reply to इतरांना मिपा च्या धाग्याची लिंक शेअर करू शकता.. by निमिष सोनार
पाच पैसे कुठे आहेत?
पटतंय का अापल्याला मी माझ्या
पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण?कोल्हापुरला या. पैसा'पुराण ऐकवतील.:)
In reply to पटतंय का अापल्याला मी माझ्या by यसवायजी
वाती आणा
In reply to पटतंय का अापल्याला मी माझ्या by यसवायजी
जाहीर आमण्त्रन?
In reply to वाती आणा by पैसा
धन्यवाद
In reply to जाहीर आमण्त्रन? by यसवायजी
हघेरे
In reply to धन्यवाद by नाखु
ट्रक बिक पायजे का?
In reply to जाहीर आमण्त्रन? by यसवायजी
आपणा सर्वांची व्यवस्था
In reply to ट्रक बिक पायजे का? by पैसा
=))
In reply to आपणा सर्वांची व्यवस्था by यसवायजी
"बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा
In reply to =)) by पैसा
अरेच्चा!
In reply to "बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा by यसवायजी
@ कोल्हापुरला या. पैसा'पुराण
In reply to पटतंय का अापल्याला मी माझ्या by यसवायजी
मला वाटले पैसा तैचे "अहो"
ह्या:
In reply to मला वाटले पैसा तैचे "अहो" by स्पा
:-D :-D :-D
In reply to ह्या: by पैसा
+१
In reply to मला वाटले पैसा तैचे "अहो" by स्पा
+१००
In reply to +१ by एस
:)
In reply to मला वाटले पैसा तैचे "अहो" by स्पा
एखादी वस्तू विकत घेतल्यावर न
बुलेटच खरी बाईक असे सुद्धा
In reply to एखादी वस्तू विकत घेतल्यावर न by सुबोध खरे
तुला भलतंच कॉपीराईटाचं वेड रे
In reply to बुलेटच खरी बाईक असे सुद्धा by टवाळ कार्टा
मी म्हैसोबा पुराण अस वाचल..
निषेध
In reply to मी म्हैसोबा पुराण अस वाचल.. by जेपी
जल्ला तेवढा ग्रुहपाठ सोडुन
In reply to निषेध by नाखु
निसो रॉक्स अगेन..
अगदी सहज म्हणून शीर्षक तसे लिहिले. काही चुकलयास माफी असावी.
तुमचा काय प्रॉब्ळम नाय
In reply to अगदी सहज म्हणून शीर्षक तसे लिहिले. काही चुकलयास माफी असावी. by निमिष सोनार
हो ना. कैच्याकै चाल्लंय राव.
In reply to अगदी सहज म्हणून शीर्षक तसे लिहिले. काही चुकलयास माफी असावी. by निमिष सोनार
सोणार साहेब कधितरी इतरांच्या
In reply to अगदी सहज म्हणून शीर्षक तसे लिहिले. काही चुकलयास माफी असावी. by निमिष सोनार
=))))))
In reply to सोणार साहेब कधितरी इतरांच्या by स्पा
आणि जर कुणी वाईट मार्गाने
निसो
इतक्या चांगल्या प्रबोधनपर
लाजेला घाल पापाच्या तिकटीत. ९
In reply to इतक्या चांगल्या प्रबोधनपर by अन्या दातार
या
In reply to इतक्या चांगल्या प्रबोधनपर by अन्या दातार
निमिष सोनार यांचे लेख मला
In reply to या by नाखु
खुप विचार करुन लिहिलेले असतात
In reply to निमिष सोनार यांचे लेख मला by अन्या दातार
आपले लेख खुपच विचारप्रर्वतक
महागुरू आचार्य चाणक्यांनी
पैसा पुराणाचं नित्यानेमानी
ये ख.खो.दे.जा क्या है, ये ख
In reply to पैसा पुराणाचं नित्यानेमानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरं खोटं देव जाणे.
धन्यस!!
In reply to खरं खोटं देव जाणे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणलेत का काजू? कुठे ठेवलेत?
काजू कविता
आणि तव्यावर
काजू कविता
सगळे जण लेखाला विसंगत प्रतिक्रिया देतात म्हणून...
अहो काका
In reply to सगळे जण लेखाला विसंगत प्रतिक्रिया देतात म्हणून... by निमिष सोनार
सगळे जण लेखाला विसंगत प्रतिक्रिया देतात म्हणून...
प्रबोधन चांगले आहे.पैसा
ट्यार्पी!
In reply to प्रबोधन चांगले आहे.पैसा by नूतन सावंत
कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!! :- श्री श्री निसो
कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!! :- श्री श्री निसो