मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ९ : सावली

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ९ : " सावली" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी **************************************************************************************** राम राम मंडळी. छायाचित्रणकलेची आठवी स्पर्धा पार पडली आणि वेध लागले ते नेहमीप्रमाणेच नवव्या स्पर्धेतील विषयाचे तेव्हा यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'सावली' आपापल्या भन्नाट कल्पना सावली केंद्राभोवती ठेवून उत्तम छायाचित्रे येऊ द्या. प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २९ एप्रील २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा !

वाचने 58032 वाचनखूण प्रतिक्रिया 95

In reply to by टवाळ कार्टा

@ स्पाला शेप्रेट बक्षिस देउन टाका...भुताच्या सावलीचापण फोतो ताकेल तो>> :-D शमत हाय! :-D

In reply to by प्रचेतस

स्पा Wed, 04/15/2015 - 09:48
छायाचित्र सुंदर आहे, पण विषयाला अनुसरुन नाही. ह्या प्रकाराला सिलहाउट्स. ( silhouette) म्हणतात, जो की वेगळा स्पर्धाविषय होउ शकतो

मोहन Wed, 04/15/2015 - 20:21
हा / हे कोण विषय निवडताहेत ना त्यांच्या कल्पना शक्तीला मानले. मेंदूचा पार भुगा होतो विचार करुन फोटो टाकायला.

स्पंदना गुरुवार, 04/16/2015 - 16:00
काय राव? मोदकाच्या धाग्यावर किती मस्त सावली आली आहे फोटोत.

श्रीरंग_जोशी Fri, 04/17/2015 - 19:15
२००७ साली हापिसातल्या सहकार्‍यांबरोबर कोकणातील दिवे आगर येथे सहलीला गेलो होतो. तेव्हा काढलेला हा फोटो. प्रवेशिका म्हणून टाकला होता. तो सावलीपेक्षा प्रतिबिंब या प्रकारात अधिकपणे मोडत असल्याने ही नवी प्रवेशिका. STL अमेरिकेतील एका प्रसिद्ध मानवनिर्मित आश्चर्यातून काढलेला हा फोटो आहे. जमिनिपासून ६३० फुटांवरून. जाणकार लोक हे स्थळ सहजपणे ओळखतील.

In reply to by sagarparadkar

श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/16/2015 - 20:02
दोन्हीही सुंदर परंतु जो चांगला वाटेल तो घ्या हे काही पटले नाही बुवा. प्रवेशिका ज्याची आहे त्याने हे स्वतःच ठरवायला हवे. मला तर एकापेक्षा अधिक चित्रे सुरुवातीलाच टाकणे पटत नाही. निकाल लागल्यावर त्या विषयासंबंधी अधिक चित्रे जरूर टाकावीत.

In reply to by स्पा

व्वाह! लोकहो/संपादकहो... पांडुनी (आपणहून..) घेतलेल्या अपार मेहेनतीला फळ यावे. आता माझा हाच फोटू स्पर्धेसाठी-धरा. (खरोखरच हं! ) सूचणा समाप्त!

In reply to by स्वीत स्वाति

स्पंदना Fri, 04/17/2015 - 13:58
फोटो पिकासावर अपलोड करा. अन मग त्याची इमेज इन्फो येथे द्या. पिकासाला पब्लिक अ‍ॅक्सेस द्या.

In reply to by पिलीयन रायडर

पॉइंट ब्लँक Fri, 04/17/2015 - 12:59
काही तरि घोळ आहे. कारण जर त्या सावल्या असतील तर त्यांची सावली परत कशी पडली ? सूर्य डोक्यावर असल्याप्रमाणे, पायात सावली पडली आहे.

In reply to by पॉइंट ब्लँक

स्पंदना Fri, 04/17/2015 - 13:06
पिरा हा फोटो स्पर्धेकरीता नाही घेता येणार. पॉइंट ब्लँक हा वरुन सॅटेलाइट मधुन घेतलेला फोटो आहे. अन हा अतिशय फेमस आहे. सुर्याच्या मावळतीच्या उन्हात अन कोणताही अडथळा नसल्याने या एगदी परफेक्ट सावल्या लांबच्या लांब पसरलेत.

इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. पुर्वप्रकाशित चालत असेल तर मग स्पर्धेसाठी देतोय. a फोटोविषयी अधिक. तिसर्‍या मजल्यावरुन काढलेला फोटो आहे. झाडाच्या फांद्या आणि सावल्या अगदी नीट पाहिल्या तरचं फरक कळुन येतोय. हा ग्राह्य नसेल तर मग दुसरा टाकीन.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नंदन Fri, 04/17/2015 - 14:14
बोरकरांची 'छायेसम मज गमले खोटे, सत्यचि ते उफराटे' ही ओळ आठवली. कुठला फिल्टर वापरला आहे इन्स्टाग्रामवर?

शब्दबम्बाळ Sat, 04/18/2015 - 20:01
गेल्या उन्हाळ्यामध्ये घरच्यांसोबत अजंठा-वेरूळला भेट दिली होती. ऐन दुपारी बाहेर कडकडीत उन्ह असताना, सावलीत उभं राहून निवांतपणे लेण्यांचे सौंदर्य बघत असताना काढलेला हा फोटो… स्पर्धेच्या विषयाला अनुसरून आहे कि नाही याबद्दल साशंक, फक्त चांगला वाटला म्हणून येथे चिटकवला Ellora

चैदजा Sun, 04/19/2015 - 14:53
ठाण्याला नुकताच शिफ्ट झालो होतो. बर नव्हत म्हणुन ऑफिस मधुन लवकर घरी आलो होतो. संध्या़काळी हॉल मध्ये हा नजरा दिसला. पश्चिमेच्या खिडकीतुन जमिनिवर ऊन पडले होते, व ते भिंतीवर परावर्तित होऊन सुंदर दिसत होते. मग नुकत्याच घेतलेल्या सॅमसंग एस ने फोटो काढला. चेपु व फ्लिकार दोन्हीची लिंक देत आहे. Anuj Savali Anuj Savali

मोहन Sun, 04/19/2015 - 20:13
पडद्या मागचे सावलीतले कारागीर ! त्यांच्या कलाकृती तर प्रकाशात येतात पण हे अनाम कलाकार सावलीतच ! saavalee

वेल्लाभट Mon, 04/20/2015 - 23:09
अशाच एका रात्री रस्त्यावरच्या झाडाच्या फांद्यांची तिथल्या दिव्यामुळे पडलेली सावली. a कॅनन इओएस ७०डी एफ ४ १/५ १८ एम एम आयएसओ ६४००

In reply to by पॉइंट ब्लँक

प्रचेतस Tue, 04/28/2015 - 10:51
फोटो खूप सुरेख आहे पण ही सावली होऊ शकत नाही. अंधारातल्या मूर्तीवर उलट प्रकाश पडलेला आहे.

In reply to by प्रचेतस

पॉइंट ब्लँक Tue, 04/28/2015 - 11:01
हम्म, तिथे प्रकाश पोचला नाही ती सावली असा अर्थ लावला होता. अजून कोणी सांगू शकेल का, ही ठेवावी कि मागे घ्यावी?

In reply to by पॉइंट ब्लँक

ओ काका तो फोटो का काढलात? नियमात बसत नसला तरी राहुद्या ना तिकडे. लैच आवडला होता. (लव्ह अ‍ॅट फस्ट साईट का काय ते झाले होते) पैजरबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पॉइंट ब्लँक Tue, 04/28/2015 - 14:05
पैजार बुवा हे घ्या तुमचं "लव्ह अ‍ॅट फस्ट साईट". संपादक हा फोटो स्पर्धेसाठी नाही आहे. Tara2

सौरभ उप्स Wed, 04/29/2015 - 00:56
अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी…. आसनगाव येथील मानस मंदिराला जाऊन आलो तोच येताना रस्त्यात मागून ट्रक चा ह्यालोजन पडला आणि म ही आयडिया सुचली a सोनी सायबर शॉट ७०० ह्या मोबाइल ने काढलाय

In reply to by स्पा

@बुव्या ने पुकारा और हम चले आये>> ह्या ह्या ह्या ह्या! :-D दोन कठड्यातलि सावली मधाल्यामधे-लावली! ;-)